Breaking News

मुंबई – नवी मुंबई

पामबीच मार्गाच्या वेगावर येणार नियंत्रण

अपघात कमी करण्यासाठी बसविणार रंबलर्स नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील पामबीच मार्ग हा वाहन चालकांचा पसंतीचा रस्ता म्हणून सुपरिचित आहे. तथापि या रस्त्यावर  होणारे अपघात हा चिंतेचा विषय असून या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका वाहतुक पोलीसांच्या सहयोगाने प्रयत्नशील आहे. याकरिता आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त  …

Read More »

वारंवार खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे खारघर

भाजपकडून महावितरणकडे आंदोलनाचा इशारा खारघर : रामप्रहर वृत्त उन्हाळ्याचे दिवस सुरू होताच गेल्या काही दिवसांपासून खारघर-तळोजा शहरामध्ये वेळीअवेळी वीजपुरवठा कोणत्याही पूर्वसूचना न देता खंडित केला जात आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी तसेच व्यावसायिकांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा कारभार उन्हाळ्यामध्ये नियोजन शून्य झालेला असून आठवड्यात अनेक …

Read More »

…तर चौदा वर्षे जेलमध्ये राहण्यास तयार -नवनीत राणा

मुंबई : प्रतिनिधी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा आणि त्यानंतरच्या नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत असलेल्या खासदार नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. समर्थकांनी भगवी शाल, हनुमान चालिसेची प्रत आणि हनुमानाची प्रतिमादेखील नवनीत राणा यांना भेट देण्यात आली आणि औक्षणही करण्यात आले. …

Read More »

‘त्याचा‘ निर्णय जनतेने करावा

भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा शिवसेनेवर पलटवार जालना:प्रतिनिधी आम्ही त्यांना युतीतून बाहेर काढलं की ते पळून गेले, याचा निर्णय जनतेने करावा. लग्न आमच्याशी ठरलं होतं. मात्र ते दुसर्‍यांसोबत पळून गेले.असा घणाघाती आरोप भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलाआहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र …

Read More »

खारघरमधील बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई सुरू

भाजप नेते प्रभाकर घरत यांच्या पाठपुराव्याला यश खारघर : रामप्रहर वृत्त येथील सेक्टर 3मध्ये मुख्य रस्त्यावर स्कायवॉकच्या खाली काही नागरिक बेकायदेशीर पार्किंग करून कामाला जातात. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते व अपघातही होतात. म्हणून या बेकायदा पार्किंगवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भाजप नेते प्रभाकर घरत यांनी खारघर पोलीस ठाण्याचे …

Read More »

नवी मुंबईत होणार पहिला फ्लेमिंगो महोत्सव

14 मे रोजी आयोजन; पाणथळ संवर्धनासाठी हरितप्रेमी एकवटले नवी मुंबई ः बातमीदार जागतिक स्थलांतरीत पक्षी दिवस (डब्ल्यूबीएमडी) 14 मे रोजी साजरा करण्याच्या अनुषंगाने पर्यावरणप्रेमी गट एकत्र आले आहेत. त्या अनुषंगाने शहरात पहिला फ्लेमिंगो महोत्सव रंगणार आहे. स्थलांतरीत पक्षी आणि त्यांच्या अधिवासांचे संवर्धन करणे हा या अभियानामागचा उद्देश आहे. जगभरातील स्थलांतरीत …

Read More »

नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीत अग्नितांडव

आठ कंपन्यांना आग; चार कामगार जखमी नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमध्ये शुक्रवारी (दि. 6) आठ कंपन्यांना भीषण आग लागून चार कामगार जखमी झाले आहेत. त्यांना वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातीला एका कंपनीला आग लागून ती पसरली. या आगीत इतर सात कंपन्यांचेही नुकसान झाले …

Read More »

उन्हाळी सुट्टीमुळे मुलांचे लसीकरणाचा वेग मंदावला

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त उन्हाळी सुट्टीपूर्वी 12 ते 14 वयोगटातील मुलांना किमान पहिली लसमात्रा शंभर टक्के देण्याचे नियोजन नवी मुंबई महापालिकेने केले होते मात्र वाढलेला उन्हाचा पारा व लागलेली सुट्टी यामुळे या लसीकरणाचा वेग मंदावला आहे. दरम्यान सुट्टीकाळातही शहरात मुलांची लसीकरण सुरू ठेवण्यात येणार आहे. नवी मुंबई महापालिकेने 18 …

Read More »

तांत्रिक बिघाडामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित

वाशी, कोपरखैरणे परिसरात जनित्र जळाल्याने अडचण; पनवेलकरही हैराण नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशी, कोपरखैरणे परिसरात जनित्र जळाल्याने गुरुवारी (दि. 5) सकाळपासून पनवेल व नेरुळ परिसरात महापारेषणच्या मुख्य वीजवाहिनीत बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. दुपापर्यंत हळूहळू वीजपुरवठा पूर्ववत झाला. वीज नसल्याने लघुउद्योजकांनाही फटका बसला तर आधीच उष्णतेने हैराण झालेल्या …

Read More »

आवक वाढूनही हापूसच भाव चढलेला

दोनशे ते पाचशे रुपये प्रति डझन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त अवकाळी पावसामुळे हापूस आंबा झाडावरून काढून बाजारात पाठविण्याचे प्रमाण मागील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने तुर्भे येथील एपीएमसीच्या फळ बाजारात दररोज सत्तर हजारांपेक्षा जास्त हापूस आंबा विक्रीसाठी येत आहे. आवक वाढूनही हापूसचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. आकारानुसार हापूस आंबा …

Read More »