Breaking News

मुंबई – नवी मुंबई

सोने विकले नाही : आरबीआय

मुंबई : प्रतिनिधी रिझर्व्ह बँकेकडील (आरबीआय) सुवर्णसाठा आता विक्रीला काढण्यात आला असून, बँकेने जुलैपासून बाजारात 1.15 अब्ज डॉलर सोनेविक्री केली आहे, असे वृत्त माध्यमांमध्ये पसरले होते, मात्र आरबीआयने हे वृत्त फेटाळून लावले आहे. आम्ही सोन्याची विक्री किंवा कोणताही व्यापार केलेला नाही, असे स्पष्टीकरण बँकेने दिले आहे. रिझर्व्ह बँकेने तीन दशकांनंतर …

Read More »

नवी मुंबईतील दोन्ही जागांवर महायुती विजयी

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर या दोन्हीही मतदार संघात एकतर्फी विजयश्री खेचत महायुतीचे दोन्हीही उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले. विशेष म्हणजे महाआघाडी व इतर पक्षाच्या उमेदवारांना महायुतीच्या दोन्हीही उमेदवारांना जवळपासही मतदान झाले नाही. त्यामुळे नवी मुंबईतील दोन्हीही मतदारसंघात महायुतीचा जोर दिसून आला. महत्वाचे म्हणजे निवडून …

Read More »

‘पीएमसी’च्या खातेदारांना दिलासा

अतिरिक्त 50 हजार रुपये काढता येणार मुंबई : प्रतिनिधी पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमसी बँक खातेदारांना आता 40 हजारांशिवाय अतिरिक्त 50 हजार रुपये काढता येणार आहेत. महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. निकडीचा प्रसंगाच्या वेळीच ही 50 हजार रुपयांची …

Read More »

मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

10 हजारांवर कर्मचार्‍यांची नियुक्ती; मतमोजणी केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे नजर मुंबई ः प्रतिनिधी राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी 10 हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी बुधवारी (दि. 23) दिली. गुरुवारी सकाळी …

Read More »

पीएमसी बँकेतील खातेदारांचा पैसा सुरक्षित -आरबीआय

मुंबई : प्रतिनिधी पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेतील खातेदारांचा पैसा सुरक्षित आहे. केंद्रीय बँकेचे गव्हर्नर त्यावर लक्ष ठेवून आहेत, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मंगळवारी (दि. 22) स्पष्ट केले. पीएमसी बँकेतील खातेदारांशी झालेल्या बैठकीत हा निर्वाळा देण्यात आला. याबाबत केंद्र सरकार अधिक माहिती देणार असून, यासंदर्भात 27 ऑक्टोबर रोजी …

Read More »

सातार्‍यातील ‘त्या’ तक्रारीत तथ्य नाही : निवडणूक आयोग

मुंबई : सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि कोरेगाव विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान सोमवारी (दि. 21) मतदान केंद्र क्रमांक 250 नवलेवाडी येथे ईव्हीएममध्ये बिघाड होऊन कोणत्याही उमेदवारासमोरील बटण दाबल्यास मत कमळाला अर्थात भाजपच्या उमेदवाराला जात असल्याचे वृत्त स्थानिक ग्रामस्थांच्या हवाल्याने माध्यमांमधून प्रसिद्ध झाले होते, मात्र सातार्‍यातील संबंधित मतदान केंद्रावर असे काही घडले नसल्याचे …

Read More »

कमी मतदानामुळे उमेदवारांना चिंता

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील बेलापूर व ऐरोली या दोन मतदारसंघात पन्नास टक्यांपेक्षा कमी मतदान झाल्याने प्रमुख पक्षांच्या चार उमेदवारांची चिंता वाढली आहे. पावसाची रिपरिप आणि त्यानंतर कडाक्याचे उन्ह, तीन दिवसाच्या सुट्टीचा बेत, मतदानातील उदासीनता, नोकरदारांचे स्थलांतर आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणेवरील संशय यामुळे मतदानाची टक्केवारी गेल्या निवडणुकीपेक्षा घसरली असल्याची …

Read More »

पनवेलची वाजेकर विद्यालयात तर उरणची मतमोजणी जासई शाळेत

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त कोकण विभागात विधानसभा निवडणूक-2019 मतमोजणीसाठी स्वतंत्र केंद्रांची व्यवस्था पूर्ण करण्यात आली असून रायगड जिल्ह्यातील पनवेल मतदारसंघाची मतमोजणी के. ई. एस. इंदूबाई वाजेकर इंग्लिश मीडियम विद्यालय, पनवेल येथे होणार आहे. कर्जतची श्री. साईकृपा शेळके बंधू मंगल कार्यालय, किरवली ता. कर्जत 410201 जि. रायगड, 190-उरण रा. जि. …

Read More »

उरणमध्ये विक्रमी 74 टक्के

मतदारांचा दांडगा उत्साह; मतदान प्रक्रिया शांततेत नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील बेलापूर, ऐरोली, पनवेल आणि उरण मतदारसंघातील शहरी भागांत मतदानाचा टक्का घटला. उरण आणि पनवेल मतदारसंघातील ग्रामीण भागांत मतदारांनी उत्साह दाखवला. सोमवारी सकाळी पाऊस आणि दुपारी उन्हाचा तडाखा वाढला असताना मतदारांचा उत्साह मावळलेला दिसला. बेलापूरमध्ये 44 टक्के, ऐरोलीत …

Read More »

राज्यात मतदानाचा टक्का घसरला; पावसाचा फटका

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी सोमवारी (दि. 21) मतदान झाले. यंदा मतदारांमध्ये तितकासा उत्साह दिसला नाही. त्यातच राज्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने त्याचा मतदानावर परिणाम झाला, मात्र काही ठिकाणी पाऊस नसतानाही मतदारांनी निरुत्साह दाखवला. त्यामुळे एकूणच मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसून आले. राज्यात सहा वाजेपर्यंत अंदाजे 55.31 टक्के मतदान …

Read More »