Breaking News

महत्वाच्या बातम्या

कोपरखैरणेमध्ये पोलिसांचा लाँगमार्च

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांची संख्या कमी करण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्यात येत असून कोपरखैरणे व तुर्भे विभागातील कोरोना बाधीतांची मोठी संख्या लक्षात घेत शुक्रवारी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत कोपरखैरणे परिसरात लाँगमार्च काढण्यात आला. यामध्ये कोरोनाशी जिद्दीने लढणार्‍या पोलीस व आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे …

Read More »

उरणमध्ये राज्य सरकारचा निषेध

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अपयशी ठरल्याने उरण तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने तालुक्यात राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. उरण तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाच कार्यकर्त्यांचा ग्रुप करून सोशल डिस्टन्सिंग ठेऊन आपआपल्या घरा जवळ काळे फीत लाऊन, निषेधाचे फलक दाखवुन राज्य सरकारचा  निषेध व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी हातामध्ये …

Read More »

खोपोलीत संशयिताची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

खोपोली : बातमीदार – कोरोना हॉटस्पॉट असलेल्या मालेगाव शहरातून खोपोलीत दाखल झालेल्या व्यक्तीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. ताप व अन्य त्रास होत असल्याने या व्यक्तीची कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा अहवाल गुरुवारी उशिरा प्राप्त झाला. हा अहवाल निगेटीव्ह असल्याने नगर परिषद प्रशासन आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला …

Read More »

पेण कासूमध्ये एकतर्फी प्रेमातून मुलीसह कुटुंबीयांना धमकी; प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

पेण : प्रतिनिधी – एकतर्फी प्रेमातून पेण तालुक्यातील कासू येथील फिर्यादी मुलगी व तिच्या कुटुंबीयांना रावे येथील आरोपीने धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडखळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कासू यांना आरोपीसोबत लग्न करावयाचे नसतानासुद्धा आरोपीने 15 ते 19 मार्चदरम्यान …

Read More »

महाड बाजारपेठ झाली खुली; गर्दीने गाठला उच्चांक

महाड : प्रतिनिधी – महाड बाजारपेठ खुली करण्यात आली असून, सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेले दोन दिवस बाजारात गर्दीने उच्चांक गाठला आहे. सर्वच दुकानांतून अंतर ठेवण्याचा नियम धाब्यावर बसवला जात असल्याने महाड शहरवासीयांना धोका निर्माण झाला आहे. मुंबई, पुण्यातून मूळ गावी परतलेले …

Read More »

मिनीडोअर वाहतूक सेवा सुरू करण्यास परवानगी द्यावी

रायगड जिल्हा विक्रम-मिनीडोअर संघटनेची मागणी पेण : प्रतिनिधी – लॉकडाऊनमुळे मिनीडोअर प्रवासी सेवा बंद झाल्याने चालक व मालकांचे प्रचंड हाल झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून वाहने उभी असल्याने आर्थिक उत्पन्नच थांबल्याने उपासमारीची वेळ आली. त्यामुळे शासनाने ही वाहने शेअर पद्धतीने सहा+एक या पद्धतीने सुरू करण्यास परवानगी द्यावी किंवा प्रत्येक रिक्षा, …

Read More »

अफवांवर विश्वास ठेवू नका -वनाधिकारी

नागोठणे : प्रतिनधी – नागोठण्यात आढळलेला प्राणी हा हिंस्र प्रकारातील नसून ते रानमांजर होते, असा निर्वाळा येथील वन विभागाचे मुख्य वनाधिकारी किरण ठाकूर यांनी दिला असून, स्थानिक जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही केले आहे. नागोठणे शांतीनगर भागातील सूर्यदर्शन कॉलनी तसेच टॉकीज परिसरात गुरुवारी (दि. 21) सायंकाळी वाघ …

Read More »

धाटाव एमआयडीसीत लॉकडाऊन काळात 800 कोटींचे उत्पादन बुडाले

रोहे : प्रतिनिधी – कोरोनाचे संकट आल्यावर जगभर मंदीचे सावट आहे. महत्त्वाचे म्हणजे औद्योगिक क्षेत्राला याचा मोठा फटका बसला आहे. रोहा तालुक्यातील सर्वात जुन्या असलेल्या धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना याचा फटका बसला आहे. धाटाव औद्योगिक क्षेत्रात सुमारे 800 कोटींचे उत्पादन बुडाले आहे. देशात व राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव होत असताना …

Read More »

कोरोना लढ्यात लोणेरे येथील विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेकडून योगदान

जिल्हा आपत्ती व्यवस्थापनास 21 हजार रुपयांचा धनादेश माणगाव : प्रतिनिधी – माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील कर्मचारी सहकारी पतसंस्थेकडून सामाजिक जाणीवेतून कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्याकरिता रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला 12 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तहसीलदार प्रियांका आयरे-कांबळे यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या वेळी पतसंस्थेचे …

Read More »

नेरळजवळ गावठी हातभट्टी उद्ध्वस्त

कर्जत : बातमीदार – उल्हास नदीच्या तीरावर उकरूळ गावाच्या हद्दीत नेरळ पोलिसांच्या पथकाने गावठी दारुभट्टी उद्ध्वस्त केली. या ठिकाणाहुन साधारणत: 13 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. नेरळ पोलीस ठाणे हद्दीत उकरूळ गावच्या मागे उल्हास नदीच्या तीरावर गावठी दारूभट्टी सुरू असल्याची माहिती प्रभारी अधिकारी अविनाश पाटील यांना मिळाली …

Read More »