Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

इंडिया गेटवर नेताजींच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. 23) इंडिया गेटवर त्यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केले. याच ठिकाणी नेताजींचा ग्रेनाईटचा पुतळा बसवण्यात येणार आहे. या पायाभरणी समारंभात पंतप्रधान मोदी यांनी नेताजींच्या नावाने आपदा प्रबंध पुरस्कार प्रदान केले. या वेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी म्हटले …

Read More »

इंडिया गेटवर बसवणार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा

पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा बसवण्याची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान नेताजींच्या पुतळ्याचे छायाचित्र ट्विट करून त्यांंनी ही माहिती दिली, तसेच येत्या 23 जानेवारीला नेताजींच्या जयंतीनिमित्त होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. देश …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वांत लोकप्रिय नेते ठरले आहेत. त्यांनी जागतिक महासत्ता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह जगातील 13 राष्ट्रप्रमुखांना मागे टाकले आहे. मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने जगातील लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. 13 जागतिक नेत्यांच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 71 टक्के …

Read More »

नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करा – देवेंद्र फडणवीस

गोवा ः प्रतिनिधी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. केवळ शारिरीक उंची असून चालत नाही, तर वैचारिक-बौद्धीक उंचीसुद्धा असावी लागते, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मी मोदी यांना मारू शकतो’, ‘शिवी देऊ …

Read More »

रस्त्यावरची लढाई लढणारा शेवटचा मालुसरा…

एन. डी.  गेले. महाराष्ट्राच्या लढाऊ परंपरेतील शेवटचा मालुसरा धारातीर्थी पडला. गणपतराव देशमुख यांच्या पाठोपाठ एन. डी. यांनी जाणे म्हणजे अन्याय-अत्याचाराविरोधातील रस्त्यावरची लढाई लढणार्‍या सेनापतीनेच जाणे आहे. एन. डी. यांच्या निधनानंतर सामान्य माणसांचा आवाज बुलंद करून रस्त्यावर उतरण्याची हिंमत दाखवणारा आता कोणीही राहीला नाही. तिकडे विदर्भातील जाबुवंतराव असेच अचानक गेले, मृणालताईही …

Read More »

16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा होणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 15) देशातील 150 स्टार्टअप्स उद्योजकांसोबत संवाद साधला. या वेळी त्यांनी दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय स्टार्ट-अप दिन’ म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा केली. स्टार्टअपची संस्कृती देशात सर्वत्र पोहचण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या संवादात …

Read More »

खराब हवामानामुळेच रावत यांचा मृत्यू; हेलिकॉप्टर अपघातासंदर्भात समितीचा प्राथमिक अहवाल

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे पहिले प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. 8 डिसेंबर रोजी ही दुर्घटना घडली होती. या अपघातात एकूण 14 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातासंदर्भात संपूर्ण देशाला प्रश्न पडले होते की, हा अपघात नेमका झाला कसा आणि कशामुळे …

Read More »

आठ आसनी चारचाकी वाहनांत आता सहा एअरबॅग अनिवार्य : नितीन गडकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणार्‍यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (दि. 14) मोठी घोषणा केली आहे. आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्याची माहिती ना. गडकरी यांनी दिली. आपल्या ट्विटमध्ये मंत्री गडकरी म्हटले आहे की, आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये किमान सहा …

Read More »

देशात लॉकडाऊन लागणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशात लॉकडाऊन लागणार नाही, पण अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणायची असेल तर स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोन तयार करून या आजाराला आळा घालण्याची आवश्यकता असल्याचे मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. देशभरातील 30 राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान जनतेशी संवाद साधत …

Read More »

26 डिसेंबर वीर बाल दिवस म्हणून होणार सर्वत्र साजरा; पंतप्रधान मोदींची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 9) गुरू गोविंदसिंग यांची जयंती अर्थात गुरू पर्वानिमित्त मोठी घोषणा केली आहे. आता दरवर्षी 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयाकडे गुरू गोविंदसिंग यांच्या चार पुत्रांना श्रद्धांजली म्हणून पाहिले जात आहे.पंतप्रधान मोदींनी …

Read More »