मुंबई : प्रतिनिधी बल्क ड्रग पार्कची सुरुवात दिघी पोर्टतून सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (दि. 7) झालेल्या औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाच्या अपेक्स अॅथॉरिटीच्या पहिल्या बैठकीत दिली. महाराष्ट्र मुख्यमंत्री यांनी केलेल्या सूचनेला पीएम गतीशक्ती योजनेअंतर्गत चालना देण्यात येईल आणि दिघी पोर्टबाबत विशेष आढावा ऑक्टोबरपर्यंत घेतला जाईल, अशी …
Read More »ओवेपेठ विद्यालयात विद्यार्थी मंत्रीमंडळ निवडणूक उत्साहात
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर-ओवेपेठ येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात मंगळवारी (दि. 5) शालेय विद्यार्थी मंत्रीमंडळ निवडणूक कार्यक्रम उत्साहात झाला. लोकशाहीमध्ये मतदार हे महत्त्वाची भूमिका बजावतात व योग्य उमेदवार निवडून देतात. आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुजान नागरीक असतात. त्यांना लोकशाही, निवडणूक, मंत्रीमंडळ, राजकीय पक्ष, नागरिकांची …
Read More »शेतकर्यांसाठी भात शेती, मत्सपालन प्रशिक्षण
खारघर : प्रतिनिधी पनवेल येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व खारजमीन संशोधन केंद्र पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने भातशेतीमध्ये मत्स्य पालनाचे प्रशिक्षण नुकतेच पार पडले. मत्साशास्त्रज्ञ डॉ. विवेक वर्तक यांनी यावेळी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. भातशेतीतील मत्स्य संवर्धनाचे फायदे, माशांचे आहारातील महत्व, मत्स्य व्यवसायापासून रोजगार निर्मितीची संधी, …
Read More »पंढरपूरला जाणार्या वारकर्यांच्या वाहनांना टोल माफ
मुंबई : प्रतिनिधी कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणार्या वारकर्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकर्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. वारकरी दिंड्यांवर जास्त लक्ष द्या, …
Read More »कामोठेवासीयांच्या मदतीसाठी नगरसेवक विकास घरत धावले
पनवेल : वार्ताहर गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कामोठे वसाहतीमध्ये अनेक सखल भागात पाणी तुंबले होते. या वेळी नगरसेवक विकास घरत हे तत्परतेने रहिवाशांच्या मदतीला धावले. सिडकोच्या गलथान कारभारामुळे अनेक ठिकाणी गटारे तुंबली होती. वाढत्या पावसाच्या जोरामुळे काही झाडे सुद्धा पडली होती. वाढत्या पावसाच्या प्रवाहामुळे अनेक गटारात पाणी …
Read More »गेल्या अडीच वर्षात कोण राज्य चालवतंय तेच समजत नव्हते
भाजपाचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला मुंबई : प्रतिनिधी गेली अडीच वर्ष ही अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार, अत्याचाराची गेली. राज्यात प्रशासन नावाची गोष्टच नव्हती. कोण कुणाचे ऐकत नव्हते. अनेक राजे काम करत होते. कोण राज्य चालवतंय तेच समजत नव्हते. सामान्य माणसाचं कुणी ऐकायला तयार नव्हते. शिवाजी महाराज हे आपले आराध्य …
Read More »‘एसबीआय’तर्फे ग्रंथ भेट व वृक्षारोपण
नवी मुंबई : बातमीदार स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या 67व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील बँकेच्या शाखेमार्फत नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ग्रंथालयास 200 पुस्तकांची ग्रंथभेट देण्यात आली. या वेळी नवी मुंबई महापालिकेचे समाज विकास विभाग उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, स्मारकाच्या सुविधा …
Read More »युवकांचा भाजपमध्ये प्रवेश
नवी मुंबई : बातमीदार नेरूळ येथील अनेक युवकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय भवनात हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. या वेळी उत्तर भारतीय मोर्चाचे ज्येष्ठ प्रदेश सरचिटणीस प्रद्युम्न शुक्ला, युवा प्रदेश संयोजक विक्रम खुराना, प्रदेश प्रवक्ते विनोद उपाध्याय, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश पाल, जिल्हा सरचिटणीस सुभाष विश्वकर्मा, उपाध्यक्ष …
Read More »जुन्या इमारतींकडे विशेष लक्ष
नवी मुंबई महापालिका करणार स्ट्रक्चरल ऑडिट नवी मुंबई : बातमीदार नेरूळ सेक्टर 17 येथील जिमी पार्क इमारतीच्या ए विंगमधील दुर्घटनेच्या अनुषंगाने तसेच पावसाळी कालावधीत खबरदारी घेत भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कार्यवाहीस सुरूवात केली आहे. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी याविषयी संबंधित अधिकार्यांची विशेष बैठक घेत शहरातील 30 …
Read More »राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली घोषणा
मुंबई : नव्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदारांची अभिनंदनपर भाषणे झाली व शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. या वेळी त्यांनी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या, ज्यामध्ये इंधनावरील व्हॅट कमी करण्यासाठी लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 …
Read More »