Breaking News

महत्वाच्या बातम्या

नवी मुंबईत कोरोनाची वर्षपूर्ती

600 ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; रुग्णवाढ रोखण्याचे पालिकेसमोर आव्हान नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबईत 15 मार्च 2019 रोजी कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. त्याला सोमवारी वर्ष झाले असून वर्षभरात नवी मुंबईत 1139 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात 603 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये एकच मृत्यू होता. या वर्षी …

Read More »

साहेब, आम्हाला इथेच जागा द्या!

साहेब आम्हाला कुष्ठरोग झाला म्हणून गावातून हाकलले, तेव्हापासून आम्ही इथेच राहतोय. पण आता रेल्वेचे नवीन काम सुरू झालंय, म्हणून आम्हाला इथून जायच्या नोटिसा दिल्यात, आता जायचे कोठे ? आम्हाला इथेच जागा द्या, 80 वर्षाच्या छबीबाई आंबेकर सांगत होत्या. पनवेलच्या कुष्ठरोग वसाहतीतील 24 कुटुंबांच्या या मागणीकडे शासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा …

Read More »

अपयशांची मालिका

केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र सरकारला खरमरीत पत्र लिहून स्पष्ट इशारा दिला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला महाराष्ट्रात प्रारंभ झाला असून महाराष्ट्राची आरोग्ययंत्रणा त्यासाठी वेळीच सज्ज झाली नाही तर पुन्हा नव्या महासंकटाला तोंड द्यावे लागेल असे त्यांच्या पत्रावरून दिसते. म्हणजेच कोरोनाशी यशस्वी मुकाबला केल्याबद्दल महाविकास आघाडीचे सरकार स्वत:ची …

Read More »

उलवे विद्यालयात विज्ञान प्रदर्शन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल उलवे विद्यालयात सोमवारी (दि. 15) सेवा सहयोग फाऊंडेशन, मुंबई यांच्या सौजन्याने विज्ञान प्रदर्शन झाले. या संस्थेच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील विविध संकल्पना प्रात्यक्षिकाद्वारे स्पष्ट करून सांगण्यात आल्या. इयत्ता आठवी ते दहावीच्या विज्ञान अभ्यासक्रमावर आधारित विविध प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. न्यूटनच्या गतिविषयक …

Read More »

मंजूर विकासकामांच्या निविदा त्वरित प्रसिद्ध करा; भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 20मधील तक्का गावातील व आजूबाजूच्या परिसरातील मंजूर विकासकामांच्या निविदा त्वरित प्रसिध्द करण्यात याव्या, अशी मागणी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक जयंत पगडे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख व महापौर डॉ. कविता चौतमोल यांना निवेदन …

Read More »

भाजपचा महाविकास आघाडीवर सोशल मीडियातून हल्लाबोल

मुंबई ः प्रतिनिधी भाजपने महाविकास आघाडी सरकारवर सोमवारी (दि. 15) सोशल मीडियातून हल्लाबोल केला. महाविकास आघाडी सरकार लबाड असून, या सरकारने जनतेला त्रस्त करून सोडल्याची टीका भाजपने केली आहे. ट्विटरवर एकामागोमाग एक असे ट्विट करीत भाजपने राज्य सरकारवर वाग्बाण सोडले. लबाड महाविकास आघाडी सरकारने जनतेला चहूबाजूंनी त्रस्त करून सोडले आहे. …

Read More »

उरण कोरोनामुक्त करूया!; भाजपचे नागरिकांना आवाहन

उरण : वार्ताहर मुंबई शहराप्रमाणे इतर शहरात कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. उरण तालुक्यात सध्या कोरोनाचा संसर्ग झाला नाही. पुढील काळात कोरोनामुक्त उरण करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन आमदार महेश बालदी यांनी नागरिकांना केली आहे. ज्यांचे वय 60 पेक्षा जास्त आहे किंवा कोणत्याही व्याधींनी ग्रस्त असल्यास …

Read More »

घारापुरीला सागरी तटबंदी; संरक्षक भिंतीसाठी 37.50 कोटींच्या कामाचा शुभारंभ

उरण : प्रतिनिधी जेएनपीटीच्या 37.50 कोटी खर्चाच्या मंजूर करण्यात आलेले आणि मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या घारापुरी बेटासभोवार उभारण्यात येणार्‍या संरक्षक भिंत व सागरी तटबंदीच्या कामाचा शुभारंभ सोमवारी (दि. 15) करण्यात आला. यासाठी आमदार महेश बालदी आणि स्थानिकांनी मागणी केली होती. बेटासभोवार उभारण्यात येणार्‍या सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या तटबंदीमुळे समुद्राच्या लाटाने …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सीकेटी विद्यालयातर्फे विविध ऑनलाइन स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी माध्यम पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाच्या वतीने संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त वेशभूषा, चित्रकला आणि तक्ता बनविणे (पोस्टर मेकिंग) या ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धा तालुकास्तरीय असून, …

Read More »

रेशन कार्ड धारकांसाठी अ‍ॅप लाँच

आता एका क्लिकवर मिळणार सर्व माहिती नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासर्वसामान्यांसाठी आता एक खूशखबर आहे. मोदी सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी भारतात मेरा रेशन नावाचे मोबाइल अ‍ॅप लाँच केले आहे. यामध्ये गरजू म्हणजेच गरीब कुटुंबीतील लोकांना रेशन कार्डमध्ये आपली सध्याची स्थिती मिळणार्‍या सुविधांबाबत सर्व माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे.मेरा रेशन मोबाइल अ‍ॅप …

Read More »