नवी दिल्ली : भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ होणार आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका अद्यापही टळलेला नाही. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सीरम इस्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या आपतकालीन वापरासाठी परवानगी दिली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …
Read More »‘सेंट्रल विस्टा‘चा मार्ग मोकळा
नव्या संसद इमारत उभारणीस सर्वोच्च न्यायालयाची परवानगी नवी दिल्ली : वृत्तसंस्थासर्वोच्च न्यायालयाने सेंट्रल विस्टा अर्थात संसदेच्या नव्या इमारतीच्या उभारणीला मंजुरी दिली आहे. बांधकामासंबंधीची सर्व योग्य कागदपत्रे केंद्र सरकारकडे असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे.केंद्राने डीडीए कायद्यांतर्गत आपल्या हक्काचा केलेला उपयोग योग्य असल्याचे सांगतानाच जमिनीच्या वापरासाठी मास्टर प्लान 2021मध्ये करण्यात आलेल्या …
Read More »स्मशानभूमीचे छत कोसळून 21 जणांचा मृत्यू
गाझियाबाद : उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर येथे रविवारी (दि. 3) स्मशानभूमीच्या शेडचे छप्पर कोसळून 21 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. अंत्यसंस्कारासाठी आलेले नागरिक पाऊस आल्याने छताखाली उभे राहिले असताना ही दुर्घटना घडली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर अनेक जण ढिगार्याखाली दबले गेले असल्याने …
Read More »कोरोना लशीसंदर्भात भारतीयांना गुड न्यूज!; कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनला मान्यता
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रभावी शस्त्र असलेली लस आता भारतातही लवकरच उपलब्ध होणार आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना देशात आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली आहे. भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय) व्ही. जी. सोमाणी यांनी रविवारी (दि. 3) पत्रकार परिषद घेऊन ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. कोविशिल्ड लस ही …
Read More »सेल्फीमुळे दाम्पत्याचा मृत्यू
गुहागरच्या हेदवी किनारी गेला तोल रत्नागिरी : प्रतिनिधी ठाण्यातून गुहागर येथे पर्यटनासाठी गेलेल्या एका दाम्पत्याला सेल्फीमुळे प्राणास मुकावे लागले आहे. सेल्फी घेतानाच झालेल्या दुर्घटनेत या दाम्पत्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेने पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गुहागरमधील निसर्गरम्य अशा हेदवी-बामणघळ येथे आई व मामेभाऊ यांच्यासमवेत पर्यटनासाठी गेलेले …
Read More »26/11 मुंबई हल्ल्याच्या सूत्रधाराला पाकमध्ये अटक
कराची : वृत्तसंस्था26/11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन कमांडर जकी-उर-रहमान लखवी याला पाकिस्तानात अटक झाली आहे, मात्र या अटकेचा मुंबई हल्ल्याशी संबंध नाही.दहशतवाद्यांना मदत करणे आणि त्यांना फंडिंग केल्याप्रकरणी लखवीवर ही कारवाई करण्यात आली आहे. लखवीने हाफीज सईदसोबत मिळून 26/11 च्या हल्ल्याचा कट रचला होता.लखवीला मुंबई …
Read More »सीरमच्या लसीला मंजुरी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कोरोना लशीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याबाबत शुक्रवारी (दि. 1) दिल्लीत तज्ज्ञांच्या समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कोविशिल्ड लशीला तातडीच्या वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. लशीला मान्यता …
Read More »‘पंतप्रधान मोदी जगातील सर्वांत स्वीकारार्ह नेते’
नवी दिल्ली ः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाचा डंका वाजवला आहे. जगभरातील नेत्यांच्या कार्यकाळातील स्वीकृतीवर नजर ठेवणार्या डाटा फर्मच्या सर्व्हेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 55 टक्के स्वीकृती रेटिंगसह सर्वांत वरच्या क्रमांकावर आहेत. मॉर्निंग कन्सल्ट नावाच्या फर्मच्या नव्या सर्व्हेनुसार सुमारे 75 टक्के लोकांनी मोदींना पाठिंबा दिला …
Read More »भारतात जगातील सर्वांत मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबविणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती; राजकोटमध्ये रुग्णालयाचे भूमिपूजन राजकोट : वृत्तसंस्थाजगातील सर्वांत मोठी कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याच्या दृष्टीने भारतात तयारी सुरू आहे. लसीकरणाची तयारी सध्या शेवटच्या टप्प्यात असून, देशात निर्मिती झालेल्या लशीचा डोस नागरिकांना मिळेल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. ते गुरुवारी (दि. 31) गुजरातमधील राजकोट येथे एम्स रुग्णालयाच्या …
Read More »नव्या कोरोनाचा भारतात शिरकाव
ब्रिटनमधून परतलेल्या सहा जणांना संसर्ग नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाच्या संसर्गाचा वेग कमी होत असतानाच ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या विषाणूने डोकेदुखी वाढवली आहे. वेगाने पसरणार्या कोरोनाच्या या नवीन प्रकाराने जगभरात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. एव्हाना 16 देशांमध्ये पोहचलेल्या या विषाणूने आता भारतातही शिरकाव केला आहे. देशात नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper