Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

‘इसिस’चा म्होरक्या बगदादीचा अमेरिकेकडून खात्मा

वॉशिंग्टन : अवघे जग इस्लाममय करण्याची स्वप्ने पाहणार्‍या आणि निष्पाप नागरिकांच्या कत्तली करीत सुटलेला इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरिया अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याचा अमेरिकेने खात्मा केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली. यापूर्वी त्यांनी सकाळी ‘काही तरी मोठे घडलेय’ अशा …

Read More »

पनवेल आगारातील उरण प्रवासी शेडवरील होर्डिंग धोकादायक

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल एसटी स्थानकावरील  उरणला जाणार्‍या गाड्यांच्या प्रवासी शेडवरील जाहिरातीच्या होर्डिंगचे पत्रे लोंबकळत असल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका असल्याचे दिसून येत आहे. उरणला जाणार्‍या प्रवाशांना  कडक उन्हात किंवा पावसात  गाडीची वाट पाहत तासन्तास उभे राहावे लागत आहे. त्यातच पत्रा पडून अपघात झाल्यास त्याची जवाबदारी कोणाची, असा प्रश्न प्रवासी विचारीत …

Read More »

राष्ट्रवादीच्या ‘त्या’ उमेदवार प्रतिनिधीवर गुन्हा दाखल

सातारा ः प्रतिनिधी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत मतदानादरम्यान जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नवलेवाडी (ता. खटाव) गावातील मतदान केंद्रात कोणतेही बटण दाबल्यास मत कमळाला अर्थात भाजपच्या उमेदवाराला जात असल्याचे वृत्त स्थानिक ग्रामस्थांच्या हवाल्याने माध्यमांमधून प्रसिद्ध झाले होते. याप्रकरणी खोटी माहिती प्रसारमाध्यमांना देऊन निवडणूक प्रक्रियेविषयी समाजात गैरसमज पसरवल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतिनिधी दीपक …

Read More »

कोल्हापुरात बॉम्बसाठा जप्त

69 गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ; दोघांना अटक कोल्हापूर : प्रतिनिधी जंगली प्राण्यांच्या शिकारीसाठी गावठी बॉम्ब बनवणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि. 22) रात्री अटक केली आहे. हातकणंगले येथील माले मुडशिंगी गावात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून गावठी बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि 69 जिवंत गावठी बॉम्ब हस्तगत करण्यात …

Read More »

आता झारखंडमध्ये भाजपची मेगाभरती

रांची : वृत्तसंस्था झारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षांना मोठा धक्का दिला आहे. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची तारीखही अजून जाहीर झालेली नाही आणि भाजपने झारखंडमध्ये महाराष्ट्राप्रमाणे मेगाभरतीचा पॅटर्न सुरू केली आहे. माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सुखदेव भगत यांच्यासह विरोधी पक्षांच्या एकूण सहा आमदारांनी भाजपत प्रवेश केला आहे. रांचीमध्ये …

Read More »

शेतमालाच्या आधारभूत दरात वाढ, केंद्र सरकारकडून शेतकर्यांना दिवाळी भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने देशातील शेतकर्‍यांना दिवाळी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 23) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात शेतकर्‍यांना बळ देण्यासाठी रब्बी हंगामातील शेतमालाच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही …

Read More »

जवानांना दरवर्षी कुटुंबासोबत घालवता येणार 100 दिवस, अमित शहा यांचे दिवाळी गिफ्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि आसाम रायफल्सच्या महासंचालकांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. सीआरपीएफच्या जवानांना कमीत कमी 100 दिवस आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवता येईल अशा पद्धतीने त्यांची नियुक्ती करा, असे शहा यांनी सांगितले आहे. पोलीस टू डिव्हिजनची कामे काय असतात …

Read More »

महायुतीला 250 जागा मिळतील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

पुणे : प्रतिनिधी राज्यात महायुतीला 250 जागा मिळतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड मतदारसंघातील उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. या वेळी त्यांनी कोथरूड मतदारसंघातून एक लाख 60 हजारांहून अधिक मताधिक्य घेऊन विजयी होणार, असा दावाही केला. दरम्यान, केंद्रीय …

Read More »

कमलनाथांच्या भाच्याने एका रात्रीत उडविले 7.8 कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी याने अमेरिकेतील एका नाइट क्लबमध्ये एका रात्रीत 11 लाख डॉलर्स म्हणजेच सात कोटी आठ लाख रुपये उडविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये पुरीसह त्याचे सहकारी आणि मोजर बेयर इंडिया (प्रायव्हेट) लिमिटेडचेही नाव …

Read More »

पंकजा मुंडेंविरुद्ध आक्षेपार्ह विधान; धनंजय मुंडेंवर अखेर गुन्हा दाखल

बीड : प्रतिनिधी राज्याच्या ग्रामविकासमंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत धनंजय मुंडे यांना नोटीस बजावली. यामुळे विधानसभा निवडणुकीत ऐन मतदानाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता …

Read More »