नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि आसाम रायफल्सच्या महासंचालकांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. सीआरपीएफच्या जवानांना कमीत कमी 100 दिवस आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवता येईल अशा पद्धतीने त्यांची नियुक्ती करा, असे शहा यांनी सांगितले आहे. पोलीस टू डिव्हिजनची कामे काय असतात …
Read More »महायुतीला 250 जागा मिळतील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
पुणे : प्रतिनिधी राज्यात महायुतीला 250 जागा मिळतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड मतदारसंघातील उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. या वेळी त्यांनी कोथरूड मतदारसंघातून एक लाख 60 हजारांहून अधिक मताधिक्य घेऊन विजयी होणार, असा दावाही केला. दरम्यान, केंद्रीय …
Read More »कमलनाथांच्या भाच्याने एका रात्रीत उडविले 7.8 कोटी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी याने अमेरिकेतील एका नाइट क्लबमध्ये एका रात्रीत 11 लाख डॉलर्स म्हणजेच सात कोटी आठ लाख रुपये उडविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये पुरीसह त्याचे सहकारी आणि मोजर बेयर इंडिया (प्रायव्हेट) लिमिटेडचेही नाव …
Read More »पंकजा मुंडेंविरुद्ध आक्षेपार्ह विधान; धनंजय मुंडेंवर अखेर गुन्हा दाखल
बीड : प्रतिनिधी राज्याच्या ग्रामविकासमंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत धनंजय मुंडे यांना नोटीस बजावली. यामुळे विधानसभा निवडणुकीत ऐन मतदानाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता …
Read More »भारतीय लष्कराकडून पाक सैनिकांसह दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर : वृत्तसंस्था भारतात दहशतवादी घुसवण्याच्या उद्देशाने पाकिस्तानने रविवारी (दि. 20) पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जम्मू-काश्मीरच्या तंगधार सेक्टरमध्येे पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय लष्कराने प्रत्युत्तर देत सीमेलगत पाकच्या हद्दीत असलेले चार दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त केले. या कारवाईत पाकच्या पाच सैनिकांसह 20 ते 22 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे …
Read More »मनमोहन सिंग सरकारच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली -पीयूष गोयल
पुणे : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती 2014मध्ये सत्ता आल्यापासून सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून सरकार काम करीत आहे. या सरकारने अर्थव्यवस्था अधिक सक्षम केली. पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांमुळे अनेक देशांतील उद्योग आपल्याकडे येत आहेत. याआधी अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री पीयूष …
Read More »मतांच्या लालसेपोटी पवारांना मोतीबिंदू झालाय -अमित शहा
चंद्रपूर : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळकांचा हा प्रदेश आहे. येथेच स्वराज्यासाठी लढाई सुरू झाली होती आणि हे लोक आम्हाला महाराष्ट्र आणि कलम 370चा काय संबंध अशी विचारणा करतात. शरद पवारजी, तुम्हाला मोतीबिंदू झाला आहे. मतांच्या लालसेपोटी तुम्हाला राज्यातील लोकांना काय हवे आहे हेदेखील माहिती नाही, …
Read More »विरोधक हताश आणि निराश : पंतप्रधान मोदी
परळी : प्रतिनिधी विरोधी पक्ष निराश लोकांनी भरलेले आहेत. त्यांना त्यांचे नेते सोडून जात आहेत, तर जे उरले आहेत ते हताश झाले आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 17) विरोधकांना टोला लगावला. राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या परळी येथील सभेत ते बोलत होते. मराठवाडा दुष्काळमुक्त …
Read More »पुढचे युद्ध स्वदेशी शस्त्रांनी जिंकू -लष्करप्रमुख
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लष्करात पुढील काळात स्वदेशी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जणार आहे. यामुळे भारत पुढचे युद्ध स्वदेशात विकसित झालेल्या शस्त्रांनी लढेल आणि जिंकेलही, असा विश्वास लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी व्यक्त केलाय. भारत स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाली, तरीही जगातील सर्वाधिक शस्त्रास्त्र आयात करणार्या देशांमध्ये भारत आघाडीवर …
Read More »महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपत विलीन
कणकवली : प्रतिनिधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अखेर भारतीय जनता पक्षात विलीन झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. 15) कणकवली येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राणे कुटुंबीयांसह स्वाभिमान पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकार्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. या वेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »