नवी दिल्ली ः देशातील कोरोनाबाबतची आव्हाने अद्याप संपलेली नाहीत. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, मिझोराम आणि कर्नाटक या पाच राज्यांत कोरोनाचे 10 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालय म्हटले आहे तसेच शासनाने म्हटले आहे की, तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जवळपास पाच लाख ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य …
Read More »नरेंद्र मोदी जनहित साधणारे पंतप्रधान; आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन, पनवेलमध्ये लाभार्थ्यांचा सन्मान सोहळा
पनवेल ः रामप्रहर वृत्तदेशातील सर्वसामान्य, गोरगरीब जनतेच्या हिताचा विचार करणारा पंतप्रधान आपल्याला नरेंद्र मोदी यांच्या रूपात मिळालेला आहे. आज वयाच्या 70व्या वर्षीही ते तासन्तास झटून काम करतात. त्यांना तुमच्या ताकद, आशीर्वादाची गरज आहे. म्हणजे आणखी 10 वर्षे ते जोमाने काम करतील आणि देशवासीयांचे एकंदर जीवनमान अजून सुधारेल, असे प्रतिपादन भाजप …
Read More »तक्का येथे एक दिवसीय कोरोना लसीकरण केंद्र
पनवेल : रामप्रहर वृत्त येथील भाजप नगरसेवकांच्या माध्यमातून प्रभागांमधील नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्याचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत तक्का येथील मोराज संकुलातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळवी ही विनंती नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे आणि नगरसेविका चारुशीला घरत यांना मोराज संकुलातील नागरिकांनी केली होती. त्यानुसार गुुरुवारी एकदिवसीय लसीकरण केंद्र सुरू …
Read More »तळोजा फेज दोनमधील दफनभूमी आणि स्मशानभूमी दुरुस्तीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी
पनवेल : प्रतिनिधी तळोजा फेज दोनमधील दफनभूमी आणि स्मशानभूमीची दुरुस्ती करून नागरिकांना तेथे सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लवकरात लवकर अंदाज पत्रक तयार करून त्याला मंजुरी घेण्याच्या सूचना सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 7) महापालिकेत झालेल्या बैठकीत पालिका अभियंत्यांना दिल्या. पनवेल महापालिका हद्दीतील तळोजा फेज दोन मधील मुस्लिम आणि …
Read More »पुढील तीन महिने सणांचे; सतर्क राहा
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा नागरिकांना आवाहन नवी दिल्ली : प्रतिनिधी देशातील कोरोनाबाबतचीआव्हाने अद्याप संपलेली नाहीत. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, मिझोराम आणि कर्नाटक या पाच राज्यात कोरोनाचे 10 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत, असे आरोग्य मंत्रालय म्हटले आहे. तसेच, सरकारने दावा केला आहे की, तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जवळपास 5 लाख ऑक्सिजन बेड तयार …
Read More »रायगड जिल्ह्यात कोरोना लसीकरण विशेष मोहीम
अलिबाग ः प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भाव तसेच त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 8 ते 14 ऑक्टोबरदरम्यान मिशन कवच कुंडल नावाने विशेष कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातही ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य …
Read More »शेलार, मुनगंटीवार, वाघ भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत
मुंबई ः प्रतिनिधी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी गुरुवारी (दि. 7) जाहीर करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील आधीच्या नावांसोबतच नव्या काही नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या 80 सदस्यांची नावे असणारी यादी जाहीर केली. यामध्ये विशेष निमंत्रित म्हणून आमदार आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार आणि लड्डाराम नागवानी यांचा समावेश करण्यात …
Read More »अजित पवारांना मोठा धक्का; जरंडेश्वर साखर कारखान्यावर इन्कम टॅक्सचा छापा
सातारा ः प्रतिनिधी सातार्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली आहे. कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर कारखान्यावर दाखल बर्याच सभासदांनी …
Read More »‘सुफल आहार’तर्फे गरीब बालकांना मोफत जेवण
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यात सुफल आहाराच्या माध्यमातून उरण चारफाटा झोपडपट्टीतील मुलांना दररोज एक वेळचे मोफत जेवण देण्यात येत आहे. समाजातील गोरगरिबांना पोटभर अन्न मिळावे, अन्नाअभावी बालकांचे मृत्यू होऊ नये, लहान बालकांचे कुपोषण होऊ नये. त्यांना चांगले सुदृढ जीवन जगता यावे या दृष्टिकोनातून ही सामाजिक बांधिलकी जपत उरण तालुक्यात सुफल …
Read More »उरण नगर परिषदेत कायदेविषयक जनजागृती शिबिर
उरण : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमार्फत उरण तालुका विधी सेवा समितीतर्फे कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी सोमवारी (दि. 4) उरण नगर परिषद कार्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये उरण न्यायालयातील सहदिवाणी न्यायाधीश राहुल बी. पोळ, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, अनिल जगधनी, तसेच अॅड. पराग म्हात्रे, अॅड. व्ही. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper