Breaking News

मुंबई – नवी मुंबई

बँक ऑफ इंडियाकडून हिंदी महिना साजरा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बँक ऑफ इंडिया, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, येथे दरवर्षीप्रमाणे 15 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या काळात हिंदी महिना साजरा करण्यात आला. विभागाच्या सर्व शाखांनी दैनिक कामकाजामध्ये हिंदी भाषेचा वापर केला. सोमवारी (दि. 14) हिंदी दिवस साजरा करण्यात आला. विभागीय प्रमुख एम. अन्बुकमणि व समस्तल कर्मचार्‍यांच्या …

Read More »

नवी मुंबई मनपाच्या आरोग्य, उद्यान व शिक्षण विभागात भ्रष्टाचार

आमदार मंदा म्हात्रे यांचा आरोप; आयुक्तांची घेतली भेट नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिकेने क्षेत्रातील उद्यान विभागाची सर्व कामे मुंबईतील मे.एन.के.शाह इन्फ्राप्रोजेक्ट्स या एकाच ठेकेदाराला देऊनप्रकल्पग्रस्त ठेकेदारांची फसवणूक केली जात आहे. या सोबत महानगरपालिकेच्या आरोग्य, उद्यान व शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आमदार मंदा म्हात्रे यांनी केला. …

Read More »

कोरोना रुग्णांमध्ये महाराष्ट्र जगात चौथा

मुंबई : प्रतिनिधीकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत असतानाच कोविड-19 रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र जगात चौथ्या स्थानी पोहोचला आहे. जागतिक पातळीवर सर्वाधिक कोरोनाबाधित अमेरिकेत आहेत. त्याखालोखाल भारत दुसर्‍या क्रमांकावर, तर ब्राझिल तिसर्‍या क्रमांकावर आहे. चिंताजनकची बाब म्हणजे कोरोनाबाधितांच्या संख्येत आपल्या देशातील महाराष्ट्र राज्याने जगात चौथे स्थान गाठले आहे.जगात सर्वाधिक रुग्णसंख्येत चौथ्या स्थानी …

Read More »

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार

मुंबई : रायगड जिल्ह्यातील माथेरान येथील दिवंगत ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केल्याबद्दल त्यांचे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी दूरध्वनीवरून आभार मानले.पत्रकार संतोष पवार यांचे नुकतेच कोरोनाने अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने वृत्तपत्रसृष्टी …

Read More »

वाशीत सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित

नवी मुंबई : बातमीदार – वाशी सेक्टर सेक्टर 3, 4, 6, 7 व 8 मध्ये महत्त्वाच्या मार्गांवर नऊ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. भाजप स्थानिक माजी नगरसेविका विद्या गायकवाड व माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांच्या माध्यमातून हे कॅमेरे लावण्यात आले. त्यामुळे वाशीसारखा नवी मुंबईतील महत्वाचा भाग सुरक्षित झाला आहे. माजी नगरसेविका …

Read More »

कोविड सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार

भाईंदर : प्रतिनिधीभाईंदरमधील कोविड सेंटरमध्ये एका 20 वर्षीय महिलेवर बाऊन्सरने सलग तीन दिवस बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणी गरोदर राहिल्यानंतर तिने ही बाब आपल्या पतीला सांगितल्यावर हा प्रकार समोर आला. या तरुणीला तिचा पती घटस्फोट देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.भाईंदर येथील कोविड सेंटरमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात ही …

Read More »

स्वतःचीच जबाबदारी विसरणे ही तर सरकारची असंवेदनशीलता

राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे टोला मुंबई : प्रतिनिधीखासगी सेवेतील डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचार्‍यांना जर या विम्याचे कवच केंद्र सरकारच्या योजनेनुसार उपलब्ध आहे तर राज्य सरकार कोणत्या न्यायाने ते नाकारत आहे? याला असंवेदनशीलता नाही म्हणायचे तर काय म्हणायचे? सरकार डॉक्टर्सना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार, पण सरकार स्वतःची जबाबदारी विसरणार …

Read More »

…तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?; ‘रोखठोक’ला संदीप देशपांडेंचे ‘मनसे’ उत्तर

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात ठाकरे ब्रॅण्डचा जोर हवा, असे म्हणत शिवसेना नेते तथा दै. सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक सदरातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातली आहे. त्याला राज यांनी उत्तर दिलेले नाही, मात्र मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ‘अभिमन्यू जेव्हा एकटा लढत होता तेव्हा …

Read More »

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात गढूळ वातावरण निर्माण झाले आहे. ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे तो सत्ताधारी शिवसेना पक्ष सूडबुद्धीने काम करीत आहे. हे राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी या पुढे आलेल्या मागणीला माझा पाठिंबा असून …

Read More »

कायद्याचे राज्य आहे की एका बबड्याच्या फायद्याचे?; भाजपचा शिवसेनेला टोला

मुंबई : प्रतिनिधी वडाळ्याच्या हिरामणी तिवारीचे मुंडन, ठाण्यात कर्तव्यावरील महिला पोलिसावर हल्ला, आता निवृत्त नेव्ही अधिकार्‍याला मारहाण… पक्षाची भूमिका काय? तर म्हणे, संतप्त, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, पण इथे कायद्याचे राज्य आहे ना? की एका बबड्याच्या फायद्याचे?, असा सवालवजा टोला आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. …

Read More »