Breaking News

मुंबई – नवी मुंबई

बारावीत यंदाही कोकणची बाजी

राज्याचा निकाल 94.22 टक्के; मुली ठरल्या सरस मुंबई : प्रतिनिधी राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के इतका लागला आहे. या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभाग अव्वल ठरला आहे, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. निकालात …

Read More »

भाजपतर्फे मालकंस गृहसंकुलात वृक्षारोपण

नवी मुंबई : प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून घणसोली येथे नव्याने झालेल्या सिडको प्रकल्पांतर्गत मालकंस गृहसंकुलात  भारतीय जनता पार्टी, घणसोली विभाग आणि स्थानिक रहिवाशांच्या वतीने वृक्षलागवड करण्यात आली. दरम्यान, या वृक्षारोपण कार्यक्रमात माझी सोसायटी माझी जबाबदारी या वाक्याचे ब्रीद वापरून सोसायटीच्या परिसरामध्ये अनेक प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या …

Read More »

आ. गणेश नाईकांच्या इशार्याने पालिकेला जाग

बेलापूरच्या होल्डिंग पाँड स्वच्छतेसाठी उपाययोजना सुरू नवी मुंबई : बातमीदार बेलापूर येथील होल्डिंग पाँडच्या स्वच्छतेला सुरुवात केली नाही तर स्वतः पोकलेन घेऊन हा होल्डिंग पाँड साफ करण्याचा इशारा  आमदार गणेश नाईक यांनी महापालिका प्रशासनाला दिला होता. यानंतर हादरलेल्या पालिका प्रशासनाने होल्डिंग पाँड्स सफाईच्या अनुषंगाने तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. …

Read More »

महावितरणचा वर्धापन दिन भांडुप परिमंडळात उत्साहात

मुंबई ः प्रतिनिधी महावितरणच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त भांडूप परिमंडलातील विविध मंडळ कार्यालयातर्फे कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भांडूप परिमंडळ व ठाणे मंडळ कार्यालयाचे कार्यक्रम मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात कोंकण प्रादेशिक विभागाचे, सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे, भांडूप परिमंडळचे मुख्य अभियंता धनंजय औढेंकर, भांडूप परिमंडळाच्या अधीक्षक …

Read More »

शिरवणेत दूषित पाणीपुरवठा

नागरिक संतप्त; माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी अधिकार्‍यांना विचारला जाब नवी मुंबई ः प्रतिनिधी शिरवणे गाव व सेक्टर 1 परिसरातील रहिवाशांना मागील दोन महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता, तसेच येणारे पाणी दूषित व गढूळ असल्याने नागरिक संतप्त झाले. याबाबत भाजपच्या माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी मनपाच्या पाणी पुरवठा …

Read More »

बारावीच्या परीक्षेचा बुधवारी निकाल; विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्सुकता

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. 8) जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. यंदा परीक्षेदरम्यानचा गोंधळ टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या कोविड सुरक्षिततेचा …

Read More »

केबीपी कॉलेजतर्फे शिवस्वराज्य दिन सोहळा

नवी मुंबई : बातमीदार कर्मवीर भाऊराव पाटील (केबीपी) कॉलेज वाशी यांच्यातर्फे सोमवारी (दि. 6) शिवस्वराज्य दिन सोहळा आयोजित केला केला. त्यामध्ये सकाळी वाशी येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला एनसीसी कमांडर व महाविद्यालयाच्या प्राचार्या यांनी हार घालून अभिवादन केले तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकांनी लेझीम …

Read More »

रुग्णवाढ रोखण्यासाठी उपाययोजना

नवी मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये नवी मुंबई : बातमीदार मागील पंधरवड्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने अभ्यासपूर्वक नियोजन करण्यासाठी महापालिका आयुक्त  अभिजित बांगर यांनी सर्व रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी तसेच आठही विभाग कार्यालयांचे विभाग अधिकारी यांच्याशी वेबसंवाद साधला. कोरोनाबाधित रुग्ण …

Read More »

शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणे गरजेचे

ना. रामदास आठवले यांचे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत विधान नवी मुंबई : रामप्रहर वृत्त केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे. आरपीआयला बीएमसी निवडणुकीत 35 ते 36 जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. तसेच यापैकी आरपीआयच्या 18 ते 20 जागा निवडून …

Read More »

खारघर येथील अनाथालयामध्ये फळे व खाऊचे वाटप

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम खारघर : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्ताने खारघरमधील अनाथालयामध्ये फळवाटप व खाऊवाटप करण्यात आले. खारघर सेक्टर 12 मधील गिरिजाघर वेलफेअर असोसिएशनमधील अनाथालयाला भेट देऊन पनवेल महानगरपालिका प्रभाग 5 चे नगरसेवक रामजी बेरा यांनी दरवर्षीप्रमाणे फळवाटप व खाऊवाटप हा उपक्रम …

Read More »