Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

‘गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेत नियमानुसारच बदल’

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपात करण्याच्या निर्णयामागे कोणताही राजकीय हेतू नाही. जे काही झाले ते नियमानुसारच झाले आहे, असे संसदीय कार्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेत स्पष्ट केले. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल व प्रियांका यांची एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) सुरक्षा काढून घेण्याचा …

Read More »

इंटरनेट हवे की सुरक्षा?

काश्मीरप्रश्नी अमित शहांचा विरोधकांना प्रतिसवाल नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित करणार्‍या विरोधकांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी (दि. 20) आपल्या खास शैलीत उत्तर दिले. जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सुरळीत आहे, मात्र काही निर्णय घेताना सुरक्षेचा मुद्दा ध्यानात घ्यावा लागतो. काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत कारवाया अजूनही सुरू …

Read More »

सावरकरांना ‘भारतरत्न’साठी शिफारशीची गरज नाही

नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यासाठी शिफारस करण्याची गरज नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी (दि. 19) एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृह मंत्रालयाने सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भातील सूचक वक्तव्य केले. भारतरत्नसाठी अनेक शिफारशी येत असतात, मात्र सावरकरांना हा …

Read More »

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली नाही : शरद पवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सरकार स्थापनेचे शिवसेना-भाजपला विचारा, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभ्रम वाढवलेला असतानाच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा झालीच नसल्याचे सांगून पवार यांनी राज्यातील सत्तास्थापनेचा सस्पेन्स अधिकच वाढवला आहे. सत्तास्थापनेसाठी किमान समान कार्यक्रम तयार करण्याचे आम्ही बोललोच नव्हतो. …

Read More »

राज्यसभेचा प्रवास प्रेरणादायी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्गार नवी दिल्ली : वृत्तसंस्था मागील 250 अधिवेशनांमध्ये राज्यसभेने अनेक स्थित्यंतरे पाहिली. राज्यसभेची ही सत्रे म्हणजे एक विचारधारा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राज्यसभेच्या ऐतिहासिक 250 अधिवेशनानिमित्त त्यांनी सोमवारी (दि. 18) राज्यसभेला संबोधित केले. या सभागृहात अनेक सदस्यांनी इतिहास घडवला, घडताना पाहिला. अनेक …

Read More »

अयोध्येचा निकाल अमान्य, मुस्लिम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने अयोध्येप्रकरणी दिलेल्या निर्णयाविरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाचे सचिव जफरयाब जिलानी यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली. सुप्रीम कोर्टाने हा निकाल देताना मशिदीच्या बदल्यात देऊ केलेली पर्यायी जमीन स्वीकारायची नाही, असाही निर्णय बोर्डाच्या बैठकीत झाल्याचे …

Read More »

पुन्हा भाजपचेच सरकार? ‘काळजी करू नका; भाजप-सेनाच सत्तेत येईल’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने कंबर कसली असताना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी माहिती दिली आहे. राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी आपण भाजप अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावर काळजी करू नका. भाजप-शिवसेना …

Read More »

संसदेचे आजपासून अधिवेशन; शिवसेना ’एनडीए’तून बाहेर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था संसदेचे अधिवेशन सोमवारपासून (दि. 18) सुरू होत आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरून भाजपसोबत काडीमोड घेतलेली शिवसेना आता एनडीएतून बाहेर पडली आहे. संसदेतील दोन्ही सभागृहांत म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेत शिवसेनेचे खासदार विरोधी पक्षात बसणार आहेत. ते विरोधी पक्षांच्या बाकावर बसतील, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी (दि. …

Read More »

अल बगदादी आणि ओवेसी दोघेही सारखेच -वसीम रिझवी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी आणि एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यामध्ये कोणताही फरक नाही, असं धक्कादायक विधान शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केलं आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालायनं दिल्यानंतर वसीम रिझवी यांनी अलीकडेच मंदिराच्या उभारणीसाठी 51 हजार …

Read More »

दहशतवादी भारताकडे सोपवा; तरच संबंध सुधारतील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानात लपलेले मोस्ट वॉन्टेड दहशतवादी पाकने भारताला सोपवावे, तरच भारत-पाकिस्तान संबंध सुधारतील असा इशारा भारतानं पाकिस्तानला दिला आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी हा इशारा दिला आहे. दाऊद इब्राहिमसारखा अपराधी जोपर्यंत भारताच्या ताब्यात देणार नाही, तोपर्यंत संबंध सुधारणार नसल्याचंही ते म्हणाले. एका परदेशी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान …

Read More »