Breaking News

मुंबई – नवी मुंबई

मनसेचा राज्य सरकारला अल्टिमेटम

सोमवारपर्यंत वीज बिले माफ न झाल्यास तीव्र आंदोलन मुंबई ः प्रतिनिधीकोरोना काळात आलेली वाढीव वीज बिले सोमवारपर्यंत माफ करा, अन्यथा मनसेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा अल्टिमेटम मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नुकताच पत्रकार परिषदेत दिला आहे.महाविकास आघाडी सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईत जनतेचा बळी दिला जात आहे. ही महाराष्ट्राच्या …

Read More »

नवी मुंबई पालिका उभारणार वृद्धाश्रम

आमदार मंदा म्हात्रे यांच्या मागणीला यश नवी मुबंई : रामप्रहर वृत्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात विरंगुळा केंद्र उभारून कौतुकास पात्र ठरलेल्या महापालिकेने आता त्यांच्यासाठी वृद्धाश्रम उभारण्याचे ठरविले आहे. हे वृद्धाश्रम नेरुळ येथे होणार असून यासाठीचा भूखंड करारनामा महापालिका व सिडकोत झाला आहे. लवकरच काम सुरू होणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. आमदार …

Read More »

विधवांसोबत साजरी भाऊबीज ओवाळणी

भाजपचे अन्वर शेख यांचा अनोखा उपक्रम नवी मुंबई : बातमीदार दिवाळीतील पाडव्यासोबत महत्वाचा सण असलेला भाऊबीज तुर्भे विभागात अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. माजी परिवहन सभापती व भाजपाचे पदाधिकारी अन्वर शेख यांनी प्रभाग क्र.69 मधील विधवा महिलांसोबत भाऊबीज साजरी केली. प्रत्येक महिलेला ओवाळणी म्हणून साडी भेट देण्यात आली. या भाऊबीजेच्या …

Read More »

नेरुळ-खारकोपर रेल्वेसेवा आजपासून सुरू

टाळेबंदीत बंद असलेली लोकल पुन्हा प्रवाशांच्या सेवेत नवी मुंबई : रामप्रहर वृत्त टाळेबंदीत बंद असलेली नेरुळ ते खारकोपर लोकल सेवा आठ महिन्यांनी पुन्हा प्रवाशांच्या सेवेत येत आहे. अत्यावश्यक सेवा कर्मचारी आणि महिलांसाठी 20 नोव्हेंबरपासून या मार्गावर आठ लोकल फेर्‍या होतील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. यात नेरुळ ते खारकोपर …

Read More »

खारघरच्या खाडीकिनार्‍यावर सोनचिखल्याचे आगमन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त खाद्याच्या शोधात दरवर्षी नवी मुंबईतील खाडीकिनारी परदेशी पक्षी येत असतात. करावे आणि खारघरच्या खाडीकिनार्‍यावर सध्या पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर (सोनचिखल्या वा सोनटिटवी) हा परदेशी पाहुणा आला असून पक्षीप्रेमींना आकर्षित करीत आहेत. या पक्ष्यांचा मुक्काम पुढील दोन आठवडे असून त्यानंतर पुढील प्रवास सुरू होईल, असे पक्षीमित्र नीलेश …

Read More »

एनएमएमटीच्या तोट्यात आणखी भर; चिंता वाढली

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त अगोदरच तोट्यात सुरू असलेली नवी मंबई परिवहन उपक्रमाची बससेवा आणखी अडचणीत आली आहे. टाळेबंदीपूर्वी महिन्याला सहा कोटींपर्यंत सहन करीत असलेल्या तोट्यात आणखी दोन कोटींची भर पडली आहे. त्यामुळे उपक्रमाची चिंता वाढली आहे.एनएमएमटीची बससेवा सध्या पूर्ण क्षमतेने सुरू आहे. दिवसाला 384 बस विविध मार्गावर प्रवासी वाहतूक …

Read More »

आर्थिक नफ्याचे प्रलोभन दाखवून गंडा नवी मुंबई, मुंबईतील अनेकांची फसवणूक; नऊ आरोपींना बेड्या

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त आर्थिक गुंतवणुकीच्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या प्रमाणात नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक करणार्‍या नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. लॉकडाऊनच्या बहाण्याने कंपनी बंद करून त्यांनी कोट्यवधींचा अपहार केला आहे, मात्र त्याच व्यक्ती नवी कंपनी स्थापन करून पुन्हा नागरिकांची लूट करीत असल्याचे समजताच सुरू असलेल्या सेमिनारवर छापा टाकून …

Read More »

शिवसेना हिंदुत्ववादी राहिलेली नाही

खासदार नारायण राणेंचा घणाघात मुंबई : प्रतिनिधीशिवसेना हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाही. गद्दारी करून ते सत्तेत गेले आहेत. उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नाहीत. तडजोड करणारे, पदासाठी हवे ते करणारे आहेत. त्यामुळे हिंदुत्व विचार व शिवसेना हे समीकरण नाही, असा घणाघात भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर …

Read More »

सिडको अर्बन हाटमध्ये शिल्प मेळा महोत्सव

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा दिवाळीपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या हस्तकला प्रदर्शनाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर सिडको अर्बन हाट येथे 18 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत शिल्प मेळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिल्प मेळ्यात विविध राज्यांतील कारागीर सहभागी होणार असून त्यांनी निर्मिलेली हातमाग व …

Read More »

खारघरच्या तरुणांनी साकारली सिंहगडाची प्रतिकृती

खारघर ः प्रतिनिधी महाराष्ट्राचा मराठमोळा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी, संस्कृती व परंपरेची आठवण किल्ल्यांच्या साक्षीने जागृत करावी, तसेच किल्ले बनवून त्याप्रति आपली आत्मीयता प्रकट करणे व आपले दिवाळीतील लहानपण जागे करण्याच्या हेतूने खारघरमधील युवकांनी एकत्र येऊन सचिन तेंडुलकर मैदान सेक्टर 21 या ठिकाणी सिंहगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती तयार केली …

Read More »