Breaking News

मुंबई – नवी मुंबई

सोमवारपासून राज्यातील शाळा होणार सुरू; अनेक शिक्षकांना कोरोनाची लागण

मुंबई ः प्रतिनिधीमुंबईसह काही महापालिका वगळता राज्यातील शाळा सोमवार (दि. 23)पासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या कोविड-19 चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अनेक शिक्षकांना कोरोनाची लागणझाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय कितपत योग्य असेल, असा सवाल पालक आणि विद्यार्थ्यांकडून विचारला जात …

Read More »

ज्वेल ऑफ नवी मुंबईत स्वच्छता मोहीम

नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका, इनव्हरमेंट लाइफ संस्था, रॉबिन हूड आर्मी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात रविवारी (दि. 22) स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या वेळी संस्थेचे सदस्य उपस्थित होते. या वेळी अनेक गोण्या कचरा गोळा करण्यात आला. …

Read More »

अवैध वाहनांवर नवी मुंबई आरटीओची कारवाई

नवी मुंबई : प्रतिनिधी वाशी उपप्रादेशिक कार्यालय क्षेत्रात अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या छोट्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारत 25 वाहनांवर कारवाई करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दोन दिवस ही कारवाई करण्यात आली. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एनएमएमटी व एसटी प्रशासनाला दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत होते. महापे …

Read More »

मुख्यमंत्र्यांना बॉलीवूडची, तर चिरंजीवांना पब-बारची चिंता

भाजप नेते आशिष शेलारांचा निशाणा पुणे : प्रतिनिधीराज्यात अनलॉकच्या प्राधान्यक्रमावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शनिवारी (दि. 21) ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. मुख्यमंत्र्यांना बॉलीवूड, तर त्यांच्या चिरंजीवांना पब-बारची चिंता जास्त आहे, असा आरोप शेलार यांनी केला.विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने आमदार शेलार पुण्यात आले होते. त्या …

Read More »

पंतप्रधान आवास योजनेच्या बांधकाम स्थळांना सिडको उपाध्यक्षांची भेट

घरांचा ताबा मार्च 2021 अखेरपर्यंत देण्याचा मानस नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेतील वाशी ट्रक टर्मिनस, खारघर रेल्वे स्थानक, खारघर बस टर्मिनस, खारघर बस आगार, कळंबोली बस आगार, पनवेल आंतरराज्यीय बस स्थानक, नवीन पनवेल (प.) बस आगार, खारघर, सेक्टर-43 आणि …

Read More »

नियमांचे पालन करून शाळा होणार सोमवारपासून सुरू

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेच्या शाळा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. कोरोना काळात शाळा सुरू नसल्या तरी शाळांच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण देणे सुरू …

Read More »

आरोग्य विभाग सतर्क; कोरोना रुग्णवाढीमुळे नवी मुंबईतील अधिकार्यांच्या रजा रद्द

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई पालिकेने कोरोनाच्या वाढत्या रुग्णांना आरोग्य सेवा देण्याची तयारी सुरू केली आहे. नवी मुंबईत दोन दिवसांत करोना रुग्णांची संख्या लक्षवेधी वाढलेली आहे. यासाठी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून दिवसाला प्रतिजन व आरटीपीसीआरच्या चार हजार तपासण्या पुन्हा सुरू करण्याचे आदेश पालिका आयुक्त अभिजित …

Read More »

भगवा तर तुम्हीच हाताने उतरवलात -आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर भाजपाचा महापौर आणायचा असा चंग भाजप नेत्यांनी बांधला आहे. शुद्ध भगवा कोणाचा या मुद्द्यावरुन शिवसेनेवर भाजप टीका करीत आहे. यामध्ये शेलारांनी ट्विटमध्ये म्हटले की, 105 हुतात्म्यांवर ज्यांनी गोळीबार केला..कसाबला ज्यांनी बिर्याणी खायला घातली..याकुबच्या फाशीला ज्यांनी …

Read More »

वाढीव वीजबिलावरुन शिवसेनेला घरचा आहेर

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील वीजबिलावरुन विरोधकांचे लक्ष्य ठरलेले ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर आता शिवसेनेच्या नेत्यांनीच टीका केली आहे. मराठा तरूणांची फसवणूक केल्याचा आरोप मंत्री नितीन राऊत यांच्यावर शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ताळमेळ आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याबाबत नरेंद्र पाटील म्हणाले …

Read More »

कोरोनामुळे मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार

महापालिका आयुक्तांचा निर्णय मुंबई ः प्रतिनिधीमागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून बृह्नमुंबई महापालिकेने आपल्या हद्दीतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी या संदर्भातील आदेश काढला आहे. त्यामुळे आता मुंबईतील शाळा नव्या वर्षातच उघडणार …

Read More »