Breaking News

मुंबई – नवी मुंबई

रस्त्यांचे रिसर्फेसिंगचे काम सुरू

खारघरमध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यश खारघर : प्रतिनिधी येथील सेक्टर 12 ते 21मधील रस्त्यांचे रिसर्फेसिंगचे काम मंगळवारी (दि. 19) सेक्टर 19मध्ये सुरू झाले. यासाठी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. ते श्रेय या सर्वांचेच आहे. टेंडर होईपर्यंत गेल्या तीन वर्षांत सेक्टर 19मधील इतर अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यांचाही …

Read More »

गुरुद्वारात मोफत नेत्रतपासणी शिबिर

नवी मुंबई ः प्रतिनिधी जागतिक मधुमेह दिनानिमित्त डोळ्यांचे आरोग्य जपणार्‍या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत असलेल्या लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटतर्फे खारघर येथील गुरुद्वारामध्ये नुकतेच मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 156 नागरिकांनी सहभाग घेतला व यातील 32 नागरिकांना नेत्रपटलाशी संबंधित आजार असल्याचे निदान झाले. त्यांना पुढील तपासणीसाठी खारघर येथील …

Read More »

अतिवेगावर उतारा

सुसाट वाहने चालवल्यास होणार दंड; अत्याधुनिक वाहनांद्वारे होणार कारवाई नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्यात वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्यात आल्या आहेत. यापुढे वेगमर्यादेपेक्षा सुसाट वाहने चालवल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, तर या दंडाबाबतचे थेट चलान वाहनचालकाला घरपोच मिळणार आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाकडे आलेल्या …

Read More »

कोकणातील 105 प्रयोगशील शिक्षकांचा गौरव

ठाणे ः प्रतिनिधी कोकणातील पाच जिल्ह्यांत सर्जनशील, उपक्रमशील आणि नावीन्यपूर्ण प्रयोग राबवून शिक्षण देणार्‍या 105 शिक्षक व संस्थांचा रविवारी (दि. 17) गौरव करण्यात आला. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे स्मृतिप्रीत्यर्थ ठाण्यात रंगलेल्या पुरस्कार सोहळ्यानिमित्ताने कोकणातील शैक्षणिक विश्वातील बुद्धिमंतांचे स्नेहसंमेलनच भरले होते. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे …

Read More »

देवेंद्र फडणवीसांनी शिवतीर्थावर वाहिली बाळासाहेबांना आदरांजली

मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. रविवारी (दि. 17) सकाळपासून शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शिवतीर्थावर जात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे, आमदार शिवेंद्रराजे …

Read More »

कल्याणच्या पत्रीपुलाचे काम फेब्रुवारी 2020 अखेर पूर्ण होणार

कल्याण : प्रतिनिधी कल्याणच्या पत्री पुलाचं काम फेब्रुवारी 2020 अखेर पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करण्यात येईल. तसंच तिसर्‍या प्रस्तावित पुलाचं काम जून 2020मध्ये सुरू होईल. पत्री पुलाच्या गर्डरचं काम 50 टक्के पू्र्ण झालंय. गर्डर तयार करण्याचे काम हैद्राबाद येथील ग्लोबल स्टील कंपनीमध्ये सुरु आहे. कामाची पाहणी करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे …

Read More »

कर्नाळा बँकेतील घोटाळा अखेर उघड

भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेचा घोटाळा आता उघडकीस आला आहे. या बँकेत 59 बोगस खाती उघडून 125 कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज संचालक मंडळाने लंपासकेले आहे. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) विशेष लेखापरीक्षण करून सहकार आयुक्तांना अहवाल दिला होता. …

Read More »

माजी विद्यार्थ्यांनी केला शाळेत बालदिन साजरा

खारघर : रामप्रहर वृत्त बेलपाडा प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी त्याच शाळेतील विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा केला. सभापती प्रभाग समिती (अ) व नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या पुढाकाराने रा. जि. प. बेलपाडा या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा केला. या वेळी विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल, रबर,  शार्पनर, स्केच पेन देण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसह अल्पोपहार करण्यात …

Read More »

‘स्मार्ट वॉच’मुळे कर्मचार्‍यांचे नुकसान

नवी मुंबई : प्रतिनिधी पालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांना ‘स्मार्ट वॉच’ प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे वेळेवर पगार मिळालेला नाही, तर काहींचे वेतन कापण्यात आलेले आहे. या विरोधात गुरुवारी मुख्यालयासमोर कर्मचार्‍यांनी ठिय्या दिला आणि पालिका अधिकार्‍यांना मुख्यालयाच्या आवारातून बाहेर वा बाहेरून आत येण्यास मज्जाव केला. नवी मुंबई पालिकेच्या मुख्यालयासमोर प्रवेशद्वार बंद आंदोलनामुळे अनेक अधिकारी …

Read More »

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक प्रा. एन. डी. पाटील यांना जाहीर

मुंबई : प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी कृषी औद्योगिक समाजरचना, व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य संस्कृती, कला, क्रीडा या क्षेत्रांमध्ये लक्षणीय कामगिरी करणार्‍या महाराष्ट्रातील व्यक्तीस, संस्थेला यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येते. रोख रक्कम दोन लाख रुपये व मानपत्र असे या पारितोषिकाचे …

Read More »