नवी मुंबईत कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. त्यानुसार बंद करण्यात आलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. तर सुरू असलेल्या …
Read More »कांदा-बटाट्याच्या दरात घसरण
नवी मुंबई : प्रतिनिधी कांद्याच्या दरात प्रचंड वाढ होत असताना घाऊक बाजारात मागील आठवड्याच्या तुलनेत दरात घट झाली आहे. 40 ते 45 रुपयांनी उपलब्ध असलेला कांदा 25 ते 30 रुपयांवर खाली उतरला आहे. दुसरीकडे बटाट्याच्या दरातही घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागच्या महिन्यापर्यंत अगदी, घाऊक बाजारात 20 ते 25 रुपये …
Read More »राज्यात नामर्दांचे सरकार!
भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर घणाघात मुंबई, नाशिक ः प्रतिनिधी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 22 वर्षांच्या एका मुलीचा जीव जातो. वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत, मात्र तरीही कारवाई होत नाही. राज्यात नामर्दांचे …
Read More »महिला सुरक्षेचे विषय तरी राजकारणाच्या पलिकडे असावे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला सुनावले मुंबई : प्रतिनिधी सरकार हे नेहमी पालकत्त्वाच्या भूमिकेत असले पाहिजे. आमची मागणी आहे की, केवळ दबावाचे, गळचेपीचे राजकारण न करता सरकारने आधी दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी. महिला सुरक्षेचे विषय तरी किमान राजकारणाच्या पलिकडे असले पाहिजे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे …
Read More »साहित्य कट्टातर्फे ऑनलाइन मराठी राजभाषा दिन
नवीन पनवेल : प्रतिनिधी साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवीन पनवेलमधील साहित्य कट्टा या संस्थेच्या वतीने मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाइन स्वरूपात झाला. जगू मराठी…जागवू मराठी…मनामनात रुजवू मराठी या घोषवाक्याने संपन्न झालेल्या या कार्यक्रमात साहित्य कट्ट्याच्या सभासदांनी विविध प्रकारच्या साहित्याचे पैलू उलगडून दाखवले. प्रसिद्ध साहित्यिक …
Read More »नवी मुंबईत भाजपचे चक्का जाम आंदोलन
मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासह त्वरित अटक करण्याची मागणी नवी मुंबई : प्रतिनिधी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येप्रकरणात ठाकरे सरकारमधील वन मंत्री संजय राठोड हे दोषी असल्याचा गंभीर आरोप करीत त्यांना त्वरित अटक करा, त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या या मागणीसाठी आमदार श्वेता महाले, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. रामचंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली सायन-पनवेल …
Read More »वनमंत्री संजय राठोडांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर स्वकियांचा दबाव
मुंबई ः प्रतिनिधीपूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी एकीकडे भाजप वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर स्वकियांचाही दबाव वाढताना दिसत आहे. विदर्भातील शिवसेना लोकप्रतिनिधी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याची माहिती मिळत आहे. 1 मार्चपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधी वनमंत्री राठोडांचा राजीनामा घेण्यासाठी आता भाजपसह …
Read More »ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी
शंभरी पूर्ण केलेल्या एम. पद्मनाथन यांचा सत्कार मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणाची तत्परतेने अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली ज्येष्ठ नागरिकांच्या फेस्कॉम या महाराष्ट्र राज्याच्या मुंबई विभागीय संघटनेचे अध्यक्ष शरद डिचोलकर यांनी येथे केले. फेस्कॉमच्या मुंबई प्रादेशिक विभागीय संलग्न असलेल्या दोस्ती एकर्स सिनियर सिटीझन्स क्लबचे सभासद …
Read More »हे तर पळपुटे सरकार -देवेंद्र फडणवीस
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकार अर्थसंकल्प मांडणार, पण त्यावर चर्चा होऊ देणार नाही हे बेकायदेशीर आहे. पूर्ण अधिवेशन व्हायलाच हवे ही आमची मागणी आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत ते आम्हाला मांडायचे आहेत, मात्र, कामकाजापासून पळ काढायचा असे सरकारने आधीच ठरवलेले आहे आणि म्हणून आज आमचे म्हणणे ऐकून घेतले गेले नाही, …
Read More »नवी मुंबईतील मतदारयाद्यांमध्ये बोगस नावे
लाखो रुपये घेत मतदार वाढवले असल्याचा भाजपचा आरोप नवी मुंबई : रामप्रहर वृत्त येथील महानगरपालिका निवडणूक येत्या दोन महिन्यांत लागण्याची शक्यता असल्याने सध्या मनपा प्रशासनाकडून मतदारयाद्या बनविण्याचे काम शेवटच्या टप्यात आले आहे. येत्या आठवड्यातभरात अंतिम मतदान यादी घोषित होणार तोच भाजपने मतदारयादीत 90 हजार बोगस नावे टाकण्यात आल्याचा आरोप केला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper