Breaking News

महत्वाच्या बातम्या

रेखा जरे हत्येचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे अटकेत

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मागील काही महिन्यांपासून पोलीस बोठेच्या मागावर होती. अखेर शनिवारी (दि. 13) पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादेत बेड्या ठोकल्या आहेत. रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार …

Read More »

‘महाविकास सरकारकडून मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा’

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण याचिकांवर पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाल्यानंतर राज्यात हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच मुद्द्यावरूनच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. चंद्रकात पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादी …

Read More »

नामदेववाडीतील नागरिकांना नुकसानभरपाई तसेच योग्य पुनर्वसन करा

आमदार महेश बालदी यांची सिडकोकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तवडघर येथील नामदेववाडी येथे राहणार्‍या नागरिकांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देऊन पावसाळा सुरू होण्यापूर्वी त्यांच्या घरांचे योग्य पुनर्वसन करावे, अशी आग्रही मागणी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापक संचालकांकडे केली आहे.या संदर्भात आमदार महेश बालदी यांनी सिडकोला …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून वेदिकाला मदतीचा हात

वैद्यकीय उपचारार्थ 50 हजारांची आर्थिक मदत पनवेल ः रामप्रहर वृत्त’एसएमए टाईप 1’ या गंभीर आजाराशी झुंज घेत असलेल्या वेदिका सौरभ शिंदे या बालिकेच्या वैद्यकीय उपचारार्थ श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 50 हजार रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली. मदतीचा धनादेश श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल …

Read More »

भाजप नगरसेवक नितीन पाटील यांच्या नगरसेवक निधीतून विविध विकासकामे

पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजप नगरसेवक नितीन पाटील यांच्या नगरसेवक निधीतून पायोनिअर विभागात बस थांबा, मिनी हायमास्ट तसेच तालुका पोलीस स्टेशनजवळ मिनी हायमास्ट व उपजिल्हा रुग्णालय ते ज्येष्ठ नागरिक हॉल येथे पथदिवे अशा विविध विकासकामांचे लोकार्पण शुक्रवारी (दि. 12) पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.  या कार्यक्रमास …

Read More »

एल अ‍ॅण्ड टी कोमास्तुकडून टीआयपीएलचा सन्मान

पनवेल ः रामप्रहर वृत्तएल अ‍ॅण्ड टी कोमास्तु कंपनी आणि ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे मागील दोन दशकांहून अधिक काळ कन्स्ट्रक्शन व्यवसायानिमित्त चांगले व दृढ नाते आहे. त्या अनुषंगाने एल अ‍ॅण्ड टी कोमास्तुने वर्षानुवर्षे आदरणीय व निष्ठावंत ग्राहक असल्याबद्दल ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सन्मान …

Read More »

नगरसेविका चारुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीतून विविध विकासकामे

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीतून अनेक विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यानुसार नवीन पनवेल पोदी क्रमांक 3 येथील रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच सेक्टर 16मधील उद्यानात पाणपोई बसविण्यात आली. या विकासकामांचा शुभारंभ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल …

Read More »

शेकडो भावी अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत

राज्य सरकारच्या दुर्लक्षाचा फटका मुंबई ः प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारच्या भोंगळ कारभारामुळे एमपीएससी परीक्षांच्या वेळापत्रकात सातत्य नाही. परीक्षा वारंवार फुटकळ कारणे देऊन पुढे ढकलल्या जाताहेत. दुसरीकडे राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल लागून आठ महिने होऊनही उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार अशा वर्ग एक व वर्ग दोनच्या 420 भावी अधिकार्‍यांना नियुक्ती देण्यात येत नाही. …

Read More »

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस

मुंबई : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या शनिवारी (दि. 13) मुंबईत झालेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. आतापर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ. भा. संपर्कप्रमुख प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांच्याकडे होती. त्यांचा कार्यकाळ संपल्याने …

Read More »

बुमराहच्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम

तारा शर्माच्या पोस्टद्वारे शुभेच्छा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अहमदाबादमध्ये झालेली इंग्लंडविरुद्धची चौथी व अखेरची कसोटी खेळला नाही. 28 वर्षीय बुमराह लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे बुमराह स्पोर्ट्स सूत्रसंचालक संजना गणेशननशी लग्न करणार आहे. या संदर्भात दोघांनीही अद्याप मौन बाळगले आहे, …

Read More »