Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

राफेल करार योग्यच!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राफेल विमान खरेदीतील निर्णय प्रक्रिया स्पष्ट आहे. त्यात संशयाला कुठलाही वाव नाही. त्यामुळे त्याच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीची गरज नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त करीत या विरोधातील पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या आहेत. फ्रान्सच्या दसॉल्ट अ‍ॅव्हीएशन कंपनीकडून ही विमाने खरेदी करण्याच्या करारात पूर्वीच्या कराराच्या तुलनेत जास्त रक्कम खर्च …

Read More »

सात वर्षांच्या मुलीने साकारले बालदिनाचे डुडल

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून गुरुवारी (दि. 14) साजरा करण्यात आला. या बालदिनानिमित्त गुगलनेही डुडलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे हे डुडल सात वर्षांच्या विद्यार्थिनीने साकारले. गुगलकडून बालदिनानिमित्त दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी एका स्पर्धेचे आयोजन केले जाते आणि त्यातून एक बेस्ट डुडल गुगलच्या …

Read More »

गायिका गीता माळी यांचे अपघाती निधन

नाशिक : प्रतिनिधी अमेरिकेतील कार्यक्रम आटोपून मुंबई विमानतळावरून परतत असताना नाशिक येथील प्रख्यात गायिका गीता माळी यांच्या कारला शहापूरजवळ गुरुवारी (दि. 14) सकाळी अपघात झाला. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांचे पती अ‍ॅड. विजय माळी यांची प्रकृती गंभीर आहे. गीता माळी या गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिकेत गायनाचे कार्यक्रम करीत …

Read More »

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीचे नितीश कुमार यांच्याकडून समर्थन

पाटणा : वृत्तसंस्था कोणत्याही पक्षाने सत्तास्थापनेचा दावा न केल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे. राज्यात कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकत नसेल, तर कुणीही काय केले असते, असे सांगत बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी समर्थन केले आहे. पाटणातील एका कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्रातील राजकीय स्थितीविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर …

Read More »

लग्नजल्लोषात हवेत गोळीबार; नवरदेवाच्या वडिलांचा मृत्यू

उजैन : वृत्तसंस्था उत्तर भारतात काही लग्न सोहळ्यांमध्ये हवेत गोळीबार करून आनंद व्यक्त केला जातो. सेलिब्रेशनसाठी केल्या जाणार्‍या या गोळीबारामध्ये काही वेळा निष्पाप व्यक्तीचा मृत्यू सु्द्धा होतो. उत्तर भारतात अशा अनेक घटना घडल्या आहेत. आता मध्य प्रदेशात उज्जैनमध्ये लग्नसोहळ्यात सेलिब्रेशन म्हणून केलेल्या गोळीबारात नवरदेवाच्याच वडिलांचा मृत्यू झाला. उज्जैनपासून 30 किलोमीटर …

Read More »

आता मिशन चांद्रयान-3

नोव्हेंबर 2020चे लक्ष्य; ‘इस्रो’कडून तयारी सुरू बंगळुरू : वृत्तसंस्था पहिल्या प्रयत्नात चंद्रावर सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे. सप्टेंबर महिन्यात चांद्रयान-2 मधील विक्रम लँडरचे चंद्रावर हार्ड लँडिंग झाले होते. या अपयशाचा अनुभव गाठीशी घेऊन आता इस्रो चांद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातून पुन्हा प्रयत्न करणार …

Read More »

शिवसेनेचा दावा मान्य नाही!

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शहा यांची स्पष्टोक्ती नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील सत्तापेचावर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपली बाजू प्रथमच मांडली आहे. महायुतीचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असे निवडणुकीपूर्वीच सांगण्यात आले आहे, मात्र निवडणूक निकालानंतर शिवसेना नव्या मागण्या घेऊन समोर आली, असा आरोप शहा यांनी केला. शिवसेनेसोबत मुख्यमंत्रिपद वाटून …

Read More »

विवाहितेची मित्राकडून हॉटेल रूममध्ये हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था वाढदिवसाच्या पार्टीमध्ये वादावादी झाल्यानंतर मित्रानेच मैत्रिणीच हत्या केली. दिल्लीच्या अलीपूर भागातील ओयो हॉटेलमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. विक्की मान असे आरोपीचे नाव असून, मैत्रिणीची हत्या करुन तो पसार झाला होता. त्याला अलीपूर भागातून अटक करण्यात आली आहे. आरोपी विक्की 21 वर्षांचा आहे, तर महिलेचे वय …

Read More »

लग्न मोडण्यासाठी नवरी मुलीनेचे पाठविले प्रियकराकरवी फोटो

चेन्नई : वृत्तसंस्था लग्न थांबवण्यासाठी नवरी मुलीनेच प्रियकराच्या मदतीने आपले फोटो नवर्‍या मुलाच्या मोबाइलवर पाठवल्याची घटना समोर आली आहे. चेन्नईमध्ये ही घटना घडली आहे. हे फोटो पाहिल्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी लग्न मोडले असून, पोलिसांनी मुलगी आणि तिच्या प्रियकराला समज दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. नवरी मुलीच्या …

Read More »

कारसेवकांवरील खटले मागे घ्या

हिंदू महासभेची मागणी नवी दिल्ली : वृत्तसंस्था कारसेवकांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याची मागणी अखिल भारतीय हिंदू महासभेने केली आहे. हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चक्रपाणी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. कारसेवकांवरील खटले मागे घेण्याव्यतिरिक्त …

Read More »