मुंबई : प्रतिनिधी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली स्कॉर्पिअन वर्गातील पाणबुडी ’आयएनएस करंज’ बुधवारी (दि. 10) नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबईत समारंभपूर्वक या पाणबुडीचे जलावतारण झाले. या पाणबुडीमुळे भारतीय नौसेनेची ताकद कैकपटीने वाढणार आहे. शत्रुला थांगपत्ता लागू न देता त्यांच्या प्रदेशात पोहोचून विध्वंस घडवण्याची क्षमता ‘आयएनएस करंज’मध्ये आहे. 1565 टन …
Read More »आदिवासींसाठी मोबाइल मेडिकल युनिट सेवा; पनवेल मनपामार्फत फणसवाडी, चाफेवाडीत शुभारंभ
पनवेल ः रामप्रहर वृत्त जागतिक महिला दिनानिमित्त पनवेल महापालिकेमार्फत खारघरजवळील फणसवाडी व चाफेवाडी या आदिवासी वाड्यांमध्ये मोबाइल मेडिकल युनिट सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा शुभारंभ महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 10) झाला. यासाठी नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांनी …
Read More »पुन्हा पुन्हा गोंधळच
एकीकडे वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टर उन्हाळ्यात कोरोना प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त करतात, तर आरोग्यमंत्री कोरोनाची साथ वाढण्याचा वातावरणाशी संबंध नाही असे सांगतात. ही उलटसुलट विधाने आणि लॉकडाऊनचे इशारे यांनी लोक धास्तावून गेले आहेत. जनतेला शिस्त पाळण्याचे आवाहन करण्यापलीकडे राज्यातील आघाडी सरकार महामारी नियंत्रणासाठी काही पाऊल उचलणार आहे का? की पुन्हा …
Read More »द्रुतगती महामार्गावर कंटेनरची ट्रकला धडक
दोनही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली बायपासजवळ ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरने बुधवारी (दि. 10)पहाटेच्या सुमारास ट्रकला धडक दिली. त्यानंतर या दोन्ही वाहनांनी पेट घेतला आणि ही आग बोरघाटातील जंगलात पसरली. अग्निशमन दलाच्या पथकांनी ही आग नियंत्रणात आणली. द्रुतगती महामार्गावरून कंटेनर (एमएच-46,बीएफ-7713) भरधाव वेगाने मुंबईच्या …
Read More »माणकीवलीच्या उपसरपंचपदी भाजपचे विकास रसाळ बिनविरोध
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील माणकीवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे विकास रसाळ यांची बुधवारी (दि. 10) बिनविरोध निवड करण्यात आली. अजय भारती यांनी राजीनामा दिल्यामुळे माणकीवली ग्रामपंचायतीचे उपसरपंचपद रिक्त झाले होते. माणकीवली ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी बुधवारी दुपारी सरपंच चंदन भारती यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीची विशेष बैठक घेण्यात आली. या वेळी उपसरपंचपदासाठी …
Read More »पनवेलमधील वीजवाहिन्या लवकरच होणार भूमिगत; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ऊर्जामंत्र्यांची माहिती; महावितरणकडून 151.53 कोटींचा डीपीआर सादर
मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल शहरी भागातील वीजपुरवठा करणार्या वाहिन्या भूमिगत करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला होता, तसेच त्या संदर्भात मागणी व पाठपुरावा करून शासनाचे लक्ष केंद्रित केले. त्या अनुषंगाने महावितरणकडून 151.53 कोटी रकमेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) …
Read More »रायगडात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
रोहा तालुक्यात दोन कोरोनाबाधित आढळले रोहे ः प्रतिनिधी तालुक्यात कोरोनाचे रूग्ण रोज सापडत असल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मंगळवारी रोहा तालुक्यात कोरोनाचे दोन रूग्ण सापडले असून सहा व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. रोहा तालुक्यात सध्या 32कोरोना सक्रिय रूग्ण असून, ते विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत. फेबुवारीमध्ये कोरोनाचे रूग्ण बरे …
Read More »देवेंद्र फडणवीसांकडून गृहमंत्र्यांविरोधात हक्कभंग
मुंबई ः अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी झालेल्या आरोपानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात हक्कभंग आणला. यासोबतच फडणवीसांनी मराठा आरक्षणावरून काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधातही हक्कभंगाची नोटीस दिली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणाची सध्या राष्ट्रीय …
Read More »अखेर सचिन वाझेंची उचलबांगडी; मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात ठाकरे सरकार बॅकफूटवर
मुंबई ः प्रतिनिधी मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा मुद्दा विरोधी पक्ष भाजपने अधिवेशनात आक्रमकपणे लावून धरल्यानंतर ठाकरे सरकार बॅकफूटवर आले आहे. या मृत्यू प्रकरणात संशयाची सुई असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची अखेर गुन्हे शाखेतून बदली करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी (दि. 10) विधान परिषदेत …
Read More »माणगावात स्त्रीशक्तीचा जागर
माणगाव : प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषद व साहित्याचा मधूघट समूह यांच्या संयुक्त विद्यमाने माणगाव शहरातील बालाजी मंदिर सभागृहात घेण्यात आलेल्या जागर स्त्रीशक्तीचा सन्मान हिरकणींचा या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. अक्षरा चव्हाण यांनी केले. कोमसाप दक्षिण रायगड अध्यक्ष संजय गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper