Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

पंकजा मुंडेंविरुद्ध आक्षेपार्ह विधान; धनंजय मुंडेंवर अखेर गुन्हा दाखल

बीड : प्रतिनिधी राज्याच्या ग्रामविकासमंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत धनंजय मुंडे यांना नोटीस बजावली. यामुळे विधानसभा निवडणुकीत ऐन मतदानाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता …

Read More »

भारतीय लष्कराकडून पाक सैनिकांसह दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : वृत्तसंस्था भारतात दहशतवादी घुसवण्याच्या उद्देशाने पाकिस्तानने रविवारी (दि. 20) पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जम्मू-काश्मीरच्या तंगधार सेक्टरमध्येे पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय लष्कराने प्रत्युत्तर देत सीमेलगत पाकच्या हद्दीत असलेले चार दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त केले. या कारवाईत पाकच्या पाच सैनिकांसह 20 ते 22 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे …

Read More »

मनमोहन सिंग सरकारच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली -पीयूष गोयल

पुणे : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती 2014मध्ये सत्ता आल्यापासून सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून सरकार काम करीत आहे. या सरकारने अर्थव्यवस्था अधिक सक्षम केली. पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांमुळे अनेक देशांतील उद्योग आपल्याकडे येत आहेत. याआधी अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री पीयूष …

Read More »

मतांच्या लालसेपोटी पवारांना मोतीबिंदू झालाय -अमित शहा

चंद्रपूर : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळकांचा हा प्रदेश आहे. येथेच स्वराज्यासाठी लढाई सुरू झाली होती आणि हे लोक आम्हाला महाराष्ट्र आणि कलम 370चा काय संबंध अशी विचारणा करतात. शरद पवारजी, तुम्हाला मोतीबिंदू झाला आहे. मतांच्या लालसेपोटी तुम्हाला राज्यातील लोकांना काय हवे आहे हेदेखील माहिती नाही, …

Read More »

विरोधक हताश आणि निराश : पंतप्रधान मोदी

परळी : प्रतिनिधी विरोधी पक्ष निराश लोकांनी भरलेले आहेत. त्यांना त्यांचे नेते सोडून जात आहेत, तर जे उरले आहेत ते हताश झाले आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 17) विरोधकांना टोला लगावला. राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या परळी येथील सभेत ते बोलत होते. मराठवाडा दुष्काळमुक्त …

Read More »

पुढचे युद्ध स्वदेशी शस्त्रांनी जिंकू -लष्करप्रमुख

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लष्करात पुढील काळात स्वदेशी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जणार आहे. यामुळे भारत पुढचे युद्ध स्वदेशात विकसित झालेल्या शस्त्रांनी लढेल आणि जिंकेलही, असा विश्वास लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी व्यक्त केलाय. भारत स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाली, तरीही जगातील सर्वाधिक शस्त्रास्त्र आयात करणार्‍या देशांमध्ये भारत आघाडीवर …

Read More »

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपत विलीन

कणकवली : प्रतिनिधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अखेर भारतीय जनता पक्षात विलीन झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. 15) कणकवली येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राणे कुटुंबीयांसह स्वाभिमान पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकार्‍यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. या वेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

‘काँग्रेस-राष्ट्रवादी हे नेता, नीती, नियत नसलेले पक्ष’

नाशिक : प्रतिनिधी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष केवळ स्वार्थ बघतात. नेता, नीती आणि नियत नसलेले ते पक्ष आहेत, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी (दि. 14) येथे केली. नाशिक येथील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. भाजपचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांनी सभा सोमवारी नाशिकमध्ये झाली. …

Read More »

भारताने रचला इतिहास!, मायदेशात सलग 11 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम

पुणे : प्रतिनिधी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पुणे येथील दुसर्‍या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून मालिका खिशात घातली. या विजयासह टीम इंडियाने मायदेशात सलग 11 कसोटी मालिका जिंकण्याचा भीम पराक्रम केला आहे. पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला एक डाव आणि 137 धावांनी पराभूत …

Read More »

महायुतीच्या विजयाचा संकल्प करा ः शहा

कोल्हापूर ः प्रतिनिधी महाराष्ट्राच्या भल्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या महायुतीच्या विजयाचा संकल्प करा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापुरातील भाजप व शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ शहा यांची रविवारी (दि. 13) येथील तपोवन मैदानावर महाजनादेश संकल्प सभा झाली. …

Read More »