Breaking News

महत्वाच्या बातम्या

नवी मुंबईत वर्षभरात 301 सायबर गुन्हे

साडे चार कोटी रुपयांची फसवणूक; 30 आरोपींना अटक नवी मुंबई : प्रतिनिधी इंटरनेटच्या वापरात वाढ होत असतानाच सायबर गुन्ह्यांशी संबधित गुन्ह्यांच्या प्रमाणातही वाढ होऊ लागली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात गेल्या कॅलेंडर वर्षामध्ये याप्रकारचे 301 गुन्हे घडले असून यातील फक्त 46 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणून 30 आरोपींना अटक केली …

Read More »

कॅनडातही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बोलबाला; कोरोला लस पुरविल्याबद्दल पोस्टर लावून कौतुक

ओटावा ः वृत्तसंस्था कोरोनाच्या वैश्विक महामारीने संपूर्ण जगालाच आपल्या कवेत घेतले. कोरोनामुळे लाखो लोकांचे बळी घेतले आहेत, परंतु आता कोरोनाची लस बाजारात आल्याने जगभरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लशींचा पुरवठा केल्याबद्दल कॅनडा सरकारने भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. कॅनडामधील ग्रेटर टोरंटो परिसरातील रस्त्यांवर भारत …

Read More »

महाराष्ट्रात कोरोना स्थिती गंभीर; केंद्राला चिंता

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात एकीकडे कोरोनावरील लसीकरण सुरू असताना काही राज्यांत मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने वाढत आहेत. खासकरून महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाचे नवीन रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त होत असून, देशाला कोरोनामुक्त करायचे असेल सर्व जनतेने पूर्ण काळजी घेण्याची गरज आहे, असे नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 70 किलो साबुदाणा खिचडीचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या  वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे 70 सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचअनुषंगाने गुरुवारी (दि. 11) महाशिवरात्रीनिमित्त पनवेलमध्ये रेल्वे स्थानकाजवळ व अन्य ठिकाणी गरीबांना 70 किलो साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक अध्यक्ष …

Read More »

नागपुरात सात दिवस लॉकडाऊन

नागपूर ः प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. नागपूर मनपासह पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीत असलेल्या कामठी, हिंगणा आणि वाडी येथेही हे लॉकडाऊन असणार आहे. नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत सात …

Read More »

खोपोलीत लसीकरणाची सोय व्हावी; नागरिकांची मागणी

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात पहिला कोरोना रुग्ण सापडलेल्या खोपोली शहरातील नगर परिषदेच्या रूग्णालयात कोरोना लसीकरणाची सोय व्हावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर एप्रिल महिन्यात खालापूर तालुक्यात पहिला कोरोना रूग्ण सापडला होता. त्यानंतर वर्षभरात केवळ खोपोली नगर परिषद हद्दीतच 80 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तीन …

Read More »

सावधगिरी बाळगूया कोरोनाला टाळूया

पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांचे आवाहन पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे वाढते रुग्ण ही चिंतेची बाब असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. सावधगिरी बाळगूया कोरोनाला टाळूया, असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे. अलिकडच्या काही दिवसांत कुटूंबातील सर्व सदस्य बाधित असल्याचे दिसून …

Read More »

रोटरी क्लबचे सेवाकार्य आदर्शवत; आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन, पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य साहित्याचे लोकार्पण

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल शहरात आणि तालुक्यात असलेल्या रोटरी क्लब्जनी समाजाला काही तरी देण्याची निकोप स्पर्धा केली तर अनेक चांगल्या गोष्टी घडू शकतील. रोटरी क्लबचे हे सेवाकार्य पनवेलकरांसाठी एक वेगळा आदर्श निर्माण करेल, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर  यांनी गुरुवारी (दि. 11) केले. ते आरोग्य साहित्याच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. …

Read More »

एमपीएससी परीक्षा पुन्हा पुढे ढकलली; पुण्यासह राज्यात विद्यार्थ्यांचा उद्रेक, राज्य सरकारचा निषेध

पुणे ः प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 14 मार्च रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त असून, एमपीएससीच्या या निर्णयाविरोधात पुण्यासह अन्य ठिकाणी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून राज्य सरकारचा निषेध नोंदविला. राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलत असल्याची अधिकृत माहिती एमपीएससीने गुरुवारी (दि. 11) …

Read More »

उरणमधील कराटेपटूंचे सुयश

उरण ः प्रतिनिधीअलिबाग येथे स्टुडंट ऑलम्पिक असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये उरण तालुक्यातील पूर्व विभागातील गोशीनरियु कराटेपटूंनी पदके जिंकली.स्पर्धेत उरणमधील अमिता अरुण घरत, अमिषा अरुण घरत, सेजल नामदेव पाटील, अर्णव सुशांत पाटील, रोहित शरद घरत, आयुष सुधाकर पाटील, यश रामचंद्र मोकल, सुजित कृष्णा …

Read More »