आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जोशी पंचकर्म क्लिनिकच्या वतीने राष्ट्रीय आयुर्वेद दिवस सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जोशी पंचकर्म क्लिनिकच्या माध्यमातून मागील पाच वर्षांपासून या सोहळ्याचे आयोजन केले जाते. …
Read More »रायगडातील मंदिरांत लगबग
पाली : प्रतिनिधी अष्टविनायक देवस्थानांपैकी पालीतील बल्लाळेश्वर मंदिर सोमवारपासून दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आतुर झालेले भक्त भाविक, पर्यटक आता सुखावले आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. दिवाळी पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार पाली (ता. …
Read More »खारघरच्या तरुणांनी साकारली सिंहगडाची प्रतिकृती
खारघर ः प्रतिनिधी महाराष्ट्राचा मराठमोळा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी, संस्कृती व परंपरेची आठवण किल्ल्यांच्या साक्षीने जागृत करावी, तसेच किल्ले बनवून त्याप्रति आपली आत्मीयता प्रकट करणे व आपले दिवाळीतील लहानपण जागे करण्याच्या हेतूने खारघरमधील युवकांनी एकत्र येऊन सचिन तेंडुलकर मैदान सेक्टर 21 या ठिकाणी सिंहगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती तयार केली …
Read More »खंडित बससेवा पूर्ववत करा -उज्ज्वला झंजाड
नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1मधील नागरिकांसाठी काही वर्षांपूर्वी परिवहन सेवेने सुरू केलेली बससेवा बंद केली आहे. परिणामी या ठिकाणी राहणार्या नागरिकांना आपल्या हक्काच्या बससेवेचा लाभ घेता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर येथील नागरिक व चाकरमान्यांना वाशी, ऐरोली येथे येण्या-जाण्यासाठी बससेवा सुरू करावी, अशी मागणी प्रभाग 1च्या …
Read More »‘आरएसएस’चा वनवासींसोबत दिवाळी फराळ
पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस)वतीने दुंदरेवाडी, तामसईवाडी, करंजाडे येथील फणसवाडी आणि भोंगळपाडा या वनवासी वस्त्यांवर रविवारी (दि. 15) दिवाळीनिमित्त वनवासी बांधवांबरोबर दिवाळी फराळ करण्यात आला. या वेळी पनवेलमधील तरुण मुले-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास या वाड्यांवर स्वयंसेवक पोहचले. एक देशभक्तीपर गीत त्यांच्या समवेत गाण्यात …
Read More »माथेरान पर्यटकांनी गजबजले
मिनीट्रेन शटल सेवेच्या फेर्यांमध्ये वाढ कर्जत : बातमीदारप्रसिद्ध माथेरान पर्यटनस्थळ पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजले आहे. लॉकडाऊननंतर आठ महिन्यांनी प्रथमच माथेरानमध्ये पर्यटकांची मांदियाळी पहावयास मिळाली. ऐन दिवाळीत पर्यटकांच्या आगमनाने माथेरानकर सुखावला आहे. दरम्यान, पर्यटकांसाठी मिनीट्रेनच्या शटल सेवेत वाढ करण्यात आली असून, 22 नोव्हेंबरपर्यंत शटल सेवेच्या आठ फेर्या असणार आहेत.दिवाळी हा माथेरानचा …
Read More »किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण
मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून गौरव पनवेल : रामप्रहर वृत्त दीपावलीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमास नगरसेविका रूचिता लोंढे, युवा मोर्चाचे उत्तर जिल्हा चिटणीस चिन्मय समेळ, पनवेल शहर …
Read More »पनवेलच्या विरुपाक्ष मंदिरात आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थितीत महाआरती
पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोनामुळे गेले सुमारे आठ महिने बंद असलेली राज्यातील धार्मिक स्थळे भाजप तसेच विविध संघटनांच्या मागणीनंतर दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर अखेर खुली करण्यात आली. याचा आनंदोत्सव म्हणून सोमवारी (दि. 16) सायंकाळी पनवेल शहरातील विरूपाक्ष मंदिरात महाआरती करण्यात आली. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.राज्यात …
Read More »साखरपुड्याच्या पार्टीसाठी बोलवून तरुणीवर मित्रांचा सामूहिक बलात्कार
मुंबई : प्रतिनिधीमैत्रिणीला साखरपुड्याच्या पार्टीसाठी म्हणून बोलवून तिच्यावर मित्रांनीच सामूहिक बलात्कार केल्याची घटना मुंबईतून समोर आली आहे. अंधेरी-कुर्ला रोडवरील एका हॉटेलमध्ये मागच्या आठवड्यात हा संतापजनक प्रकार घडला.पीडित तरुणीने 15 नोव्हेंबरला तीन आरोपींविरोधात तक्रार नोंदवली आहे. आरोपींनी मला व अन्य दोन महिलांना पार्टीसाठी निमंत्रित केले होते. त्यानंतर आरोपींनी माझ्यावर बलात्कार केला, …
Read More »सत्तेसाठी नेते इटालियन काँग्रेसच्या मांडीवर बसले मग कार्यकर्त्यांनी दारू विकली तर कुठे बिघडले?
भाजप नेते अतुल भातखळकर यांचा टोला मुंबई : प्रतिनिधीलोकांनी पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय बिघडले? पोलीसही हप्ते घेतातच ना असे वक्तव्य माजी मंत्री आणि शिवसेनेचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे. पोलिसांनी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर अवैध दारूविक्री केल्याने कारवाई केली असून, त्यांची पाठराखण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper