Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

कोल्हा‘पूर’; सर्वत्र पाणीच पाणी!

कोल्हापूर : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात निर्माण झालेली पूरस्थिती मंगळवारी (दि. 6) गंभीर बनली. पंचगंगा नदीने रौद्ररूप धारण केले असून, जिल्ह्यातील 107 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अशातच राधानगरी धरण पूर्ण भरल्याने आपत्कालीन दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. कोल्हापूरमध्ये मागील 12 दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे येथील तलाव, नदी, नाले …

Read More »

काश्मीरमधून 370 कलम हद्दपार ; राज्यसभेनंतर लोकसभेतही ऐतिहासिक विधेयक मंजूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यसभेपाठोपाठ मंगळवारी (दि. 6) लोकसभेतही कलम 370 रद्द करण्याचे ऐतिहासिक विधेयक 351 विरुद्ध 72 मतांनी मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचे विधेयकही 366 विरुद्ध 66 मतांनी मंजूर झाले. आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. ही दोन्ही विधेयके मंजूर झाल्याने जम्मू-काश्मीर आणि लडाख ही दोन्ही …

Read More »

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द

मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रातील मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविले आहे. यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी (दि. 5) सादर केलेले ऐतिहासिक जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक 125 विरुद्ध 61 मतांनी राज्यसभेत मंजूर झाले. त्यामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन नवे केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत.  गृहमंत्री …

Read More »

‘साहित्यसंपदा’चे दुसरे साहित्य संमेलन उत्साहात

कोल्हापूर : प्रतिनिधी साहित्यसंपदा समूहातर्फे नुकतेच दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन कोल्हापूर येथे रविवारी (दि. 28 जुलै) झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आणि गझलकार ए. के. शेख, तर स्वागताध्यक्ष स्मित शिवदास होते. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात झालेल्या या सोहळ्यात महाराष्ट्रातील अनेक नामवंत साहित्यिकांनी सहभाग घेतला होता. या वेळी ग्रंथोत्सवाचे …

Read More »

जम्मू-काश्मीरमध्ये हालचालींना वेग; 28 हजार सैनिक तैनात

श्रीनगर : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असतानाच खोर्‍यात सुरक्षा दलाच्या 280 कंपन्या (28 हजार जवान) तैनात करण्यात येत आहेत. श्रीनगरमधील अतिसंवेदनशील तसेच खोर्‍यातील इतर ठिकाणांवर जवान तैनात केले जात आहे. या सुरक्षा दलांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), सशस्त्र सीमा दल (एसएसबी) आणि भारत-तिबेत …

Read More »

रेशनकार्डधारकांना ’अच्छे दिन’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था रेशनकार्डधारकांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. उत्तराखंडातील रेशनकार्ड लाभार्थ्यांना रस्त्यावर असलेल्या सरकारी दुकानातून रेशन घेता येणार आहे. याअंतर्गत राज्य सरकार राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अ‍ॅक्ट (एनएफएसए)अंतर्गत रेशनकार्ड पोर्टेबिलिटी सुविधा देण्याच्या तयारीत आहे. या व्यवस्थेअंतर्गत उत्तराखंडमधील 23 लाख लाभार्थ्यांना कोणत्याही सरकारी दुकानातून धान्य घेता येणार आहे. त्यासाठी …

Read More »

कुलभूषण प्रकरणाची पुनरावृत्ती?

नवी दिल्ली ः कुलभूषण जाधव प्रकरणानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर खोटा आरोप करीत एका कथित भारतीय गुप्तहेराला ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. पाकच्या एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार या गुप्तहेराला पाकच्या पंजाब प्रांतातील डेरा गाजी खान जिल्ह्यातून पकडण्यात आले. लाहोरपासून 400 किमी अंतरावरील हे ठिकाण आहे. राजू लक्ष्मण असे या कथित …

Read More »

दंगलींपेक्षा रस्ते अपघातात अधिक मृत्यू ः गडकरी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था गटांमधील हाणामारी, दंगल किंवा नक्षलवादी-दहशतवादी हल्ल्यांपेक्षा रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी (दि. 31) राज्यसभेत दिली. मोटार वाहन कायदा दुरुस्ती विधेयाकवरील चर्चेदरम्यान ते बोलत होते. देशभरात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या मोठी आहे. दरवर्षी सुमारे 1.5 लाख …

Read More »

काँग्रेसला मोठा धक्का!

गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय संजय सिंह यांची पक्षाला सोडचिठ्ठी नवी दिल्ली ः वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव आणि राहुल गांधी यांनी तडकाफडकी दिलेल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर सुरू झालेली काँग्रेसची घसरण सुरूच आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. 30)  काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून, गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय असलेले उत्तर प्रदेशातील नेते …

Read More »

पंतप्रधान मोदींची जंगल सफारी

बेअर ग्रिल्ससोबत ‘डिस्कव्हरी’मध्ये झळकणार नवी दिल्ली : वृत्तसंस्था सतत व्यग्र असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेगळे रूप लवकरच पाहायला मिळणार आहे. डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या कार्यक्रमात ते झळकणार आहेत. कार्यक्रमाचा सूत्रसंचालक असलेला साहसवीर बेअर ग्रिल्सने यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली. बेअर ग्रिल्सने ट्विटवरून एक टीझर पोस्ट केला आहे. …

Read More »