कर्जत : बातमीदार रायगड जिल्हा माहिती कार्यालय आणि कलारंग सांस्कृतिक सामाजिक संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कलारंगच्या कलाकारांनी कर्जत शहरात जागर आरोग्याचा या पथनाट्यातून जनजागृती केली.कोविडपासून घ्यावयाची काळजी तसेच वर्षभरात शासनाने सुरु केलेल्या नवनविन योजनांची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने कलारंगच्या कलाकारांनी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या मार्गदर्शनाने कर्जत …
Read More »हिंदू मुन्नानी संघटना, चंद्रकांत सोमपुरा यांना श्री गुरुजी पुरस्कार जाहीर; अलिबागमध्ये होणार पुरस्कार वितरण समारंभ
अलिबाग : प्रतिनिधी रा. स्व. संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय स्तरावरील परमपूजनीय श्री गुरुजी पुरस्कार यंदा समाजप्रबोधन क्षेत्रात तामिळनाडूतील हिंदू मुन्नानी संघटना व कला क्षेत्रासाठी सुप्रसिध्द वास्तूविशारद चंद्रकांत बलवंतराय सोमपुरा यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या …
Read More »एक्स्प्रेस वेवर रसायनीजवळ क्वालीसला धडक, एक जण ठार
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनी पोलिसांच्या हद्दीत गुरुवारी (दि. 18) सकाळी अज्ञात वाहनाने क्वालीस कारला धडक दिली. या अपघातात राहूल धनाने (28) हा जागीच ठार झाला तर कारचालक सिध्देश पाटील (दोघे रा. अंधेरी मुंबई) हा किरकोळ जखमी झाला. पाटील याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरा अपघात …
Read More »खारघर येथे उद्या सिडको मास्टर्स कप गोल्फ स्पर्धा
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवानवी मुंबईतील सिडकोच्या खारघर व्हॅली गोल्फ कोर्स या गोल्फ मैदानावर 20 फेब्रुवारी रोजी सिडको मास्टर्स कप-2021 या गोल्फ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध टेनिसपटू लिअॅण्डर पेस यांसह मुंबई आणि पुण्यातील बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लब (बीपीसीजी), विलिंग्डन गोल्फ क्लब, ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट, पुना गोल्फ क्लब, युएस …
Read More »रायगड जिल्हा कबड्डी निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धा
पाली : प्रतिनिधीरायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनची कुमारी गटाची जिल्हा निवडचाचणी व अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 24 फेब्रुवारी रोजी पेण तालुक्यातील मुंढाणी येथे होत आहे. जिल्ह्यातील नामवंत 16 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेतया स्पर्धेतून 5 ते 8 मार्च या कालावधीत जळगाव येथे होणार्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेणार्या जिल्ह्याच्या संघाची निवड …
Read More »कोरोनावर मात केलेल्या खेळाडूचा मैदानात मृत्यू
पुणे : प्रतिनिधीकोरोना या महाभयंकर आजारावर मात केलेल्या एका क्रिकेटपटूचा मैदानावरच मृत्यू झाला. महेश उर्फ बाबू नलावडे असे या खेळाडूचे नाव असून, पुण्यातील जाधववाडी येथे बुधवारी (दि. 17) ही दुर्दैवी घटना घडली.पुण्यातील जाधववाडी येथील मयूर चषक क्रिकेट स्पर्धेत ओझर आणि जांबुत या संघांमध्ये सामना सुरू होता. या सामन्यात ओझर संघाकडून …
Read More »नदाल, बार्टीचे आव्हान संपुष्टात
सिडनी : वृत्तसंस्थास्पेनच्या दुसर्या मानांकित राफेल नदालचे कारकीर्दीतील 21वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचे स्वप्न स्टेफानोस त्सित्सिपास याने उधळून लावले. जेतेपदाचा दावेदार समजला जाणारा नदाल तसेच महिलांमध्ये अग्रमानांकित अॅश्ले बार्टी यांचे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.सुरुवातीचे दोन सेट जिंकूनही खेळात सातत्य राखता न आल्याने नदालला पराभवाचे तोंड पाहावे …
Read More »वंडर्स पार्कमध्ये येणार अत्याधुनिक खेळणी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नेरूळ येथील वंडर्स पार्कमधील खेळणी जुनी, धोकादायक आणि नादुरुस्त झाली असून अनेक खेळणी बंद अवस्थेत आहेत. यामुळे पार्कमध्ये येणार्या नागरिक आणि लहान मुलांचा हिरमोड होत आहे. या पार्कच्या सुधारणेसह फेरबदल केला जाणार असून विविध अत्याधुनिक खेळणी बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वंडर्स पार्कला नवीन झळाळी …
Read More »शिवरायांची आकर्षक मूर्ती नागरिकांना देणार भेट
नगरसेवक विक्रांत पाटील यांचा शिवजयंतीनिमित्त अनोखा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त शिवजयंती निमित्त भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या वतीने शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात या अनोख्या उपक्रमाद्वारे महाराजांची एक आकर्षक मूर्ती प्रभागातील नागरिकांना भेट देण्यात येत आहे. प्रभागातील नागरिक आपल्या घरात शिवजयंतीच्या दिवशी मूर्तीचे पूजन करून महाराजांना मानाचा मुजरा …
Read More »कारची ट्रॅक्टरला धडक
पोलीस अधिकार्याचा मृत्यू; दोन सहकारी जखमी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सीबीडी येथील पोलीस मुख्यालयातील सहायक उपनिरीक्षक सूर्यकांत गायकवाड (वय 54) यांचा अपघाती मृत्यू झाला. इंदापूर मार्गावरील भिगवण परिसरात गुरुवारी (दि. 18) सकाळी त्यांचा अपघात झाला. त्यांच्या कारने ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. मागील काही दिवसांपासून नवी मुंबई …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper