Breaking News

मुंबई – नवी मुंबई

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन

मुंबई ः प्रतिनिधीज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे मंगळवारी (दि. 20) दुपारी 12.30च्या सुमारास निधन झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर तातडीने त्यांना ठाण्यातील इस्पितळात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला. ते नाटकांमध्ये स्त्री भूमिका करीत असत. त्यांनी …

Read More »

‘रेमडेसिवीर’संदर्भात भाजप नेत्यांनी चर्चा केली होती

अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणेंची माहिती मुंबई ः प्रतिनिधीभाजपने औषध कंपन्यांकडून मागविलेला रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा हा महाराष्ट्रासाठीच वापरात येणार होता. या संदर्भात भाजप नेत्यांनी माझ्याशी चर्चाही केली होती, अशी माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली. त्यामुळे भाजपवर आरोप करणारे महाविकास आघाडीतील अन्य मंत्री व नेते …

Read More »

राज्यातील निर्बंध आणखी कडक

संपूर्ण लॉकडाऊनबाबत आज निर्णय जाहीर होणार मुंबई ः प्रतिनिधीसंचारबंदी आणि निर्बंध लावूनही कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणखी कठोर पावले उचलली आहेत. नागरिकांची गर्दी रोखण्यासाठी किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळविक्री, चिकन-मटण विक्रीची दुकाने सकाळी 7 ते 11 याच वेळेत सुरू ठेवता येणार आहेत. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या …

Read More »

कोरोनाबाधितांसाठी नवी मुंबईत हॉस्पिटल उभारा -आमदार मंदा म्हात्रे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर   नवी मुंबई क्षेत्रात भव्य, सुसज्ज व सर्व सुविधांयुक्त हॉस्पिटल उभारण्याकरिता प्रशासनातील सर्व संबंधित अधिकार्‍यांसमवेत आपल्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केली …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांचे सर्वाधिक मृत्यू

नवी मुंबईत कोरोनाबळींमध्ये 80 टक्के पन्नाशीच्या पुढील; तरुणांनाही धोका नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मृत्युदर वाढू लागला असल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. नवी मुंबईत प्रतिदिन पाच ते नऊ जणांचा मृत्यू होत आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू ज्येष्ठ नागरिकांचे होत आहेत. 80 टक्के मृत्यू पन्नाशीच्या पुढील असून त्यांचा …

Read More »

राजकारण करण्यापेक्षा रुग्णसेवा करा -आठवले

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असून परिस्थिती हाताबाहेर जात असताना राज्य सरकार केवळ आरोपबाजीत दंग आहे. केवळ केंद्र सरकारवर आरोप करून चालणार नाही तर रुग्णांना योग्य उपचार सेवा सुविधा दिली पाहिजे. नियोजनाअभावी राज्यात कोरोनाच्या प्रसारावर राज्य सरकार नियंत्रण करू शकले नाही. त्यामुळे राजकारण करण्यापेक्षा रुग्णसेवा करा; …

Read More »

आघाडी सरकारचे गलिच्छ राजकारण; आमदार प्रसाद लाड यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जनतेसाठी 50 हजार रेमडेसिवीर औषधांचा पुरवठा करण्याचे श्रेय भाजपला मिळू नये यासाठी आघाडी सरकारच्या काही मंत्र्यांनी गलिच्छ राजकारण केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे बालीश राजकारण आता थांबवावे असे आवाहन भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी सोमवारी (दि. 19) केले. मुख्यमंत्र्यांच्या या श्रेयवादाच्या खेळामुळे निरपराध …

Read More »

राज्यात संपूर्ण लॉकडाऊन?

मंत्री वडेट्टीवार यांचे संकेत; दोन दिवसांत निर्णय मुंबई ः प्रतिनिधीराज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री दोन दिवसांत या संबंधी निर्णय घेतील, अशी माहिती त्यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दिल्लीत नुकताच सहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला असून, त्याची …

Read More »

‘कोविशिल्ड’चे 20 हजार डोस मनपाला प्राप्त

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त येथील महानगरपालिका क्षेत्रातील 49 केंद्रांवर कोविड लसीकरण केले जात असून दररोज साधारणत: सात हजाराहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत एक लाख 75 हजार 873 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. त्यामध्ये शासनाकडून आणखी 20 हजार कोविशिल्ड लसींचा साठा प्राप्त झालेला असून सर्व लसीकरण केंद्रांवर …

Read More »

नवी मुंबईत दिल्लीतील टोळ्यांचा सुळसुळाट; कर्ज, नोकरीच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त स्मार्ट सिटी म्हणून नावलौकिक मिळत असलेल्या नवी मुंबईत दिल्लीतले गुन्हेगार डोके वर काढत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाडोत्री जागेत कार्यालये थाटून बनावट कंपन्यांच्या माध्यमातून ही फसवणूक होत आहे. अशाच एका टोळीचा उलगडा वाशी पोलिसांनी केला आहे. नोकरी, व्यवसायाच्या बहाण्याने तसेच कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक होत …

Read More »