मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन आहे. देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राने कायमच देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. सेवा, कृषी, आरोग्य अशा क्षेत्रांत महाराष्ट्राने उत्कृष्ट काम केले असून महाराष्ट्रात येणार्या काळात बांधण्यात येणारे रस्ते, रोप वे …
Read More »राज्यातील 92 नगरपालिकांसाठी 18 ऑगस्टला मतदान
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यासाठी 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून लगेचच दुसर्या दिवशी म्हणजे 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया 20 जुलैपासून सुरू होणार आहे. राज्यातील पर्जन्यमान कमी असलेल्या 17 जिल्ह्यांतील 92 नगर परिषदा आणि …
Read More »नवी मुंबईत चार दिवसांत 22 झाडे कोलमडली
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त कोकण किनारपट्टीला हवामान खात्याने हायअलार्ट जारी केल्यानुसार सोमवारपासून शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नवी मुंबई पालिका क्षेत्रात गेल्या चार दिवसांत 22 झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. शहरात 1 जुलैपासून सुमारे 840 मिमी पावसाची नोंद झाली आहे. महापालिकेच्या माध्यमातून नालेसफाई, धोकादायक वृक्षांची छाटणी …
Read More »नवी मुंबईकरांना भामट्या महिला गँगची दहशत
नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबईत घरात घुसून चोरी करणार्या महिलांची गँग सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. या महिलांच्या पेहरावावरून या महिला निराश्रीत वाटत आहेत. सिडकोची बैठी घरे हेरून व एकत्र जात या महिला चोरी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नवी मुंबईत खळबळ माजली असून नागरिकांमध्ये घाबराट पसरली आहे. …
Read More »सीबीडी परिसरातील मलनिस्सारण वाहिन्या जीर्ण
परिसरात दुर्गंधी; वाहिन्या बदलण्याची मागणी नवी मुंबई ः प्रतिनिधी, बातमीदार गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे सीबीडीतील जीर्ण मलनिस्सारण वाहिन्यांतून दुर्गंधीयुक्त पाणी गळत आहे. परिणामी, येथील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सीबीडी सेक्टर 2मध्ये ए टाईपची 19 चौमीची बैठी घरे आहेत, तर सेक्टर …
Read More »कोपरखैरणे ते ठाणे मार्गावर विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू
भाजप आमदार रमेश पाटील यांच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबई ः बातमीदार कोपरखैरणे (चिकणेश्वर बसस्थानक) तीन टाकी ते ठाणे व्हाया तळवली, गोठवली, राबाडा गावमार्गे पटणी रोड अशी बससेवा नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ही बस सुरू करण्याबाबत भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार …
Read More »दिघी पोर्टचे काम जलदगतीने सुरू करणार-मुख्यमंत्री
मुंबई : प्रतिनिधी बल्क ड्रग पार्कची सुरुवात दिघी पोर्टतून सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (दि. 7) झालेल्या औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाच्या अपेक्स अॅथॉरिटीच्या पहिल्या बैठकीत दिली. महाराष्ट्र मुख्यमंत्री यांनी केलेल्या सूचनेला पीएम गतीशक्ती योजनेअंतर्गत चालना देण्यात येईल आणि दिघी पोर्टबाबत विशेष आढावा ऑक्टोबरपर्यंत घेतला जाईल, अशी …
Read More »ओवेपेठ विद्यालयात विद्यार्थी मंत्रीमंडळ निवडणूक उत्साहात
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर-ओवेपेठ येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात मंगळवारी (दि. 5) शालेय विद्यार्थी मंत्रीमंडळ निवडणूक कार्यक्रम उत्साहात झाला. लोकशाहीमध्ये मतदार हे महत्त्वाची भूमिका बजावतात व योग्य उमेदवार निवडून देतात. आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुजान नागरीक असतात. त्यांना लोकशाही, निवडणूक, मंत्रीमंडळ, राजकीय पक्ष, नागरिकांची …
Read More »शेतकर्यांसाठी भात शेती, मत्सपालन प्रशिक्षण
खारघर : प्रतिनिधी पनवेल येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व खारजमीन संशोधन केंद्र पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने भातशेतीमध्ये मत्स्य पालनाचे प्रशिक्षण नुकतेच पार पडले. मत्साशास्त्रज्ञ डॉ. विवेक वर्तक यांनी यावेळी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. भातशेतीतील मत्स्य संवर्धनाचे फायदे, माशांचे आहारातील महत्व, मत्स्य व्यवसायापासून रोजगार निर्मितीची संधी, …
Read More »पंढरपूरला जाणार्या वारकर्यांच्या वाहनांना टोल माफ
मुंबई : प्रतिनिधी कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणार्या वारकर्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकर्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. वारकरी दिंड्यांवर जास्त लक्ष द्या, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper