Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

राज्यपालांनी 79व्या वर्षी केला शिवनेरी सर

जुन्नर : प्रतिनिधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वयाच्या 79व्या वर्षी पायी चालत शिवनेरी किल्ला सर केला. अशी कामगिरी करणारे ते पहिलेच राज्यपाल ठरले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन होणे हा माझ्या भाग्याचा क्षण आहे. ते सामान्य व्यक्तिमत्त्व नव्हते, तर अवतारी पुरुष होते. त्यांच्यासारख्या महापुरुषांकडून प्रेरणा मिळते. ते खरे पूजनीय …

Read More »

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ची घोषणा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशाच्या 74व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 15) देशाला संबोधित केले. राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर सलग सातव्यांदा तिरंगा फडकावून पंतप्रधान मोदींनी देशाला अभिवादन केले. देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी अनेक विषयांना हात घातला. महत्त्वाकांक्षी व लोकोपयोगी अशा नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन योजनेची घोषणा पंतप्रधानांनी या …

Read More »

प्रामाणिक करदात्यांसाठी मोदी सरकारचे महत्त्वपूर्ण पाऊल

नवी करप्रणाली जाहीर नवी दिल्ली : वृत्तसंस्थाप्रामाणिक करदात्यांसाठी मोदी सरकारने मोठे पाऊल उचलत नवी करप्रणाली जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ‘पारदर्शी कर आकारणी : प्रामाणिकतेचा सन्मान’ व्यासपीठाचे लोकार्पण गुरुवारी (दि. 13) करण्यात आले. या नव्या व्यासपीठामुळे नियमित कर भरणार्‍यांच्या मनातील भीती दूर होईल, असा विश्वास पंतप्रधान …

Read More »

टाइम्स स्क्वेअरवर फडकणार तिरंगा; भारतीय स्वातंत्र्यदिनी अनोखा सन्मान

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था भारताच्या 74व्या स्वातंत्र्यदिनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकणार आहे. विशेष म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारे राष्ट्रीय ध्वजाचा अनोखा सन्मान होणार आहे. अमेरिकेतील फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशनने (एफआयए) यासंदर्भातील माहिती दिली. 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर …

Read More »

महायुती ‘मातोश्री’वर पाठविणार पाच लाख पत्रे ; दूध दरवाढ आंदोलन

नाशिक : प्रतिनिधी दुधाची दरवाढ न केल्याच्या निषेधार्थ घरात अथवा गोठ्यांमध्ये बसून सरकारचा निषेध करायचा, अशी आंदोलनाची हाक मंगळवारी (दि. 11) महायुतीतर्फे देण्यात आली. त्याचप्रमाणे 13 ते 18 ऑगस्ट या कालावधीत दूध उत्पादकांच्या मागण्यांसंबंधी पाच लाख पत्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी पाठविण्यात येणार आहेत. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत …

Read More »

…तर देश कोरोनाविरुद्ध जिंकेल!

पंतप्रधान मोदींचा विश्वास; मुख्यमंत्र्यांशी संवाद नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात वाढलेल्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 11) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. सर्वाधिक कोरोना संसर्ग असलेली ही राज्ये आहेत. या राज्यांनी कोरोनाला हरवले तर देश जिंकू शकेल, असा विश्वास पंतप्रधानांनी या वेळी व्यक्त केला. …

Read More »

वडिलांच्या संपत्तीत मुलीलाही मिळणार समान वाटा

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय नवी दिल्ली : वृत्तसंस्थावडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीलाही समान वाटा मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात मंगळवारी (दि. 11) ऐतिहासिक निर्णय दिला. त्यामुळे वडिलांच्या संपत्तीत मुलाप्रमाणे मुलीलाही हक्क असावा या मुद्द्यावरील वादावर आता पडदा पडला आहे. 1956मधील हिंदू वारसा हक्क कायद्यात 2005मध्ये सुधारणा करण्यात आली होती. आपल्या पित्याच्या …

Read More »

कोविड सेंटरला भीषण आग; सात रुग्णांचा मृत्यू

हैदराबाद ः वृत्तसंस्था आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे कोविड सेंटर असलेल्या स्वर्ण पॅलेस हॉटेलला रविवारी (दि. 9) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून यात सात रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला, तर 30 जणांना वाचविण्यात यश आले. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना होऊन बचावकार्य सुरू करण्यात आले. शॉर्टसर्किटमुळे ही …

Read More »

101 संरक्षण उत्पादनांची आयात रोखली; संरक्षणमंत्र्यांचे पाऊल, ‘आत्मनिर्भर भारत’च्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी (दि. 9) मोठी घोषणा केली आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी भारताने पहिले पाऊल टाकले आहे. यासाठी संरक्षण उत्पादनाच्या स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी 101 संरक्षण उत्पादनांच्या आयातीवर बंदी घालण्यात येणार आहे. संरक्षण सामुग्रीसाठी 52 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असल्याचेही या वेळी राजनाथ …

Read More »

कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी; एक लाख कोटींचा निधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेतकर्‍यांसाठी मोठी घोषणा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकर्‍यांना स्वस्त कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी एक लाख कोटी रुपयांच्या कृषी पायाभूत सुविधा निधीला सुरुवात केली आहे. पंतप्रधानांनी रविवारी (दि. 9) सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही योजना सुरू केली. जुलै महिन्यात सरकारने कृषी …

Read More »