Breaking News

महत्वाच्या बातम्या

रुद्रावतार की घातपात?

चमोलीत जे घडले तो निसर्गाचा रुद्रावतार होता की शेजारील चीनने घडवून आणलेला घातपात याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये होत आहे. निसर्गाचा प्रकोप म्हटले तरी तोही विकासाच्या नावाखाली मानवाने ओढवून घेतलेल्या संकटाचाच चेहरा आहे असे म्हणता येईल. वारेमाप जंगलतोड, भौगोलिक रचनेकडे संपूर्ण दुर्लक्ष करून भराभरा उभी राहणारी बांधकामे, हवामानातील बदल अशी अनेक कारणे …

Read More »

शिवगान स्पर्धेला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने द्विस्तरीय शिवगान स्पर्धा 2021चे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत उत्तर रायगड जिल्हा स्पर्धा मंगळवारी (दि. 9) पनवेलमध्ये झाली. या स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.खांदा कॉलनी येथे चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयात झालेल्या …

Read More »

पोलादपुरात खवल्या मांजरांच्या तस्करीप्रकरणी त्रिकुट जेरबंद

वनविभागाची कारवाई पोलादपूर : प्रतिनिधीमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात वनविभागाने सोमवारी (दि. 8) एका रिक्षेवर छापा टाकून खवल्या मांजरांची तस्करी उधळून लावली. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.चिपळूण तालुक्यातून एका रिक्षेमधून वन्यजीवांची तस्करी केली जात असल्याची खबर वनविभागाचे रोहे सहाय्यक वनसंरक्षक विश्वजित …

Read More »

पागोटे सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर

आता भाजपचा होणार सरपंच उरण : प्रतिनिधी, वार्ताहरउरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच भार्गव दामाजी पाटील यांच्याविरोधात सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव ग्रामस्थांच्या मतदानाअंती मंजूर झाला आहे. 117 मतांनी भार्गव पाटील यांचा पराभव झाला.ऑक्टोबर 2017मध्ये भार्गव पाटील हे पागोटे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी निवडून आले होते, मात्र त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल जनमानसात नाराजीचा सूर …

Read More »

राज्यसभेत गुलाम नबी यांना निरोप देताना पंतप्रधानांच्या डोळ्यांत अश्रू

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. या सदस्यांना मंगळवारी (दि. 9) सभागृहात निरोप देण्यात आला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आझाद यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. जुलै 2007मध्ये गुजरातचे पर्यटक जम्मू काश्मिरमध्ये गेले असताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आझाद यांच्याबद्दलचा अनुभव …

Read More »

महाविकास आघाडीत धुसफूस

शिवसेना नेत्यांची नवी मुंबईत स्वबळाची मागणी नवी मुंबई : खास प्रतिनिधीमहाविकास आघाडीने आगामी महापालिका निवडणुका एकत्र लढण्याचे ठरवले आहे. यासाठी राज्यस्तरीय नेत्यांनी आघाडी करून लढण्याचे आदेश दिले असले तरीही स्थानिक पातळीवर आघाडीतील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील वाद संपण्याची चिन्हे नाहीत. अशातच नवी मुंबई महापालिकेत महाविकास आघाडीऐवजी स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी मागणी …

Read More »

टीम इंडियाचे विमान जमिनीवर!

पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून दारुण पराभव चेन्नई : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर मायदेशात पहिलीच कसोटी मालिका खेळणार्‍या टीम इंडियाचे विमान जमिनीवर आले. इंग्लंड संघाने यजमान भारतावर 227 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 420 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा चौथा डाव 192 धावांवर आटोपला. कर्णधार विराट …

Read More »

रोह्यातील अनंत मगर यांचा कलिंगड शेतीच्या उत्पादनातून शेतकर्‍यांपुढे आदर्श

रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील वाशी येथील अनंत मगर यांनी कलिंगड  पिकातून लाखोंचे उत्पादन काढुन तरुण शेतकर्‍यांपुढे आदर्श ठेवला आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून अनंत मगर कलिंगडाचे उत्पादन घेत आहेत. त्यांची स्वत:ची फार थोडी शेती आहे. त्यांनी धाटाव औद्योगिक क्षेत्राच्या बाजूच्या महादेववाडी येथील चाळीस एकर जमीन भाडेतत्त्वावर घेवून, तिथे   विग्रो गोल्डन जातीच्या …

Read More »

नेरळ-कळंब राज्यमार्गावर विनापरवाना बीएसएनएल केबल टाकण्याचे काम

कर्जत : बातमीदार तालुक्यातील रस्त्याच्या बाजूने भारत दूरसंचार निगम (बीएसएनएल)कडून केबल टाकली जात आहे. सध्या माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्गाच्या बाजूने केबल टाकण्याचे काम सुरू असून कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत हे काम बंद पाडण्यात आले आहे. दरम्यान, तालुक्यातील कोणत्याही रस्त्याच्या बाजूला केबल टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानगी दिली नाही आणि खोदकाम बंद करावे, …

Read More »

समाधान सामाजिक संस्थेकडून किल्ले रायगड स्वच्छता मोहीम

महाड : प्रतिनिधी शहरातल्या समाधान सामाजिक संस्थेने नुकतीच रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गडावरील होळीचा माळ, बाजारपेठ, राजसदर, जगदिश्वर मंदिर परिसरातील कचरा गोळा करून त्याची योग्या पद्दतीने विल्हेवाट लावली. या मोहिमेत संस्थेचे सुयोग निकम, जयंत कदम, भारत वडके, मंगेश सुकूम, गणेश महांगरे, संजय राहिलकर, सचिन सुतार, राजेंद्र पांचाळ, …

Read More »