4th August 2020
महत्वाच्या बातम्या
शिव-समर्थ स्मारकास सदिच्छा भेट : दास्तान फाटा-जासई (ता. उरण) : निरुपणकार सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी व श्रेयस धर्माधिकारी यांनी मंगळवारी शिव-समर्थ स्मारकास सदिच्छा भेट दिली. आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. सोबत जेएनपीटीचे अधिकारी राजीव जोशी, नितीन ढोक आदी.
Read More »
4th August 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुका (ग्रामीण) युवा मोर्चा आणि शहर महिला मोर्चा यांच्या वतीने बुधवारी (दि. 5) विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पनवेल तालुका युवा मोर्चाच्या वतीने विविध औषधी वस्तू, धान्य व फळांचे वाटप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या …
Read More »
4th August 2020
महत्वाच्या बातम्या, रायगड
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाडमधील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरात पुराचे पाणी घुसले. दरम्यान, पुढील दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रायगड जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी सकाळपर्यंत संपलेल्या 24 तासांमध्ये …
Read More »
4th August 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त महावितरणने येत्या सात दिवसांत वाढीव वीज बिल आणि दरवाढ रद्द करून सामान्य ग्राहकांना न्याय न दिल्यास पुढील आठवड्यात त्यांच्या प्रत्येक कार्यालयाला टाळे ठोकून अधिकार्यांना आत कोंडून ठेवण्याचा इशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 4) टाळेबंद आंदोलनप्रसंगी दिला. सरकार म्हणून सर्वसामान्य नागरिकांना …
Read More »
4th August 2020
महत्वाच्या बातम्या, रायगड
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग आगारातील निलंबित 31 कर्मचार्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. या सर्व कर्मचार्यांचे निलंबन आता मागे घेण्यात येणार असून, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांची ने-आण करण्यासाठी अलिबाग आगारातील कर्मचार्यांना अलिबाग ते दादर व दादर-पनवेल अशा मार्गावर ड्युटी लावण्यात आल्या होत्या, परंतु या मार्गावर काम करण्यास कर्मचार्यांनी …
Read More »
4th August 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
उरण ः वार्ताहर, प्रतिनिधी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) कोविड-19 महामारीच्या काळातही राष्ट्रनिर्मितीत महत्त्वाच्या योगदानकर्त्याची आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने जुलै महिन्यात 344,316 टीईयू कंटेनरची हाताळणी केली आहे, जी जूनच्या तुलनेत 19 टक्के जास्त आहे. जेएनपीटीने जुलै महिन्यात एकूण 196 जहाजांची हाताळणी केली …
Read More »
4th August 2020
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई हे कॉस्मोपोलिटन शहर असल्याने विविध जातीधर्माचे व प्रांतातील नागरिक येथे राहत आहेत. त्यामुळे पालिकेने लॉकडाऊन, कोविड व नव्या नियमांच्या संदर्भातील परिपत्रक मराठीसोबतच इंग्रजीतही द्यावे. अनेक अमराठी नागरिकांना पालिकेच्या मराठीतील परिपत्रकाचा अर्थ कळत नाही. त्यामुळे अनेकदा माहिती पोहचत नसल्याने नागरिकांचा गोंधळ उडतो.मुंबई महापालिकादेखील मराठी व …
Read More »
4th August 2020
महत्वाच्या बातम्या, संपादकीय
महाराष्ट्रात बुधवारपासून अनलॉक 3च्या नव्या नियमावलीनुसार बर्याच गोष्टी चार महिन्यांनंतर प्रथमच खुल्या होणार आहेत. गेल्या आठवड्यापासून राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी काहिशी स्थिरावल्यासारखी भासत आहे, पण अद्याप चार-दोन दिवसच झाल्यामुळे लगेच काही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. मॉल, दुकाने उघडल्यामुळे जनजीवन पूर्ववत झाल्यासारखे भासून अनेकांना हायसे वाटणार आहे. ही गुड न्यूज आहे …
Read More »
4th August 2020
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
तिघांचा मृत्यू; 173 जणांची कोरोनावर मात पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 4) कोरोनाचे 122 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला, तर 173 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 99 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला, तर 135 रुग्ण बरे झाल्याने …
Read More »
4th August 2020
देश-विदेश, महत्वाच्या बातम्या
अयोध्या : वृत्तसंस्था अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर उभारणीचा भूमिपूजन सोहळा बुधवारी (दि. 5) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली असून, संपूर्ण देशवासीयांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. भूमिपूजन सोहळ्यात मुख्य मंचावर पंतप्रधान मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल …
Read More »