सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र परीक्षा होणारच, असे कोर्टाने शुक्रवारी (दि. 28) स्पष्ट केले तसेच परीक्षा घेतल्याशिवाय कोणतेही राज्य विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाही, असेही कोर्टाने म्हटले आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा …
Read More »पुण्यातील मानाच्या गणपतींचे यंदा उत्सव मंडपातच होणार विसर्जन
पुणे : प्रतिनिधी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या आणि इतर प्रमुख गणपती मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे. आता गणरायाच्या मूर्तीचे विसर्जनदेखील सांगता मिरवणूक न होता उत्सव मंडपातच केले जाणार आहे, अशी माहिती मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत दिली. मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाचे …
Read More »‘सुरक्षा क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली’
नवी दिल्ली : सुरक्षा क्षेत्रात सुविधांची निर्मिती करण्यात आत्मनिर्भर होण्याची आमची कटिबद्धता फक्त चर्चा किंवा कागदपत्रांपुरती मर्यादित नाही, तर त्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते सुरक्षा परिषदेत बोलत होते. गेल्या कित्येक वर्षांपासून शस्त्रांच्या कारखान्यांना सरकारी विभागाप्रमाणे चालवले जात होते. एका मर्यादित दृष्टिकोनामुळे …
Read More »अमेरिकी निवडणुकीत नरेंद्र मोदींची झलक; ट्रम्प यांच्या व्हिडीओत पंतप्रधानांचा समावेश
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था अमेरिकेतील 20 लाखांहून अधिक प्रभावी भारतीय-अमेरिकन मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचार अभियानाच्या व्यवस्थापकांनी व्हिडीओच्या रूपात आपली पहिली जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे आणि ट्रम्प यांच्या अहमदाबाद येथील ऐतिहासिक संबोधनाचे संक्षिप्त भाग अंतर्भूत करण्यात आले आहेत. …
Read More »टीव्ही-चित्रपटांच्या शूटिंगसाठी केंद्राची नवी नियमावली
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था टीव्ही व चित्रपटांच्या शूटिंगसाठी केंद्र सरकारने विस्तृत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करीत याबाबतची माहिती दिली. या मार्गदर्शक सूचनांमुळे शूटिंगमधील कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी योग्य परिस्थिती निर्माण करण्यास मदत मिळेल, असे जावडेकर यांनी म्हटले आहे. या सूचनांत सर्व ठिकाणी फेस …
Read More »कृषी खाते झोपले आहे का? राज्यमंत्री बच्चू कडूंचा सरकारला घरचा अहेर
अमरावती ः प्रतिनिधी शेतकर्यांसंदर्भात कृषी विभाग गंभीर नाही. आधी बियाणे बोगस निघाले, आता पिकांवर रोग येत आहेत. या भयंकर परिस्थितीत राज्यातील कृषी खाते झोपले आहे की काय, असा सवाल करीत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा अहेर दिला आहे.विदर्भात सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन …
Read More »देशात कोरोना चाचण्यांचा विक्रम; एका दिवसात तब्बल नऊ लाख 99 हजार 864 टेस्ट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात दररोज 50 ते 60 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना चाचणीचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांची संख्याही वाढल्याचे समोर आले आहे. देशात सध्या तीन कोटींपेक्षा जास्त कोरोना चाचण्या झाल्या आहेत. भारताने एका दिवसात नऊ लाख 99 हजार 864 कोरोना चाचण्या …
Read More »पतीसह दोन अपत्यांची हत्या करून डॉक्टर पत्नीची आत्महत्या
नागपूर ः प्रतिनिधी प्राध्यापक पती, मुलगा व मुलीला इंजेक्शन देऊन ठार मारल्यानंतर डॉक्टर पत्नीने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. ही थरारक घटना कोराडीतील ओमनगर येथील जगनाडे ले-आऊट येथे मंगळवारी (दि. 18) दुपारी उघडकीस आली. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने उपराजधानी नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. धीरज डिंगाबर राणे (42), त्यांच्या पत्नी डॉ. …
Read More »रत्नागिरीत अतिवृष्टी; महामार्गावरील वाहतूक बंद
चिपळूण : प्रतिनिधी जोरदार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीला पूर येऊन हे पाणी थेट शहरात शिरले. मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथील पूलही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. रात्रभर कोसळणारा पाऊस व कोयना धरणातून करण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग यामुळे वाशिष्ठी नदीचे पाणी शहरात घुसले आणि बाजारपेठ पाण्याखाली गेली. पाणी …
Read More »एमएसएमई क्षेत्रात पाच कोटी नवे रोजगार निर्माण होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा विश्वास
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे चक्र पूर्णपणे थांबले होते. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हळूहळू अर्थव्यवस्थेचे चक्र सुरू होताना दिसत आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आपल्या देशात एमएसएमई क्षेत्राचे मोठे योगदान आहे. येत्या काळात या क्षेत्रात पाच कोटी नवे रोजगार निर्माण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper