नवी मुंबई ः प्रतिनिधी राज्य सरकारने केलेल्या टाळेबंदी शिथिलीकरणानुसार सोमवारपासून नवी मुंबईतील उपाहारगृहे, मद्यालये खुली करण्यात आली असून पहिल्याच दिवशी कुठेही ग्राहकांची गर्दी दिसून आली नाही. ही परिस्थिती हळूहळू ठीक होईल, असा आशावाद मात्र उपाहारगृह मालकांनी व्यक्त केला आहे, तर रात्री 7 वाजेपर्यंतच मद्यालये खुली राहणार असल्याची अट घालण्यात आल्याने …
Read More »कोरोना प्रतिबंधासाठी पालिकेचा 45 कोटींचा खर्च
अनुदानासाठी शासनाकडे प्रस्ताव नवी मुंबई ः प्रतिनिधी कोरोनावरील उपाययोजनांसाठी नवी मुंबई महापालिकेने सात महिन्यांत 45 कोटी रुपये खर्च केले आहेत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता हा खर्च अजून वाढणार असून पालिकेने शासनाकडे 294 कोटींच्या अनुदानाचा प्रस्ताव पाठविला आहे. कोरोनाच्या लढ्यात पालिकेने मोठ्या प्रमाणात खर्च केला असून प्रस्तावित खर्चाच्या अनुदानापोटीचा एकूण 294 …
Read More »शून्य मृत्यूदराचा पालिकेचा संकल्प; सक्षम आरोग्यसेवेसाठी सज्जता; उपायुक्त दर्जाच्या अधिकार्याची नेमणूक
नवी मुंबई ः प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी नवी मुंबई महापालिका सातत्याने कार्यरत आहे. आता कोरोनाकाळात शून्य मृत्यूदर आणण्याचा संकल्प पालिकेने सोडला आहे. त्यासाठी प्रयत्न केले जात असून दररोज संध्याकाळी शहरात झालेल्या कोविड मृतांचा अहवाल सादर करून त्यावर चर्चा केली जाते. या चर्चेत रिलायन्स, तेरणा यांसारख्या खासगी रुग्णालयांतील निष्णात …
Read More »आजपासून हॉटेल, बार होणार खुले
मुंबई : प्रतिनिधी राज्यात अनलॉक-5च्या टप्प्यात गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार सोमवार (दि. 5)पासून सुरू होणार आहेत. त्यासाठी सरकारने नियमावलीही लागू केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे रेस्टॉरंटस् (कॅफे, कँटीन, डायनिंग हॉल, परवानाधारक फूड अॅण्ड बेव्हरेजेस (एफ अॅण्ड बी) युनिटस्, आऊटलेटस्, हॉटेल, …
Read More »‘मुंबईत सामान्यांसाठी लोकल सुरू करण्याबाबत प्रस्ताव आलेला नाही’
मुंबई : प्रतिनिधी मुंबईत सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आम जनतेला राज्य सरकार आणखी किती दिवस खडतर प्रवासासह वेळ व पैशाचा अधिक भूर्दंड देणार, असा सवाल केला जात आहे. कोरोनामुळे केवळ अत्यावश्यक सेवांसाठी काम करणार्यांना …
Read More »नवी मुंबईत 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक
नवी मुंबई : बातमीदार उत्तर प्रदेशातील हाथरस शहरात झालेल्या अत्याचार प्रकरणाने देश हादरला असता त्याचे पडसाद आता महाराष्ट्र राज्यातही उमटले आहेत. या प्रकरणाची चर्चा सुरु असतांनाच नवी मुंबई शहरातही एका चौदा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाने शहरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात …
Read More »नवी मुंबईतील वाहनांना टोल दरवाढ करू नये -आमदार मंदा म्हात्रे
नवी मुंबई : बातमीदार – राज्य शासनाने नुकताच मुंबईमध्ये येणार्या वाहनांना पाच ते 25 रुपये पर्यंतची टोल दरवाढ केलेली आहे. नवी मुंबई ही मुंबईला लागूनच असल्याने व नवी मुंबईतील वाहने दररोजच मुंबईला ये-जा करीत असल्याने ही टोल दरवाढ नवी मुंबईतील वाहनांना लागू करू नये असे निवेदन बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा …
Read More »नवी मुंबईत दोन लाख कोविड चाचण्या पूर्ण
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत गुरुवारी (दि. 1) अँटिजेन व आरटीपीसीआर चाचण्यांची वाढवलेल्या क्षमतेने नवी मुंबईत दोन लाख कोविड चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. दिवसभरात 383 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला त्यामुळे नवी मुंबईत बधितांची संख्या 37 हजार 056 तर 332 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने बरे झालेल्यांची 32 हजार …
Read More »राज्य सरकारने केलेल्या टोलदरवाढी विरोधात आंदोलन
नवी मुंबई : बातमीदार – राज्य सरकारने नुकताच मुंबई बाहेरील टोलचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक घडी विस्कळीत झालेल्या जनतेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयाविराधात मनसेकडून ऐरोली टोल नाक्यावर या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात आले. तसेच राज्य सरकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या …
Read More »मालमत्ता कर बिलाबाबत दिलासा देण्याची मागणी
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईतील नागरीकांना 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2020 पासून मालमत्ता कराची बिले मिळणे सुरू झाले आहे. देयक 30 दिनांक 30 सप्टेंबर आहे. एका आठवड्यात नागरिकांना मालमत्ता कराची बिले भरणे शक्य नाही. त्यामुळे पालिकेने मालमत्ता कर बिलांच्या देयक तारखेची तारीख 30 सप्टेंबर ते 31 डिसेंबर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper