Breaking News

मुंबई – नवी मुंबई

चिरले-खालापूर रस्त्याचा बृहद आराखडा तीन महिन्यांत सादर होणार

मुंबई : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील चिरले-खालापूरदरम्यान रस्ता बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा बृहद आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून आराखड्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुढील तीन महिन्यांत आराखडा पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर कमी करण्यासाठी सागरी सेतूची उभारणी करण्यात येत आहे. या सागरी सेतूमुळे …

Read More »

नवी मुंबईतील गवते दामत्याने समर्थकांसह घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईच्या दिघा भागातील मातब्बर माजी नगरसेवक नवीन गवते, माजी नगरसेविका अपर्णा गवते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 19) माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात स्वगृही प्रवेश केला. त्यांनी बुधवारी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात अविष्कार अभिमुखता व्याख्यान

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बुधवारी (दि. 20) अविष्कार अभिमुखता व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानात महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डॉ. हर्षा गोयल यांनी प्रमुख वक्ते म्हणून भुमिका बजावली. या व्याख्यानामधे वक्त्यांनी विद्यार्थी व विद्यार्थीनीना संशोधनाचे प्रकार, महत्त्व, …

Read More »

दिघ्यात संरक्षक भिंतीमुळे फुटपाथची दुरवस्था

नवी मुंबई : बातमीदार दिघा विभागातील मुकुंद कंपनी लगत रामनगर जवळ अमीन कंपनीने भूखंड क्र. बी-01 येथे मोठ्या प्रमाणात संरक्षण भिंत बांधण्याचे काम चालू आहे. अमीन कंपनीच्या संरक्षण भिंतीचे काम करण्यात येत त्या भिंती लगतच महापालिकेने नागरिकांना ये जा करण्यासाठी फुटपाथ बांधण्यात आलेला आहे, परंतु संरक्षण भिंतीच्या कामामुळे संपूर्ण फूटपाथची …

Read More »

नवी मुंबईत बेकायदा फेरीवाल्यांची गर्दी

रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे आरोग्य धोक्यात नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात फक्त 7226 अधिकृत परवानाधारक फेरीवाले असून कोरोनाकाळातील आर्थिक संकटानंतर बेकायदा फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. ऐन पावसाळ्यात बेकायदा मटनशॉप तसेच रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे नागरिकांचे आरोग्य …

Read More »

ही वेळ का आली याचे आत्मचिंतन करा : रामदास कदम

मुंबई : प्रतिनिधी माझी हकालपट्टी करण्याआधी मी राजीनामा दिला आहे. त्यामुळे हकालपट्टी करण्याचा प्रश्नच येत नाही, असे म्हणत रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ‘मातोश्री’वर बसून हकालपट्टी करणे एवढेच काम शिल्लक राहिले आहे का? हकालपट्टी करण्याची वेळ का आली आहे याचे आत्मचिंतन करा, असा सल्लाही त्यांनी …

Read More »

39 प्रभागांतील मतदार संख्येत बदल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त काही दिवसांपूर्वी आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय जाहीर करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी शनिवारी अंतिम करण्यात आली आहे. यात प्रारूप यादीच जाहीर केलेली 8,45,524 मतदार संख्या कायम ठेवण्यात आली आहे. 41 प्रभागांपैकी  प्रभाग क्रमांक 1 व 21 हे 2 प्रभाग वगळता इतर 39 …

Read More »

नवी मुंबईत शिवसेनेला धक्का

दिघा विभागातील माजी नगरसेवकांचा भाजपत प्रवेश नवी मुंबई : बातमीदार दिघा विभागातील दिग्गज माजी नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते, दीपा गवते आणि गवते परिवाराने त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह स्वगृही म्हणजेच भारतीय जनता पक्षामध्ये मंगळवारी (दि. 19) प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. माजी प्रभाग समिती सदस्य दामोदर कोटीयन, माजी …

Read More »

शिवसेना खासदारांमध्येही उभी फूट

12 जणांची शिंदे गटाच्या बैठकीला उपस्थिती मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. शिवसेनेचे अनेक आमदार, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्तेदेखील शिंदे गटात सहभागी झाले आहेत. यानंतर आता शिवसेनेच्या खासदारांमध्ये फूट पडली असून 12 खासदार सोमवारी (दि. 18) मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलाविलेल्या बैठकीला उपस्थित होते. …

Read More »

राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत नवी मुंबईतील खेळाडूंचे सुयश

नवी मुंबई : बातमीदार अहमदनगर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय सिनिअर अ‍ॅण्ड मास्टर किकबॉक्सिंग स्पर्धेत नवी मुंबईतील 30 खेळाडूंनी सहभाग घेत सहा सुवर्ण, दोन रौप्य आणि सहा कांस्यपदके जिंकली. सुमारे 30 जिल्ह्यांतील 900पेक्षा जास्त खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धा महाराष्ट्र किकबॉक्सिंग अससोसिएशचे अध्यक्ष निलेश शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या …

Read More »