Breaking News

महत्वाच्या बातम्या

आमदार महेश बालदी यांचे आभार

उरण : जेएनपीटी वसाहतीमधील भाडेवाढीला बंदर व्यवस्थापनाने 31 मार्च 2021पर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याने रहिवाशांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी आमदार महेश बालदी यांचे आभार मानले. या शिष्टमंडळात गणेश ठाकूर, रामदास पाटील, विकास पाटील, प्रदीप कडू, सुरज पवार, गिरीष म्हात्रे यांचा समावेश होता.

Read More »

पनवेलमध्ये गरजूंना मोती साबणाचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महापालिका क्षेत्रातील युनीसेफ, हिंदुस्तान युनीलीवर आणि शेल्टर या संस्थांच्या माध्यमातून मोती साबणाचे वाटप प्रभाग क्रमांक 14 मधील एचओसी कॉलनी आदिवासी वाडी येथील नागरिकांना नगरसेवक मनोहर म्हात्रे व पनवेल कोळीवाडा येथे नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पवन सोनी, वरिष्ठ …

Read More »

खालापुरात बंदी असलेल्या प्लास्टिकचा डोंगर

नगरपंचायत कारवाईच्या इशार्‍याला भंगारवाला जुमानेना खालापूर : प्रतिनिधी येथील मुख्य रस्त्यालगत एक भंगारवाला वापरत असलेल्या जागेवर बाहेरून आणलेले प्लास्टिक टाकण्यात येत असून, या ठिकाणी बंदी असलेल्या प्लास्टिकचा डोंगर उभा राहिला आहे. त्याबाबत कारवाई करण्याचा इशारा नगरपंचायतीने दिला आहे.  या इशार्‍याला भंगार व्यावसायिकाने कचर्‍याची टोपली दाखविली आहे. खालापूर शहरातील स्वामी विवेकानंद …

Read More »

आजपासून देवीचा जागर

कोरोनामुळे नवरात्रोत्सवही होणार साधेपणाने पनवेल : रामप्रहर वृत्तआदिशक्ती, आदिमाया यांसारख्या विविध रूपांनी व नावांनी ओळखल्या जाणार्‍या देवीच्या नवरात्रोत्सवाला शनिवार (दि. 17)पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने सार्वजनिक स्वरूपात देवीची प्रतिष्ठापना होणार असून, घरगुती घटही बसतील. त्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत.गणेशोत्सवानंतर भाविकांना आता नवरात्रोत्सवाची उत्सुकता आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत देवीची …

Read More »

खराब हवामानामुळे मच्छीमारही हतबल

मुरूड : प्रतिनिधीवादळी पावसामुळे एकीकडे शेतकरी हवालदिल झाला असताना या खराब हवामानाचा फटका मच्छीमारांनाही बसला असून, मिळकत तुटपूंजी आणि खर्चाचा वाढता बोजा यामुळे बोटी किनार्‍यावर शाकारण्यावाचून कोळी बांधवांना दुसरा पर्याय राहिलेला नाही. कोकणातील रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. जिल्ह्यात सुमारे 25 हजार छोट्या-मोठ्या मच्छीमार बोटी असून, जवळपास अडीच …

Read More »

रायगडात भातशेतीचे नुकसान

परतीच्या पावसाच्या तडाख्याने बळीराजा हवालदिल नागोठणे : प्रतिनिधीसमुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रायगड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे भातशेती भिजून शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भातपिकाचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.रायगड जिल्ह्याला भाताचे कोठार …

Read More »

रायगडात ओला दुष्काळ जाहीर करा

भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांची मागणी पाली : रामप्रहर वृत्त – परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या भात पीकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेवून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व नुकसान भरपाई देऊन शासनाने बळीराजाला दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपचे दक्षिण …

Read More »

शेलू रेल्वेस्थानकात लोकलला थांबा

दैनिक रामप्रहरच्या पाठपुराव्याला यश कर्जत : बातमीदार – मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे मेन लाईनवरील  शेलू स्थानकात आपत्कालीन सेवेतील कामगारांसाठी चालविली जाणारी उपनगरीय लोकल थांबत नव्हती. त्याबाबतचे वृत्त दैनिक रामप्रहरमध्ये 11 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत मध्य रेल्वेने 16 ऑक्टोबरपासून शेलू स्थानकात लोकलला थांबा देण्याचे आदेश निर्गमित केले. त्यामुळे …

Read More »

वाहनचालकांना मास्क, सॅनिटायझर वाटप

पनवेल : वार्ताहर वाहनचालकांचे वाहतुक नियमांबाबत प्रबोधन व्हावे याकरीता भुषण उपाध्याय सो . अप्पर पोलीस महासंचालक वाहतुक महाराष्ट्र राज्य मुंबई, यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे विजय पाटील, पोलीस अधीक्षक (मुख्यालय) व डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सुदाम पाचोरकर पोलीस निरीक्षक महामार्ग पनवेल व सहाय्यक पोलीस …

Read More »

तंदुरुस्ती पथकाच्या मदतीने पोलीस दल कोरोनामुक्तीकडे

मृत्यूचे प्रमाण शून्यावर पनवेल : बातमीदार दिवसरात्र अत्यावश्यक सेवा देणार्‍या पोलीस बांधवांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाकाळात उपचार घेत असताना कोणतीही उणीव भासू नये, यासाठी ऑगस्टच्या मध्यावधीस तंदुरुस्ती पथक (वेलनेस टीम) नेमण्यात आले होते. या पथकामुळे नवी मुंबई क्षेत्रातील पोलिसांची कोरोनामुक्तीची वाट सोपी झाली. सप्टेंबरमध्ये 500हून अधिक पोलीस …

Read More »