Breaking News

मुंबई – नवी मुंबई

सिडको महागृहनिर्माण योजनेची सोडत

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको महागृहनिर्माण योजनेतील 9,249 आणि स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील उर्वरित 810 घरांसाठीची संगणकीय सोडत मंगळवारी (दि. 26) रोजी नेरूळ येथील आगरी कोळी भवन येथे सकाळी 11.00 वा. यशस्वीरीत्या झाली. सदर सोडतीच्या निकालाचे थेट प्रेक्षपण वेबकास्टिंगच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे अर्जदारांना घरबसल्या संपूर्ण सोडत …

Read More »

संजय राऊतांना वेड लागलंय, वेड्यांच्या रुग्णालयात न्यावं लागणार

भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे प्रत्युत्तर मुंबई : प्रतिनिधी शिवसेना खासदार संजय राऊत यांना वेड लागले आहे. सत्ता येण्याची वाट पाहतानाच ते वेडे झाले आहेत. लवकरच त्यांना वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करावे लागेल, अशा शब्दांत भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राऊत यांना चोख प्रत्युत्तर दिले. दानवे यांनी सोमवारी …

Read More »

नुकसानग्रस्त शेतकर्यांसाठी 5,380 कोटी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिलासा मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन निधीतून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी पाच हजार 380 कोटी रुपये मंजूर केले आहेत. सीएमओच्या ट्विटर अकाऊंटवररून मुख्यमंत्र्यांनीच ही माहिती दिली आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे सरकार राज्यात येणार …

Read More »

आज सिडको महागृहनिर्माण योजनेची सोडत

नवी मुंबई : सिडको वृत्त सिडको महागृहनिर्माण योजनेतील 9,249 आणि स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील उर्वरित 810 घरांसाठी मंगळवारी (दि. 26) नेरूळ येथील आगरी कोळी भवन येथे सकाळी 10.00 वा. संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीला पर्यवेक्षक म्हणून महाराष्ट्राचे माजी उपलोकायुक्त सुरेश कुमार, राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्राचे उपसंचालक मोईझ हुसेन अली हे …

Read More »

नवीन पनवेल येथे मधुमेह जनजागृती अभियान

पनवेल ः बातमीदार डॉ. कीर्ती समुद्र यांच्या वतीने सलग 22व्या वर्षी मधुमेह मोडेम या विषयावर जनजागृतीतून मधुमेह नियंत्रण हा कार्यक्रम दि. 1 डिसेंबर रोजी नवीन पनवेल सेक्टर 6 येथील फडके विद्यालयामध्ये आयोजित केला आहे. यामध्ये डॉ. अरविंद (बाळासाहेब) लिमये, डॉ. अमित लंगोटे, डॉ. संजीव कालकेकर, डॉ. निशिता मेश्राम या तज्ज्ञ …

Read More »

राज्यात स्थिर सरकार देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे ट्विट; पंतप्रधानांचे मानले आभार

मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी ट्विटरद्वारे पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ‘आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ, मोदीजी तुमचे खूप खूप आभार,’ असे ट्विट पवारांनी केले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचेही आभार मानले आहेत. त्यामुळे …

Read More »

शपथविधी काळोखात नव्हे, रामप्रहरी झाला; रामाला विसरलेल्यांनी शिकवू नये!, भाजप नेते आशिष शेलार यांचा राऊतांवर पलटवार

मुंबई : प्रतिनिधी आम्ही सकाळी 6 वाजता शाखेत जाणारे स्वयंसेवक आहोत. हा रामप्रहर असतो. शपथविधी रामप्रहरी झाला. या वेळेत सगळी चांगलीच कामे केली जातात, पण जे रामालाच विसरले त्यांना हे काय कळणार? चोरून केलेले काम कोणते हे त्यांनी आम्हाला शिकवू नये, अशा शब्दांत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना …

Read More »

‘येत्या काळात शिवसेनेत मोठा भूकंप होणार’

मुंबई : आगामी काळात शिवसेनेत मोठा भूकंप होणार आहे. शिवसेनेचा एक गट भाजपला येऊन मिळणार, असे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही भाजपलाच पाठिंबा देतील, असा गौप्यस्फोट भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे. राणा हे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील आमदार असून, ते विधानसभेवर तिसर्‍यांदा निवडून आले आहेत. …

Read More »

रितेश-जेनेलियाच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला स्टार किड्सची हजेरी

मुंबई : प्रतिनिधी अभिनेत्री रितेश देशमुख आणि त्याची मॉडेल-अभिनेत्री पत्नी जेनेलिया डिसुझा यांच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला स्टार किड्सने हजेरी लावली. अर्थातच, त्यांचे पालकही या वेळी उपस्थित होते. मराठी आणि हिंदी कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणार्‍या अभिनेता रितेश देशमुख याच्या चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू असतानाच त्याची मुले आणि संपूर्ण कुटुंबसुद्धा …

Read More »

खासदार संजय काकडेंनी घेतली शरद पवार यांची भेट

मुंबई : प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर सुनावणी सुरू होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय खासदार संजय काकडे यांनी ‘सिल्व्हर ओक’ला येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. काकडे यांच्या पवार भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना वेग आला आहे, मात्र आपली ही खासगी भेट असून, …

Read More »