Breaking News

महत्वाच्या बातम्या

कोरोनाचा धोका अद्याप कायम; काळजी घेण्याचे नवी मुंबई मनपाकडून आवाहन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यामुळे नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र निष्काळजीपणामुळे पुन्हा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे रुग्णसंख्या कमी झाली असली तरी धोका अद्याप संपलेला नसून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. नवी मुंबईमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच …

Read More »

शिवजयंती होणार साधेपणाने; पनवेल महापालिका हद्दीत प्रशासनाचे निर्देश

पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर पनवेल महानगरपालिकेने शहरातील शिवजयंती मंडळांनी यावर्षीचा शिवजयंतीचा उत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन शुक्रवारी (दि. 12) शिवजयंती उत्सव समितीच्या झालेल्या बैठकीत केले. या वेळी माघी गणेश उत्सवदेखील साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने  करण्यात आले आहे. शुक्रवारी महापालिकेत सकाळी 11.30 वाजता महापौर डॉ. कविता …

Read More »

उशीरा सुचलेले शहाणपण

कोरोनाची साथ ओसरत असल्यामुळे अनेक व्यवहार मूळ पदावर येऊ लागले आहेत. मॉल, बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. मुंबईतील उपनगरी रेल्वेसेवाही पूर्ववत होण्यास सज्ज झाली आहे. लग्नसमारंभ, सार्वजनिक कार्यक्रम सावधगिरी पाळून पार पाडले जात आहेत. इतकेच नव्हे तर भायखळ्याच्या जिजामाता उद्यानात पेंग्विनच्या भेटीला यायचं हं.. अशी लाडाकौतुकाची निमंत्रणेही महापालिकेतर्फे प्रसारित करण्यात येत …

Read More »

सिडकोतर्फे 106 निवासी भूखंड विक्रीकरिता उपलब्ध

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाकडून नवी मुंबईतील नवीन पनवेल, खारघर, नेरूळ, घणसोली आणि ऐरोली नोडमधील 106 इतक्या मोठ्या प्रमाणावर निवासी भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे भूखंड हे बंगलो, रो-हाऊस आणि निवासी इमारतींकरिता उपलब्ध आहेत. यामुळे नवी मुंबईमध्ये स्वत:च्या मालकीचे बंगला, रो-हाऊस बांधू इच्छिणारे नागरिक आणि …

Read More »

गणेशमुर्ती चार दिवसांत तयार होतात का?

भाजप नेते आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल मुंबई : प्रतिनिधी माघी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. माघी गणेशोत्सवासाला केवळ पाच दिवस बाकी असताना नऊ फेब्रुवारीला राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यात गणेशमूर्तीची उंची चार …

Read More »

‘ज्यो रूट फलंदाजीतील सर्व विक्रम मोडेल’

लंडन ः वृत्तसंस्थाइंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट हा फिरकीचा यशस्वी सामना करणारा देशाचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडू असून, आतापर्यंत आमच्या फलंदाजांनी नोंदविलेले सर्व विक्रम तो मोडीत काढेल, असे भाकीत माजी कर्णधार नासिर हुसेन याने नुकतेच केले. रूटने चेन्नई कसोटीत भारताविरुद्ध पहिल्या डावात 218 धावांची दमदार खेळी केली. स्काय स्पोर्ट्ससाठी लिहिलेल्या स्तंभात नासिर …

Read More »

कुंबळेंच्या क्रिकेट समितीवर कोहलीचा निशाणा

चेन्नई ः वृत्तसंस्था इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा 227 धावांनी पराभव झाला. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचण्याचे भारताचे अलंडविरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीने अनिल कुंबळेंच्या नेतृत्वातील आयसीसी क्रिकेट समितीवर निशाणा साधला आहे.कोरोना लॉकडाऊनमुळे मागच्या वर्षी फार टेस्ट खेळल्या गेल्या नाहीत. त्यामुळे कुंबळेंच्या नेतृत्वातील आयसीसी क्रिकेट समितीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नियमांमध्ये बदल केले. …

Read More »

दुसर्‍या कसोटीत अँडरसनला विश्रांती

चेन्नई ः वृत्तसंस्थाभारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा 227 धावांनी दणदणीत विजय झाला. भारतातील इंग्लंडचा हा सगळ्यात मोठा विजय होता. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटचे द्विशतक आणि जलद गोलंदाज जेम्स अँडरसनच्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडने हा विजय साकारला, पण आता दुसर्‍या कसोटीत अँडरसनला विश्रांती दिली जाऊ शकते. इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक क्रिस सिल्व्हरवूड यांनी याबाबतचे …

Read More »

भारतीय संघ दुखापतींच्या फेर्‍यात; पाच खेळाडू अनफिट

चेन्नई ः वृत्तसंस्थाभारताला इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमवावा लागला. त्यानंतर दुसर्‍या सामन्यासाठी संघ निवड ही भारतीय संघासाठी महत्त्वाची आहे, पण भारतीय संघ अजूनही दुखापतींच्या फेर्‍यांमध्ये अडकलेला पाहायला मिळत आहे. कारण भारताचे पाच खेळाडू अजूनही अनफिट ठरले आहेत. त्यामुळे भारतीय संघासाठी हा एक मोठा धक्काच असेल. परिणामी भारतीय संघासमोर आता जास्त …

Read More »

महावितरणने वीज जोडण्या तोडल्याने कर्जत-कळंब भागातील आदिवासीवाड्या अंधारात

कर्जत : बातमीदार थकीत वीज बिल न भरल्याने कर्जत तालुक्यातील कळंब ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील तीन आदिवासी वाड्यांमधील  45घरांच्या वीज जोडण्या तोडण्यात आल्या आहेत. या कारवाईचा निषेध करून, सर्व आदिवासींच्या वीज जोडण्या त्वरित पुर्ववत कराव्यात, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा कळंब भागातील कार्यकर्ते शिवराम बदे यांनी महावितरणला दिला आहे. कळंब …

Read More »