Breaking News

महत्वाच्या बातम्या

चिंध्रण येथे मोफत आधार कार्ड शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष चिंध्रण पंचायत समिती वतीने पोस्ट आपल्या दारी या मोहिमेंतर्गत मोफत आधार कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद लाभला. पनवेल तालुक्यातील चिंध्रण येथे आयोजित या शिबिराला ओबीसी रायगड जिल्हा अध्यक्ष एकनाथ देशेकर, चिंध्रणचे सरपंच कमला देशेकर, तालुका चिटणीस नामदेव जमदाडे, रवींद्र पाटील, …

Read More »

भाजप युवा नेते हॅप्पी सिंग यांच्या माध्यमातून कामोठ्यात पणती व उटणे वाटप

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कौतुक पनवेल : वार्ताहर भाजप युवा नेते हॅप्पी सिंग यांच्या माध्यमातून रविवारी (दि. 31) कामोठे येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात कामोठेवासीयांना उटणे व पणतीचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी त्यांच्या कार्याचे कौतुक करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, विविध सामाजिक बांधिलकीद्वारे येथील …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते खोपटेत शाळा इमारतीचे भूमिपूजन

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरणमधील डीपी वर्ल्ड या कंपनीच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेच्या खोपटे येथील शाळेची नवीन इमारत बांधण्यात येत आहे. या इमारत बांधकामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 31) करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमदार महेश बालदी, न्हावा-शेवा टर्मिनल पोर्टचे डायरेक्टर व …

Read More »

शेलूतील चार जणांविरोधात अॅट्रॉसिटी दाखल

कर्जत : बातमीदार शेलू गावातील एका जागेमध्ये बांधकाम करण्यावरून झालेल्या या वादानंतर नेरळ पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 15 ऑक्टोबर रोजी नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या शेलू गावात घडली असून कुंडलिक नागो वाघ यांनी ही तक्रार दाखल केली. कर्जत तालुक्यात येत असलेल्या नेरळ शेलू …

Read More »

पोलीस स्मृतिदिनानिमित्त शहीद पोलिसांना आदरांजली

मुरूड : प्रतिनिधी 21 ऑक्टोबर हा दिवस म्हणजे पोलीस स्मृतिदिन.    पोलीस कर्मचार्‍यांची निष्ठा, सर्वोच्च बलिदानाचा सन्मान करण्यासाठी, तसेच शहीद पोलिसांच्या शौर्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी, कर्तव्याची आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी याकरिता रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड पोलीस अलिबाग येथील बॅण्ड पथक येऊन मुरूड शहरातील विविध ठिकाणी बॅण्डद्वारे …

Read More »

खालापूर टोल नाक्यावर दोन अपघातात चार जखमी

खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर टोल नाका अपघात नाका झाला असून शनिवारी (दि. 30) दोन अपघातात चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पहिल्या अपघातात स्विप्ट डिझायर कार क्रमांक एमएच-03-सीपी-6864 शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास मुंबई हून पुण्याकडे जात असताना खालापूर टोल नाका येथे टोल भरण्यासाठी थांबली होती. त्या …

Read More »

माणगावात एसपी फिटनेस हबचे प्रवीण पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

माणगाव : प्रतिनिधी माणगाव येथील प्रसिद्ध युवा क्रिकेटपटू सुहेब अकबर परदेशी यांनी माणगावात जुने पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी प्रशस्त हॉलमध्ये अत्याधुनिक व्यायाम साहित्यासह  एसपी फिटनेस हब नावाने जिम्नॅशियम सुरू केले आहे. या जिम्नॅशियमचे उद्घाटन शनिवारी (दि. 30) सायंकाळी 5:30 वा. माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांच्या हस्ते …

Read More »

डिसेंबरमध्ये रंगणार एपीएल क्रिकेट स्पर्धा

240 खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पूर्ण अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील झिराड येथील साई क्रीडा मंडळ पुरस्कृत अलिबाग प्रीमियर लीग (एपीएल) क्रिकेट स्पर्धा 2 ते 4 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेसाठी 240 खेळाडूंची लिलाव प्रक्रिया नुकतीच अलिबाग-रेवस मार्गावरील खडताळ पुलाजवळील होरीझोन बँक्वेट हॉलमध्ये पार पडली. एपीएलच्या लिलाव प्रक्रियेसाठी तालुक्यातून …

Read More »

पोलीस असल्याचे सांगत फसविणार्याला खालापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

खालापूर : प्रतिनिधी खालापुरातील ज्येष्ठ नागरिकाला पोलीस अधिकारी असल्याचे सांगत दम देत पाऊण लाखाचा ऐवज लुटणार्‍या अबालू जाफर इराणी (वय 47 वर्ष, रा. विष्णू कृपानगर शिवाजीनगर, पुणे) तोतयाला खालापूर पोलीस पथकाने नगर जिल्ह्यातून अटक केली आहे. इराणीने राज्यात अनेक ठिकाणी तोतया पोलीस अधिकारी बनून गुन्हे केल्याचे तपासात समोर येत आहे. …

Read More »

मिनिट्रेन घडविणार माथेरानमधील पर्यावरण आणि संस्कृतीचे दर्शन

कर्जत : प्रतिनिधी युनोस्कोमुळे माथेरानचे पर्यावरण जगाला कळणार असून मिनिट्रेनच्या माध्यमातून ते दाखवणार असल्याचे   विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी सांगितले. नेरळ-माथेरान-नेरळ मिनिट्रेनला युनोस्कोमध्ये स्थान मिळाल्यानंतर मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल हे माथेरान रेल्वे स्टेशन सुशोभित करणे, पर्यटकांना रेल्वेच्या सोयी-सुविधांची पाहणी, तसेच माथेरानमधील पुढील कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी माथेरान भेटीला आले …

Read More »