राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्याकडून नागरी/शहरी पूर आपत्ती प्रसंगी पूर्वतयारी व प्रतिबंधक उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून, काय आहेत या मार्गदर्शक सूचना जाणून घेऊया लेखातून- प्रत्येक राज्यांमध्ये उच्चतम पूर पातळी ठरविणे. प्रत्येक शहरामध्ये तांत्रिकदृष्ट्या सक्षम समन्वय अधिकार्यासह नागरी पूर/पूर व्यवस्थापन यंत्रणा स्थापित करणे. प्रत्येक शहराने …
Read More »अर्थसाक्षर स्पर्धा : 27
अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). क्रिप्टो करन्सी तयार करताना कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो? अ. ब्लॉकचेन आ. मेटा इ. …
Read More »सर्वाधिक नुकसान करतात ते बाजाराविषयीचे गैरसमजच!
भारतीय गुंतवणूकदारांनी शेअरबाजारात गुंतवणूक केली पाहिजे, याविषयी दूमत नाही, मात्र जे आधीच मनात गैरसमज घेऊन बाजारात येतात, त्यांना बाजार धडा शिकवितो. त्यामुळे आपल्याला बाजारात काय करावयाचे आहे, याची स्पष्टता असणे फार महत्वाचे आहे. ही स्पष्टता तांत्रिक विश्लेषणामुळे येवू शकते. ज्या कंपन्यांचे शेअर्स घ्यायचे त्यांचा अभ्यास हा दोन प्रकारे करू शकतो …
Read More »रेल्वेच्या विद्युतीकरणाचा वेग वाढविण्याचे महत्व
डीझेलचा वापर कमी करून पर्यावरणपूरक विजेचा वापर वाढविण्यासाठी सध्या भारतीय रेल्वे प्रयत्नशील आहे. देशात रेल्वे मार्गांचे वेगाने होणारे विद्युतीकरण हा त्याचाच एक महत्वाचा भाग आहे. 2030 पर्यंत रेल्वे 100 टक्के हरित उर्जेवर चालविणे, असे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट सरकारने घेतले असून त्याची तयारी सध्या सर्वत्र चालू असल्याचे दिसते आहे. भारताचे आर्थिक गणित …
Read More »रेड अॅलर्टचे दिवस
गेल्या पाच दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. गेल्या वर्षीसारखी पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सरकारी पातळीवर सर्वतोपरि दक्षता घेतली जात आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर आदि ठिकाणी रेड अॅलर्टचा इशारा जारी करण्यात आला आहे. याचा अर्थ कोकणासह घाटमाथ्यावर देखील येते काही दिवस …
Read More »सुधागडातील रस्ते चकाचक कधी होणार?
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. येथील डोंगर दर्याखोर्यात माळरान, पठारावर विकासाची किरणे पोहचली नाहीत. कोणत्याही विकासाचे मूल्यमापन तेथील रस्त्यांच्या प्रगतीवरून केले जाते, मात्र येथील रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाल्याचे चित्र दिसून येते. सुधागडातील रस्त्यांची पहिल्याच पावसात भयानक अशी अवस्था झालेली पाहायला मिळत आहे. पाली खोपोली …
Read More »धक्क्यांवर धक्के
महाराष्ट्रात घडून आलेल्या सत्तांतराच्या नाट्यानंतर राजकारणाचा ज्वर काहिसा ओसरेल असे वाटले होते. परंतु दिवसेंदिवस तो वाढतोच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांनी केलेल्या एकगठ्ठा उठावानंतर आता शिवसेना या पक्षाला जणु गळतीच लागली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला साथीला घेऊन शिवसेनेने अडीच वर्षांपूर्वी सत्ता काबीज केली, तेव्हा सत्तेचा हव्यास हा …
Read More »विस्कटलेली मने
महाराष्ट्रात अभूतपूर्व सत्तांतर झाल्यानंतर राजकारणाला वेगळीच दिशा मिळणे स्वाभाविकच होते. अचानक झालेल्या पक्षांतर्गत उठावानंतर शिवसेनेचे गलबत खडकावर आपटून त्याच्या ठिकर्या होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिनालाच उठावाची पहिली ठिणगी पडली होती असा गौप्यस्फोट सांगोल्याचे ‘झाडी, डोंगर’फेम आमदार शहाजी बापू पाटील यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. …
Read More »स्वागताच्या तुतार्या
वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानणारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे चतुरस्र नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नवे सरकार अजुन पूर्णत्वाने स्थापन व्हायचे आहे. तरीही या नव्या सरकारच्या स्वागतासाठी महाराष्ट्रभरातील दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते उत्साहाने जल्लोश करताना दिसत आहेत. आठवडाभरापूर्वी ज्यांना पळपुटे बंडखोर असे हिणवले …
Read More »विकासात युवकांना प्राधान्य देणारी पनवेल महापालिका
पनवेल महापालिका एक ऑक्टोंबर 2016मध्ये स्थापन झाली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची सत्ता महापालिकेत आली. डॉ. कविता चौतमोल पहिल्या महापौर झाल्या. परेश ठाकूर यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचा कारभार करताना देशाचे भवितव्य असलेल्या युवकांना ही प्राधान्य …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper