कर्जत : बातमीदार तालुक्यातील वाकस ग्रुपग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर भारतीय जनता पक्षाच्या रंजना विठ्ठल भागीत यांची बिनविरोध निवड झाली आहे. नेरळ जवळील वाकस ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच असलेल्या जगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी सरपंच सुलक्षणा संजय तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी उपसरपंच पदासाठी भारतीय …
Read More »फळसगाव-पाचाड रस्ता रुंदीकरणात शेतजमिनींचे नुकसान
नुकसानभरपाईच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष महाड : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील निजामपूर ते किल्ले रायगड या मार्गाचे रुंदीकरण सुरु करण्यात आले असून, या रुंदीकरणात ज्यांच्य जमिनी गेल्या आहेत, त्या शेतकर्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. मात्र या मागणीकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. किल्ले रायगडाकडे येण्यासाठी माणगाव तालुक्यातील निजामपूर येथून पाचाड आणि पुढे …
Read More »वीज वितरण कंपनीने तोडली सिद्धेश्वर, खांडसई शाळांची वीज
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर (बुद्रुक) ग्रामपंचायतीने वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची लेखी विनंती करूनही महावितरणने ग्रामपंचायत हद्दीतील सिद्धेश्वर आणि खांडसई गावातील मराठी शाळांची वीज जोडण्या तोडण्याची तत्परता दाखविली. कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांचे अर्थचक्र कोलमडून पडले आहे. मात्र महावितरणच्या वाढीव वीजबिलांनी ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. सध्या वीज देयके न दिलेल्यांचे …
Read More »खांबेरे ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांसाठी कार्यशाळा
रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील खांबेरे ग्रामपंचायतीच्या वतीने 15 वा वित्त आयोगाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या मोफत व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेला ग्रामपंचायत हद्दीतील महिला व युवतींनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. खांबेरे ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेत इंटिमेशन दागिने बनविणे, ब्रॉचेस तयार करणे याचे प्रशिक्षण देण्यात आले. सरपंच गिता वारगुडे, उपसरपंच जयश्री …
Read More »वीज केबलसाठी रस्त्याची साइडपट्टी खोदली
पोशीर ग्रामस्थांनी काम पाडले बंद; पुन्हा काम सुरू केल्यास आंदोलन कर्जत : बातमीदार नेरळ – कळंब रस्त्याची साईडपट्टी खोदून तीव्र क्षमते (22केव्ही)ची भूमिगत विद्युत वहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तेथे कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नसल्यामुळे पोशीर ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी आतापर्यंत किमान 20वेळा …
Read More »मत्स्य पर्यटनवाढीसाठी मत्स्य व्यवसाय विभागाची पावले
परदेशी धर्तीवर समुद्रकिनारी सुरू करणार वाहनातून फूड स्टॉल अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात समुद्र, धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनात वाढ होत असताना आता मत्स्य पर्यटनालाही वाव देण्यासाठी मत्स्य व्यवसाय विकास विभागाने पावले उचलली आहेत. जिल्ह्यात येणारा पर्यटक हा निसर्गाचा आनंद घेत असताना येथील ताज्या मासळीवरही चांगलाच ताव मारत असतो. मत्स्य विभागाने मत्स्य …
Read More »मच्छीमारांना डिझेल परतावा देण्याबाबत दुर्लक्ष!
अवकाळी पाऊस व वादळी वार्यामुळे स्थानिक मच्छिमार हैराण असतानाच सध्या त्यांना मासळीच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. मच्छिमारांना किमान सात दिवस खोल समुद्रात जाऊन मच्छिमारी करावी लागते, या कालावधीसाठी बोटींवर असणार्या कामगारांना मजुरी देणे, बर्फाचा साठा करणे, डिझेल, बोटींवर सात दिवसाचे अन्नधान्य, किराणा माल, रॉकेल आदी स्वरूपाच्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी …
Read More »शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण : कळंबोलीत महिलांना स्वसंरक्षणाचे धडे
पनवेल : वार्ताहर कळंबोली परिसरातील महिला व मुलींना स्वतःचे संरक्षण स्वतः करता यावे यासाठी स्वयंमसिद्धाचे धडे देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवीर संघाच्या मदतीने स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण वर्गाचा रविवारी (दि. 7) शुभारंभ करण्यात आला. यामध्ये प्रशिक्षणार्थींना मर्दानी खेळ शिकवले जाणार आहेत. यासाठी विजया …
Read More »कै. मुग्धा लोंढे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महिलांसाठी कीर्तन स्पर्धा
पनवेल : वार्ताहर भाजपच्या दिवंगत नगरसेविका मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी कीर्तन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा फक्त 20-40 वयोगटातील महिलांसाठीच असणार असून पनवेल येथील श्री विरूपाक्ष महादेव मंदिर येथे सोमवारी (दि. 8 मार्च) होणार आहे. स्पर्धेच्या प्रवेश अर्जासाठी https://forms.gle/9KFsJ2KFkeGsy8Ut9 या लिंकवर भेट …
Read More »काळाधोंडा प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना सर्वतोपरी मदत करणार -आमदार महेश बालदी
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील कोटनाका काळाधोंडा येथील स्थानिक भूमीपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकर्यांची उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान आमदार महेश बालदी यांनी प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या समस्या जाणून घेतल्या व समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. या वेळी काळाधोंडा स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper