Breaking News

महत्वाच्या बातम्या

पाली एसटी बसस्थानकाला सांडपाण्याचा विळखा

नागरिकांचे आरोग्य धोक्यात पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय व अष्टविनायकाचे  स्थान असलेल्या पाली येथील बसस्थानक परिसर गटारातील सांडपाणी व घाणीचे आगार झाले आहे. येथील दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छता व प्रवाशांना सोयीसुविधा देण्याच्या गंभीर बाबीकडे राज्य परिवहन महामंडळाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. …

Read More »

आजिवली येथे शासकीय दाखले वाटप शिबिराला उदंड प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या मागणीनुसार आजिवली येथे जनता विद्यालयात शुक्रवारी (दि. 1) शासकीय दाखले वाटप शिबिर उत्साहात झाले. या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेत उपक्रमास उदंड प्रतिसाद दिला.या शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर शिबिराचे उद्घाटन भाजपचे तालुका …

Read More »

राज्य सरकारच्या घोषणा हवेत विरल्या

शेतकर्‍यांना मदत न मिळाल्याने फडणवीसांचा हल्लाबोल नागपूर ः प्रतिनिधीमराठवाड्यात अतिवृष्टीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेवर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ताशेरे ओढले आहेत. सरकारच्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कोणत्याही घोषणेची पूर्तता झालेली नाही. इतक्या नैसर्गिक आपत्तींमध्ये केलेल्या घोषणा कागदावर राहिल्या …

Read More »

पनवेलमध्ये शनिवारी गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबिर

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची लाभणार उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तसेवा व समर्पण अभियान अंतर्गत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 2) पनवेलमध्ये गर्भाशय मुखाच्या …

Read More »

छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनर्रिक्षण कार्यक्रम जाहीर

अलिबाग : जिमाका निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2022 या अर्हता आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनर्रिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार मा. भारत निवडणूक आयोगाकडून विकसित करण्यात आलेला तेींशी कशश्रश्रिळपश अिि (तकअ) हा अ‍ॅप सर्व नागरिक, मतदारांसाठी अतिशय उपयुक्त आहे. हे अ‍ॅप झश्ररू ीीेींश (अपवीेळव)/अिि ीीेींश …

Read More »

रोहा चणेरा येथे कृषी मेळावा

रोहे : प्रतिनिधी शेतकर्‍यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती मिळावी, यासाठी रोहा तालुका कृषी विभागाने चणेरा येथे नुकताच कृषी मेळावा आयोजित केला होता. या वेळी शेतीबाबतच्या विविध योजनांची माहिती देऊन तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी उपस्थित शेतकर्‍यांना शेतीचे उत्पन्न कसे वाढवावे याबाबत मार्गदर्शन केले. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया …

Read More »

पेण-जावळी एसटी सेवा सुरू करा

पेण : प्रतिनिधी तालुक्याच्या जावळी भागातील एसटी बससेवा अद्यापही नियमित सुरू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह नोकरदारांना त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील बहुतांश ग्रामस्थांना कंपनीत, तसेच महिलांना काम करण्यासाठी शहरात जावे लागत असते. एसटी सेवा बंद असल्याने खाजगी वाहनाने परवडत नाही. त्यामुळे त्यांनी पेण-जावळी एसटी सेवा नियमित सुरू करण्याची मागणी …

Read More »

पाणीदार ग्रामपंचायत-जामरुंग

कर्जत तालुक्यातील टेंबरे ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन बनलेल्या जामरुंग ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीतील पाण्याच्ता स्त्रोतांचे जतन करण्याचा निर्णय घेतला आणि ग्रामपंचायत पाणीदार बनवली आहे. ग्रामपंचायतीमधील सर्व भागात पाणी साठवण करण्याचे यशस्वी नियोजन करून तसेच सिमेंट बंधारे आणि साठवण बंधारे यांची निर्मिती करून जलसाक्षरता मोहीम राबविण्याचे यशस्वी काम जामरुंगसारख्या नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीने …

Read More »

दिघोडे-गव्हाण फाटा महामार्गावर अवजड वाहनांवर कारवाई

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील दिघोडे-गव्हाण फाटा महामार्गावर नियमित होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे दैनंदिन प्रवासी अक्षरशः हैराण झाले आहेत. दिघोडेपासून ते गव्हाण फाट्यापर्यंत महामार्गालगत असलेल्या अनधिकृत कंटेनर गोदामांमधील अवजड कंटेनर ट्रेलर वाहतुकीमुळे सामान्य नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी 27 सप्टेंबरपासून सकाळी 6 ते रात्री …

Read More »

सिडकोकडील सेवा पनवेल मनपाकडे हस्तांतरीत करण्याच्या कामाला वेग

पनवेल : प्रतिनिधी सिडकोकडील सेवा पनवेल महापालिकेकडे हस्तांतरणाच्या दृष्टीने सिडको अधिकार्‍यांबरोबर सेवा पाहणी महापालिका अधिकार्‍यांनी सुरू केली आहे. गुरुवारी (दि. 30) झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत आयुक्त गणेश देशमुख यांनी संबधित विभागाकडून या पाहणीचा आढावा घेतला. पनवेल महापालिका हद्दीत सिडको प्राधिकरणाच्या हस्तांतरण होणार्‍या सेवा-सुविधा पाहणी कार्यक्रम हाती 27 सप्टेंबरपासून घेतला आहे. …

Read More »