कर्जत : बातमीदार नेरळ येथील कोतवालवाडी ट्रस्टच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेतलेला ऊसतोड कामगारांचा मुलगा अभियांत्रिकीमधील उच्च शिक्षण घेण्यासाठी जर्मनीला निघाला आहे. पालघरमधील एका ट्रस्टने त्या विद्यार्थ्यांला उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत केली आहे. सोमवारी (दि. 15) या विद्यार्थ्याला शुभेच्छा देण्यात आल्या. उत्तरेश्वर शेप हा बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगाराचा मुलगा. मुलांना आपल्याप्रमाणे …
Read More »बोरघाटात यमराज अवतरले; वाहनचालकांना पटवून दिले वाहतुकीचे नियम; पार्ले बिस्कीट कंपनीचा उपक्रम
खालापूर : प्रतिनिधी राज्यात 32व्या रस्ता सुरक्षा अभियान सुरू असून त्या अनुषंगाने बोरघाट पोलीस केंद्र आणि पार्ले बिस्किट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरून वाहतूक करणार्या वाहनचालकांना वाहने थांबवुन वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यात आली. बोरघाट पोलीस केंद्राचे सहाय्यक निरीक्षक जगदिश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. मुंबई-पुणे …
Read More »कोरोना पुन्हा डोके वर काढतोय!; नेरळमध्ये एकावेळी चार रुग्ण सापडल्याने भीतीचे वातावरण
कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायत हद्दीत गंगानगर भागात एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोना झाल्याने नेरळमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याच इमारतीच्या बाजूला रविवारी मोठ्या जोषात साखरपुडा समारंभ झाल्याने या समारंभातून कोरोना पसरणार तर नाही ना? अशी देखील भीती आरोग्य विभागाला आहे. कर्जत तालुक्यात मागील दोन महिन्यात कमी झालेल्या …
Read More »नेरळ रेल्वेस्थानकाचा होणार कायापालट; स्कायवॉक, पादचारी पूल, सरकते जिने व अन्य सुविधांची तरतूद
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील नेरळ रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून, त्यात स्काय वॉक, दोन नवीन पादचारी पूल, सरकता जिना, प्रवाशांसाठी निवारा शेड आदी बर्याच कामांचा समावेश आहे. नेरळ हे जंक्शन रेल्वे स्थानक असून या स्थानकातून माथेरानकरिता मिनिट्रेन सोडली जाते. या मिनिट्रेनचा मार्ग, इंजिने …
Read More »अलिबागच्या जिल्हा रुग्णालयाला घरघर; आरोग्य खात्याकडून नवीन इमारतीची मागणी
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा रुग्णालयाची इमारत अतिशय धोकादायक झाली आहे. इमारतीच्या आंतररुग्ण विभागातील छताचा स्लॅब पुन्हा कोसळला. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. त्यामुळे चाळीस वर्षे जुन्या झालेल्या या इमारतीच्या देखभाल, दुरुस्तीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या जिल्हा रुग्णालयाची इमारत 1980-81 मध्ये बांधण्यात आली आहे. या दोन …
Read More »कचर्यातून रोजगाराची संधी
स्वच्छ भारत अभियान 2021 अंतर्गत महापालिकेचा तीन आर तत्वावर आधारित स्वच्छता रथ सध्या पनवेलमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. शहरातील वीस प्रभागातील कचर्यात टाकून देण्यात येणारे परंतु वापरण्यायोग्य जुने कपडे, ई-कचरा, जुनी पुस्तके, जुनी भांडी, जुने चप्पल, बुट, प्लॅस्टिक, इतर वस्तू या रथातून गोळा करून त्यांचे वर्गीकरण करून पुनर्वापर करण्यात येणार …
Read More »तळोजात वाहतूक नियमांबाबत जनजागृती
पनवेल : वार्ताहर तळोजा वाहतूक शाखा अंतर्गत रॅपिड अॅक्शन फोर्सचे दोन अधिकारी, 40 जवान, तळोजा शाखेकडील दोन अधिकारी 12 कर्मचारी यांनी वाहतूक नियमांची जनजागृती केली. रॅपिड ऍक्शन फोर्स कॉलनी, चौक या ठिकाणाहून मोटरसायकल रॅली काढून तळोजा फेज वन, तळोजा फेज 2, घोटगाव घोट कॅम्प, आयजीपीएल नाका, एमआयडीसी रोड, नावडे, तळोजा …
Read More »झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबत रहिवाशांना माहिती
नगरसेविका सुशिला घरत यांची उपस्थिती पनवेल : वार्ताहर पंचशील नगर सामाजिक संस्था मार्फत भविष्यात झोपडपट्टी पुनर्वसनबाबत ज्या दोन योजना आहे त्या योजनांची माहिती झोपडपट्टीत राहणार्या नागरिकांना देण्यात आली. या वेळी पनवेल महानगरपालिका नगरसेविका सुशिला घरत, सामाजिक करार्यकर्ते जगदिश घरत उपस्थित होते. पंचशील नगर सामाजिक संस्था अध्यक्ष शंकर वायदंडे यांनी ही …
Read More »पनवेलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उजळला
नगरसेवक राजू सोनी यांचे प्रयत्न पनवेल : वार्ताहर पनवेल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांच्या प्रयत्नाने उजळला आहे. लक्ष्मी वसाहत येथील नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पूर्वी छोट्या लाइट होत्या. त्यामुळे पुतळा अंधारमय वाटत होता. येथील स्थानिक रहिवाश्यांनी नगरसेवक राजू सोनी …
Read More »पोलीस हवालदाराची आत्महत्या
पनवेल : वार्ताहर खारघर पोलीस ठाण्यात नेमणूक असलेल्या पोलीस हवालदार संतोष पाटील यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेने पोलीस वर्तुळात भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. खारघर पोलीस स्टेशन नेमणूक असलेले पोलीस हवालदार 179 संतोष नामदेव पाटील (वय 47, रा. सरस्वती कोहौसो प्लॉट नंबर 83 सेक्टर 12, खारघर) …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper