Breaking News

महत्वाच्या बातम्या

भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आजपासून युवा वॉरियर्स अभियान

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चातर्फे विविध क्षेत्रातील युवकांना एकत्र आणण्यासाठी युवा वॉरियर्स अभियान सुरू करण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. 19) शिवजयंती दिनी किल्ले सिंहगड येथून या अभियानाचा प्रारंभ होईल, अशी माहिती युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला भाजप प्रदेश …

Read More »

अधिवेशन किमान चार आठवडे व्हायलाच हवे

देवेंद्र फडणवीस यांची मागणी मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहाता यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपते घेण्याचा विचार राज्य सरकार करीत असल्याचे सांगितले जात आहे. यावरून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. ‘लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशन किमान चार आठवडे व्हायलाच हवे. जर सरकारने …

Read More »

पनवेल महापालिका क्षेत्रात मिळणार चांगल्या आरोग्य सुविधा आणि दर्जेदार शिक्षण

विविध विषयांना महासभेची मंजुरी पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच भावी पिढीला दर्जेदार आणि उच्च शिक्षण मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेकडे हस्तांतरित  करण्यास मान्यता देण्यात आली. याशिवाय महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे क्राँकीटीकरण करणे, निवारा शेड, समाजमंदिरे बांधणे, गटारे बांधणे तसेच तलावाचे सुशोभीकरण करणे, अशा कामांना …

Read More »

आयपीएल-14 लिलाव : ख्रिस मॉरिस महागडा खेळाडू

चेन्नई : दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे. यंदाच्या आयपीएल लिलावात मॉरिसला राजस्थान रॉयल्सने 16 कोटी 25 लाख रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. न्यूझीलंडचा काइल जेमिसन व ऑस्ट्रेलियाचा झाय रिचर्डसन हे दोघे अनुक्रमे 15 कोटी आणि 14 कोटींना बंगळुरू आणि पंजाब संघात …

Read More »

कौल चिकनला तरुणाईची पसंती

माणगाव : प्रतिनिधी थंडीचा कडाका वाढत असतानाच माणगाव परिसरात खवय्यांची पोपटी बरोबरच कौल चिकनला पसंती मिळत असून अनेक खवय्ये सहभोजनासाठी,रात्री पार्टी जागरण करताना कौल चिकनला पसंती देत आहेत. हिवाळया दिवसात तयार झालेल्या वालांच्या शेंगाची पोपटी खवय्यांची खास पसंती असते. या पोपटी पार्टीबरोबरच अनेक खवय्ये कौल चिकनला पसंती देत आहेत. अतिशय …

Read More »

जिल्ह्यातील बंदरे रुतताहेत गाळात

भाऊचा धक्का मुंबई – अलिबाग मांडवा रो-रो सेवा  चालवणे किती खर्चीक आहे हे आता सिद्ध होऊ लागले आहे. मागील वर्षी ही रो-रो सेवा सुरु झाली. रो-रो सेवा सांभाळणार्‍या एमटुएम मेरिटाईमची बोट बंदरात व्यवस्थित नांगरता यावी, यासाठी पुन्हा गाळ काढला जात आहे. सध्या मांडवा येथे गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या …

Read More »

आक्रस्ताळी नेतृत्व

राज्यातील पक्षनेतृत्व आक्रमक आणि तरुण असावे या विचाराने काँग्रेस हायकमांडने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना जबाबदारीतून मुक्त केले आणि त्यांच्या जागी नाना पटोले यांची प्रतिष्ठापना केली. राज्यातील पक्षाची सूत्रे वाजतगाजत हाती घेतल्यानंतर नानासाहेबांनी गुरुवारी जी मुक्ताफळे उधळली ती पाहता या पक्षाचे यापुढेही काही खरे नाही असेच कोणालाही वाटेल. गेल्या सहा वर्षांमध्ये …

Read More »

महाविकास आघाडी सरकारच्या संवेदना बधीर झाल्यात -फडणवीस

मुंबई : प्रतिनिधीशाळा अनुदानासह इतरही मागण्यांसाठी गेल्या 40 दिवसांपासून शिक्षक संघटना मुंबईत आंदोलनाला बसल्या आहेत, पण महाविकास आघाडी सरकारच्या संवेदना बधीर झाल्या आहेत. पूर्वी आंदोलने झाली तर मंत्री, अधिकारी भेटायला यायचे. आज कुणीही भेटायला येत नाही, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.विधानसभेचे विरोधी पक्षनेते …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पना व पाठपुराव्यातून पनवेलमध्ये शिवसृष्टी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून, मागणीनुसार आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून, त्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी (दि. 18) खासदार श्रीरंग बारणे यांच्या …

Read More »

एक्स्प्रेस वेवर रसायनीजवळ क्वालीसला धडक, एक जण ठार

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनी पोलिसांच्या हद्दीत गुरुवारी (दि. 18) सकाळी अज्ञात वाहनाने क्वालीस कारला धडक दिली. या अपघातात राहूल धनाने (28) हा जागीच ठार झाला तर कारचालक सिध्देश पाटील (दोघे रा. अंधेरी मुंबई) हा किरकोळ जखमी झाला. पाटील याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरा अपघात …

Read More »