Breaking News

महत्वाच्या बातम्या

साल्हेर किल्ल्यावरून कोरोना योद्ध्यांना मानवंदना!

अलिबाग ः प्रतिनिधीवयाच्या तिसर्‍या वर्षीच गिर्यारोहण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव झळकावणार्‍या महाराष्ट्राच्या लाडक्या शिवकन्या शर्विका म्हात्रे हिने पुन्हा एकदा नवा इतिहास घडविला आहे. सह्याद्री पर्वतरांगांत वसलेले अनेक लहान-मोठे किल्ले गिर्यारोहकांना खुणावत असतात. त्यापैकी सह्याद्री पर्वतरांगेतील साल्हेर हा सर्वाधिक उंचीचा किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात …

Read More »

250 आदिवासी बांधवांना प्रधानमंत्री सुरक्षा विमाकवच

अलिबाग ः प्रतिनिधीअलिबाग येथील बँक ऑफ बडोदा शाखेच्या वतीने वित्तीय साक्षरता आणि वित्तीय समावेशन शिबिर नुकतेच वाडगाव आदिवासीवाडी येथे आयोजित करण्यात आले होते. या वेळी प्रधानमंत्री सुरक्षा विम्याची दोन लाखांची इन्शुरन्स पॉलिसी 250 आदिवासी बांधवांसाठी कार्यक्रमस्थळी विनाअट उघडण्यात आली.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नाबार्ड जिल्हा संचालक सुधाकर रगतवर यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमात …

Read More »

सलग दुसर्‍या दिवशी मान्सूनचा धुमाकूळ

मुंबई ः प्रतिनिधी राज्यात सलग दुसर्‍या दिवशी रविवारीही (दि. 11) परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या गडगडाटांसह बरसलेल्या पावसाने अनेक जिल्ह्यांत शेतीकामांना ब्रेक लावला, तर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत रविवारी पाऊस बरसला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस अशीच परिस्थिती …

Read More »

ग्रामीण भारताचे रूपडे पालटणार; केंद्राची महत्त्वाकांक्षी स्वामित्व योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकेंद्रातील मोदी सरकारने ग्रामीण भागाचे रूपडे पालटण्यासाठी स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 11) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी ’स्वामित्व योजना’ लॉन्च केली. या योजनेंतर्गत जमिनीच्या मालकांना प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यात येणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात …

Read More »

बैल कापून त्याची विक्री करणार्या एकास अटक

पनवेल : वार्ताहर बेकायदेशीररित्या दोन बैल कापून त्यांच्या मासांची विक्री करणार्‍या चौघांपैकी एकाला पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी व त्यांच्या पथकाने रिक्षासह पकडले असून इतर तिघांचा पनवेल शहर पोलीस शोध घेत आहेत. पनवेल शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बेकायदेशीररित्या बैल कापून त्यांच्या मासांची विक्री केली जात असल्याच्या …

Read More »

गुजरातवरून विक्रीसाठी आलेला तब्बल 35 लाखांचा गुटखा जप्त

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गुजरातमधून मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी नवी मुंबईत आला होता. मात्र, ट्रकमधून इतर दोन वाहनांमध्ये हा गुटखा भरला जात असतानाच अमली पदार्थ विरोधी पथकाने रबाळे एमआयडीसी येथे छापा टाकून कारवाई करीत 35 लाखांचा गुटखा, 14 लाख रुपये किमतीची तीन वाहने असा 49 लाख 53 हजार रुपये …

Read More »

राज्य सरकारच्या विरोधात आज आंदोलन

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्रात महिलांवर होणार्‍या अत्याचाराबाबत राज्य सरकार निष्क्रिय व उदासिन आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या सुचनेनूसार सोमवारी (दि. 12) आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात महिलांवर होणार्‍या अत्याचाराचे वाढते प्रमाण पाहता राज्यातील सरकार अत्याचार थांबविण्यासाठी कोणतेही प्रयत्न करीत नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. महिलांची सुरक्षितता …

Read More »

बर्निंग कारचा थरार

उरण : वार्ताहर उरण शहरातील कोटनाका येथील क्सिस बँकेच्या समोर पार्कींग करुन ठेवण्यात आलेली शिफ्ट डिझायर या चारचाकी गाडीला शनिवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक पेट घेतला. भर बाजारपेठेतील वर्दळीच्या रस्त्यावरच अचानक पेटलेल्या गाडीमुळे रस्त्यावरील पादचार्‍यांचीही चांगलीच तारांबळ उडाली.आगीमुळे दुचाकींना धोका पोहचण्यापुर्वीच अग्नीशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानाने तत्काळ आग आटोक्यात …

Read More »

नवी मुंबई पालिका करणार एचएफएनसी यंत्राची खरेदी

प्राणवायूची नितांत गरज असलेल्या रुग्णांना ठरणार संजीवनी पनवेल : बातमीदार कोरोनाबाधित रुग्णाला दुसर्‍या टप्प्यात प्राणवायूची गरज भासत असल्याचे आढळून आले आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर कमीत कमी व्हावा यासाठी पालिकेने आरोग्य यंत्रणेत अनेक बदल करण्याचे ठरविले असून यासाठी काही निष्णांत डॉक्टरांचा सल्ला घेतला जात आहे. प्राणवायूची नितांत गरज असलेल्या कोरोनाबाधित …

Read More »

रायगड जिल्ह्यात 294 नवे पॉझिटिव्ह; पाच रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 10) नव्या 294 कोरोना रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 413 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 165 व ग्रामीण 33) तालुक्यातील 198, अलिबाग 23, पेण 15, उरण 13, कर्जत 12, महाड 10, माणगाव नऊ, रोहा आठ, खालापूर …

Read More »