Breaking News

महत्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात आणीबाणी लावण्यात आलीय!

फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोलनिषेध करून भरविली प्रतिविधानसभा मुंबई ः प्रतिनिधीराज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षणावरून आवाज उठविणार्‍या भाजपच्या 12 आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन करण्यात आले. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला असून मंगळवारी (दि. 6) सुरुवातीला विधिमंडळाच्या पायर्‍यांवर आणि नंतर पत्रकारांच्या कक्षात भाजपने प्रतिविधानसभा भरविली. या वेळी विधानसभेचे विरोधी …

Read More »

जेएनपीटीत माल हाताळणीमध्ये वाढ; जूनमध्ये 441,984 टीईयूची हाताळणी

उरण ः प्रतिनिधी लॉकडाऊन निर्बंधांमध्ये शिथिलता आणि देशाच्या अर्थव्यवस्थेस गती आल्याने देशातील प्रमुख बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)मध्ये माल हाताळणीत वाढ झाली आहे. जेएनपीटीमध्ये जून 2020च्या 289,292 टीईयूच्या तुलनेत जून 2021 महिन्यात 441,984 टीईयूची माल हाताळणी झाली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 52.78 टक्के अधिक आहे. रेल्वे …

Read More »

नवघर ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल; पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

उरण : प्रतिनिधी जेएनपीटी विभागात सिडको हद्दीत असणार्‍या नवघर गावाला गेल्या तीन महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे जनतेची तहान भागली जात नाही. याबाबत सिडको प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. पर्यायाने नवघर गावाला जास्तीत जास्त पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी  केली आहे. नवघर …

Read More »

पनवेलमधील खासगी रुग्णालयांना मिळणार कोरोना प्रतिबंधक लससाठा

पनवेल ः प्रतिनिधी मुंबईस्थित एका नामांकित संस्थेच्या वतीने पनवेल कार्यक्षेत्रातील ज्या रुग्णालयांना कोविड लसीकरणाची परवानगी मिळाली आहे, अशा रुग्णालयांना लवकरच कोविड लसींचा साठा प्राप्त होणार आहे. ज्या नागरिकांना खासगी रुग्णालयात जाऊन लस घेणे शक्य आहे, त्यांनी या रुग्णालयांमध्ये जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. …

Read More »

तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी नवी मुंबई पालिका प्रशासन सज्ज; दररोज 8000 चाचण्या; संपर्कातील व्यक्तींचा शोध

नवी मुंबई ः प्रतिनिधी कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर 50पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या दीडशेच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत पालिका प्रशासनाने पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. त्या अनुषंगाने दैनंदिन चाचण्यांवर भर दिला जात आहे. रविवार वगळता गेल्या काही दिवसांपासून सरासरी दिवसाला आठ हजार कोरोना …

Read More »

जोकोव्हिच, बार्टी उपांत्यपूर्व फेरीत

विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा लंडन ः वृत्तसंस्थासर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि ऑस्ट्रेलियाची अ‍ॅश्ले बार्टी या अग्रमानांकित खेळाडूंनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर आंद्रेस रुब्लेव्ह, कोको गॉफ, बाबरेरा क्रेजिकोव्हा आणि इशा श्वीऑनटेक यांना उपउपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या जोकोव्हिचने 17व्या …

Read More »

अँडरसनने गाठला एक हजार बळींचा टप्पा

लंडन ः वृत्तसंस्थाइंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने  काऊंटी चॅम्पियनशिप सामन्यात लँकशायरकडून खेळताना 19 धावा देऊन सात गडी बाद केले. यासह अँडरसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक हजार बळी पूर्ण केले. यापूर्वी 2005मध्ये अँडी कॅडिकने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक हजार बळींचा टप्पा गाठला होता. आता 16 वर्षांनंतर अँडरसनने केंटविरुद्ध खेळताना ही …

Read More »

ब्राझीलची अंतिम फेरीत धडक

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा रियो दी जानेरो ः वृत्तसंस्थाकोपा अमेरिका स्पर्धेत अनुभवी आणि बलाढ्य ब्राझीलने पेरूला 1-0 अशी मात देत अंतिम फेरीत धडक दिली. ब्राझीलला आता विजेतेपदासाठी अर्जेंटिना किंवा कोलंबिया यांच्याशी झुंजावे लागणार आहे.ब्राझीलने सुरुवातीपासूनच पेरूवर वर्चस्व राखले. नेमारच्या नेतृत्वात ब्राझीलच्या स्ट्रायकर्सनी पेरूच्या गोलकीपरला सतत व्यस्त ठेवले. त्यांनी पेरूला श्वास …

Read More »

म्हणूनच ‘ते’ पत्र लिहिले

आमदार प्रताप सरनाईक यांचे ‘मविआ’वर शरसंधान मुंबई ः प्रतिनिधीशिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारविरोधातील खदखद बोलून दाखवली आहे. माझ्यावरील संकटावेळी महाविकास आघाडीचे नेते माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. त्यामुळेच मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले, असे सांगून प्रताप सरनाईक यांनी ‘मविआ’वर शरसंधान साधून खळबळ उडवून दिली …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी अधिवेशनातही आवाज

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सोमवारी जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली. या वेळी माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, आमदार महेश बालदी, आमदार रविशेठ पाटील, आमदार मंदा म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार गणपत गायकवाड, …

Read More »