लंडन : वृत्तसंस्था भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचे खेळाडू बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भारतात दाखल झाले आहेत. स्टोक्सने विमानातील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत याबाबतची माहिती दिली. या फोटोवर त्याने ‘भारतीयांनो, लवकरच भेटूयात’ असे कॅप्शनही दिले आहे. इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंकेत कसोटी मालिका खेळत आहे. पहिला सामना इंग्लंडने …
Read More »युवा भारतीयांच्या तुलनेत तुम्ही अद्याप प्राथमिक शाळेतच; चॅपल गुरुजींनी ऑस्ट्रेलियाला सुनावले
सिडनी : वृत्तसंस्था प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या युवा ब्रिगेडने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत 2-1ने पराभूत करीत इतिहास रचला. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या काही माजी खेळाडूंनी त्यांच्या संघावर टीका केली आहे. यामध्ये आता आणखी एका दिग्गजाची भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू आणि भारतीय …
Read More »नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात
रोहे ः प्रतिनिधी मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून कोकण एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल साळुंके यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला …
Read More »मुरूडला पर्यटकांचे उधाण
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड व काशिद समुद्रकिनारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली असून जिथे पाहावे तिथे वाहनांच्या मोठ्या रांगा दिसत होत्या. शनिवार-रविवार त्याचप्रमाणे सोमवारची रजा टाकून मंगळवारच्या प्रजासत्ताक दिनाच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक बाहेर पडलेले दिसून आले. समुद्रकिनारी वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता. मुरूड व काशिद …
Read More »अष्टविनायक दर्शन सहलसेवा सुरू
अलिबाग एसटी आगाराचा स्तुत्य उपक्रम; प्रवाशांचा उदंड प्रतिसाद अलिबाग ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात एसटीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. अजूनही त्यातून एसटी सावरलेली नाही. अशा वेळी उत्पन्न वाढवण्याबरोबरच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटीकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने अलिबाग एसटी आगाराने अष्टविनायक दर्शन सहलसेवा सुरू केली असून, आगारप्रमुख अजय …
Read More »नेरळ-माथेरान घाटातील अपघात टळला
जिप्सी धडकली संरक्षक भिंतीला; प्रवासी सुखरूप कर्जत ः बातमीदार मुंबईतील काही पर्यटक कुटुंबासह माथेरान येथे रविवारी (दि. 24) सकाळी येण्यास निघाले होते. जिप्सीतून आलेले पर्यटक नेरळ-माथेरान घाटातून प्रवास करताना घाटातील एस टर्न या अवघड वळणावर तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने जिप्सी दगडी कठड्यावर चढली. दरम्यान, सुदैवाने जिप्सीमधील सर्व प्रवासी सुखरूप …
Read More »तहसीलदारांच्या आश्वासनानंतर पोलीस मित्र संघटनेचे उपोषण मागे
कर्जत ः बातमीदार कर्जत येथील लोकमान्य टिळक चौकात पोलीस मित्र संघटनेच्या पदाधिकार्यांनी महसूल विभागातील तलाठ्यांच्या कारभाराबाबत उपोषण सुरू केले होते, मात्र तीन दिवस झाले तरी तेथे कोणतेच अधिकारी फिरकले नाहीत. अखेर चौथ्या दिवशी तहसीलदार उपोषणस्थळी आले व त्यांनी एका महिन्यात आपली मागणी पूर्ण होईल, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात …
Read More »जुन्या उद्यानांची दुरवस्था
शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात धाटाव ः प्रतिनिधी एकीकडे रोहा तालुक्याचा चेहरामोहरा झपाट्याने बदलत आहे, मात्र तेवढ्याच पटीने जुन्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी नवीन अभिमानास्पद अशी उद्याने बांधण्याचे काम सुरू आहे, तर दुसरीकडे कोलाड येथे शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च करून सुसज्ज असे पाटबंधारे विभागाच्या अधिपत्याखाली उद्यान बांधण्यात …
Read More »संभाव्य वार्षिक वित्तपुरवठा आराखड्याचे जिल्हाधिकार्यांच्या हस्ते विमोचन
अलिबाग : जिमाका राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेमार्फत (नाबार्ड) रायगड जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेल्या पुढील आर्थिक वर्ष 2021-22च्या प्राधान्य क्षेत्रासाठी एकूण चार हजार 448.86 कोटी रुपयांच्या संभाव्य वित्तपुरवठा आराखड्याचे विमोचन शुक्रवारी (दि. 22) जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीच्या बैठकीत करण्यात आले. जिल्हा …
Read More »शिक्षण, मानसिक आरोग्याचा परीघ वाढवायला हवा
डॉ. आनंद नाडकर्णी यांचे प्रतिपादन अलिबाग ः प्रतिनिधी शिक्षण आणि मानसिक आरोग्य यांच्यात अभेद्य संबंध आहे. शिक्षण असो वा मानसिक आरोग्य दोघांचा परीघ वाढविला, तर ध्येयाकडे वाटचाल करता येऊ शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी येथे केले. विचार, भावना व वर्तन या तिन्ही घटकांवर शिक्षण आणि मानसिक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper