Breaking News

मुंबई – नवी मुंबई

मुंबईसह कोकणात जलधारा बरसणार?

पुणे : मुंबईसह कोकण तसेच उत्तर महाराष्ट्रात येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 6 ऑगस्टपर्यंत ही स्थिती कायम राहणार असून, मुंबई, ठाणे व उत्तर महाराष्ट्रात याचा जास्त प्रभाव जाणवेल. 4 ऑगस्ट रोजी उत्तर बंगालच्या उपसागरात मान्सूनचा अधिक प्रभाव आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याच्या शक्यतेमुळे …

Read More »

भाजपतर्फे नवी मुंबईत एल्गार आंदोलन

नवी मुंबई : बातमीदार – गाईच्या दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्यावे तसेच दूध भुकटीला 50 रुपये प्रति किलो अनुदान द्यावे. यासाठी भाजपातर्फे नवी मुंबईत दुधाच्या गाड्या अडवून जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. भाजपाने मविआविरोधात 1 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार नवी मुंबईत …

Read More »

चिनी वस्तूंविरोधात भाजपची मोहीम तीव्र

नवी मुंबई ः बातमीदार लडाखमधील गलवान क्षेत्रात चीनने युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली. त्यानंतर चीनला भारताने जशाच तसे उत्तर दिल्यानंतर चीनने नमते घेतले. चीनला संपूर्ण देशानेही जशाच तसे उत्तर देण्याची हीच वेळ आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने याकरिता आपले योगदान देणे गरजेचे आहे. याकरिता नवी मुंबई भाजपतर्फे व्यापारी बांधवांना चिनी बनावटीच्या वस्तूंची …

Read More »

लोकनेते दि. बा. पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि सिडको यांच्यात बैठक; विविध विषयांवर सकारात्मक चर्चा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त लोकनेते दि. बा. पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि सिडको व्यवस्थापन यांच्यात शुक्रवारी (दि. 31) सिडको भवनात बैठक झाली. या वेळी सिडको संपादित जी प्रकल्पग्रस्त गावे आहेत त्यांना रस्ते, गटारे, समाजमंदिर, मैदान, जलकुंभ, जिम, हॉस्पिटल, शाळा यांसारख्या नागरी सोयीसुविधा तातडीने पुरवाव्यात, असे संघर्ष समितीकडून सिडको …

Read More »

महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा टोला

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे एक कुटुंबाप्रमाणे असल्याचे दाखवले जाते, पण एकमेकांशी सुसंवाद नसलेले हे सरकार म्हणजे कुटुंब नसून लिव्ह इन रिलेशनशिप आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, मी इतिहासाचा अभ्यासक आहे. अशा प्रकारचे …

Read More »

महिलांसाठी विशेष बस-रेल्वेची सुविधा द्यावी

आमदार मंदा म्हात्रे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी नवी मुंबई ः बातमीदार कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असताना याचा सर्वाधिक फटका नोकरदार महिलावर्गाला बसला आहे. यातच लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर गेली चार महिने कार्यालये बंद असल्याने सक्तीच्या रजेवर असलेल्या नोकरदार महिलांना नवी मुंबई ते मुंबई अशा प्रवासाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. …

Read More »

सीवूड्समध्ये कृत्रिम तलाव निर्माण करा; भाजपच्या दत्ता घंगाळे यांची मागणी

नवी मुंबई : बातमीदार भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन सीवूड्समधील प्रश्न मांडले. यात आगामी कोरोना कालावधीतील गणेशोत्सव लक्षात घेऊन सेक्टर 46 येथील मैदानात विसर्जनासाठी कुत्रिम तलावाची निर्मिती करण्याची मागणी केली. त्यासोबत प्रभाग क्रमांक 111 मधील सेक्टर 44 येथील सबवे …

Read More »

बालवाडी मदतनीसांना भाजपचा दिलासा

नवी मुंबई पालिका देणार पुनर्नियुक्तीसहित थकित मानधन नवी मुंबई : बातमीदार बारा हजार रुपयांच्या मासिक अल्प वेतनावर काम करणार्‍या नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील बालवाडी मदतनिसांना मे 2020 पासूनचे थकित वेतन मिळावे त्याचप्रमाणे त्यांना पुनर्नियुक्तीचे आदेश द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने (शिक्षक नेते कै. शिवाजीराव पाटील अण्णा प्रणित) …

Read More »

दहावीचा निकाल 95.30 टक्के; यंदाही मुलींची बाजी

कोकण विभाग राज्यात अव्वल मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च 2020मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल 95.30 टक्के लागल्याची माहिती शिक्षण विभागाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी बुधवारी (दि. 29) पत्रकार परिषदेत दिली. निकालात या वर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे, तर कोकण विभाग यंदा अव्वल …

Read More »

ग्राहकांना वाढीव वीज बिलामध्ये मिळणार सूट

आ. मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश नवी मुंबई : प्रतिनिधी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सततचा पाठपुरावा व प्रयत्नांना यश आले असून सदर बाबत शासनामार्फत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव वीज बिलामध्ये 20 ते 30 टक्के सूट देण्यात येणार असून त्याचा 93 टक्के वीज ग्राहकांना लाभ होणार आहे. त्यामुळे वीज …

Read More »