Breaking News

महत्वाच्या बातम्या

देशात कोरोनाचा हाहाकार!

सलग तिसर्‍या दिवशी तीन लाखांचा टप्पा नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. शुक्रवारी (दि. 23) सकाळी संपलेल्या 24 …

Read More »

कोरोना संकटात शोएबची भारतीयांसाठी प्रार्थना

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली आहे आणि त्यामुळे दररोज रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य विभागाची व्यवस्थाही तुटपुंजी पडत आहे. ऑक्सिजनअभावी लोकांचा तडफडून मृत्यू होत आहे. या वेळी भारताच्या मदतीसाठी अनेक शेजारील राष्ट्रही पुढे येत आहेत. त्यात पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब …

Read More »

ख्रिस मॉरीसवर पीटरसन नाखूश

मुंबई ः प्रतिनिधी राजस्थान रॉयल्सची ह्या आयपीएल सीझनमधील आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक झाली आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारी ही टीम सध्या पॉइंट टेबलमध्ये सर्वांत तळाशी आहे.आजवरच्या आयपीएल लिलावातील मॉरीस हा सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे, मात्र मॉरीस या रकमेसाठी पात्र नाही, असे मत इंग्लंडचा माजी कॅप्टन केव्हिन पीटरसनने व्यक्त केले आहे. मॉरीसने …

Read More »

गतविजेत्या मुंबईचा पराभव

लोकेश-गेलच्या खेळीने पंजाब विजयी चेन्नई ः वृत्तसंस्थाचेन्नईच्या चेपॉक मैदानावर झालेल्या आयपीएल सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 9 विकेट्सने पराभव केला. पंजाबचा या हंगामातील हा दुसरा विजय ठरला आहे.कर्णधार केएल राहुल (नाबाद 60) आणि ख्रिस गेल (नाबाद 43) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर 9 विकेट्सने शानदार विजय …

Read More »

एनएमएमटीला महिन्याला पाच कोटींचा तोटा

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेचा परिवहन उपक्रम (एनएमएमटी)  अगोदरच तोट्यात असताना लॉकडाऊनमुळे महिन्याला पाच कोटींची झळ सोसावी लागत आहे, तर दिवसाला 30 लाखांचा आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बस धावत असल्याने व प्रवासी वाहतूक बंद असल्याने उत्पन्न पूर्णपणे थांबल्याने परिवहनला मोठा तोटा सहन करावा …

Read More »

राजे प्रतिष्ठानकडून कलाकारांना जीवनाश्यक वस्तू

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त आयोजित 70 कार्यक्रमांतर्गत शनिवारी (दि.  24) पनवेल, रायगड, मुंबई व नवी मुंबई अशा ठिकाणच्या 70 गरजवंत ऑर्केष्ट्रा कलाकारांना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे तांदूळ, तेल, साखर, बिस्कीट, डाळ या जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात …

Read More »

खैरवाडीतील आदिवासींना रेशनचे वाटप

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई गुन्हे शाखा अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील व पोलीस सहआयुक्त विनोद चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई गुन्हे शाखेच्या दानशूर व्यक्तींच्या मदत व सहकार्‍याने शुक्रवारी (दि. 23) पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे खैरवाडी आदिवासीवाडीमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी राहणार्‍या …

Read More »

खारघरमधील गुरुद्वारातर्फे विनामूल्य ऑक्सिजन सिलिंडर

पनवेल : वार्ताहर गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने बहुतांश रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता भासत आहे. कोरोना रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची गरज ओळखून खारघरमधील गुरुद्वारातर्फे मिनी आणि मोठे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करण्यात आले आहेत. ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णाचा कोरोना अहवाल सादर केल्यास गुरुद्वाराकडून विनामूल्य …

Read More »

‘रेमडेसिवीर‘चा काळाबाजार करणारा काँग्रेसचा पदाधिकारी

पनवेल : रामप्रहर वृत्त रेमेडेसिवीरचा काळा बाजाराने विक्री करणार्‍या कळंबोलीतील काँग्रेस वाहतूक सेलचा पदाधिकारी हरपिंदर सिंग यास न्यायालयाने 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर इंजेक्शनचे दुप्पट, तिप्पट दरात काळा बाजारात विक्री केली जात आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन कोरोना रुग्णांसाठी जीवनदान ठरत असल्यामुळे …

Read More »

आपटा आरोग्य केंद्रात सुविधांची वानवा

नियोजनशुन्य कारभाराने रुग्णांची हेळसांड पनवेल : रामप्रहर वृत्त कोविडची दुसरी लाट झपाट्याने वाढत असताना आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रात याबाबत कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कोरोना नियंत्रणाच्या दृष्टीने येथे कोणतीही उपाययोजना केलेली नसून येणार्‍या रुग्णांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. आरोग्य केंद्रात रुग्ण आला तर ऑक्सिजन तपासण्यासाठी …

Read More »