पनवेल : बातमीदार नवी मुंबई शहरात मंगळवारी (दि. 31) कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 11वर गेली आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाशी येथे मंगळवारी कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला. हा रुग्ण वाशीतील मशिदीमध्ये फिलिपिन्स नागरिकांच्या संपर्कात …
Read More »समद मुल्ला यांच्याकडून गरिबांना मदतीचा हात
उरण : वार्ताहर कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, सर्वत्र लॉकडाऊन केल्याने उरण परिसरात रोजंदारीवर काम करणार्यांना काम मिळणे बंद झाले आहे, त्यांची उपासमार होत आहे.अशा गरिबांना मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण मुस्लीम मोहल्ला येथील राहणारे भाजपचे कार्यकर्ते समद मुल्ला व परिवार यांच्या …
Read More »उघड्या प्लॉटची स्वच्छता
नगरसेवक नितीन पाटील यांचा पुढाकार पनवेल : वार्ताहर वाढत्या रोगराईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील रहिवाश्यांच्या मागणीनुसार स्थानिक नगरसेवक नितीन पाटील यांनी खाजगी प्लॉटमध्ये झाडीझुडपे व साठलेल्या कचर्याची स्वच्छता करून घेतली आहे. या प्रभागातील वरद, विनायक सोसायटीच्या समोरील उघड्या जागेवर साचलेला कचरा जेसीबीच्या साहाय्याने साफ करून घेतला. या वेळी नगरसेवक नितीन पाटील, …
Read More »कोरोना रोखण्यासाठी भाजप कार्यरत
नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नाने प्रतिबंधात्मक फवारणी पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी प्रभाग क्रमांक 18 परिसरासाठी अॅण्टी कोरोना फवारणी तसेच तेथील रहिवाशांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी जास्त लांब जाण्याची आवश्यकता पडू नये, यासाठी जनसंपर्क कार्यालयाजवळ भाजीपाला विक्री केंद्र सुरू …
Read More »‘साठेबाजांवर कडक कारवाई करणार’
पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यात जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणार्या दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पेणच्या तहसीलदार डॉ. अरुणा जाधव यांनी दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही जण जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून चढ्या भावाने कालांतराने विक्री करण्याच्या मानसिकतेत असल्याचा संशय आहे. हा प्रकार निदर्शनास आल्याने तहसीलदार डॉ. अरुणा जाधव यांनी …
Read More »राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे अत्यावश्यक वस्तूंचे वाटप
श्रीवर्धन ःराज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते श्रीवर्धन तालुक्यात मदतीसाठी सरसावले आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील मारळ, केळीचीवाडी, साक्षीभैरी तसेच श्रीवर्धन शहरातील परप्रांतीय व हातगाडीधारकांना मदतीचा हात पुढे करून तांदूळ, डाळ, मीठ, मसाला, साबण इत्यादी अत्यावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी आदेश पाटील, प्रशांत शिंदे, अविनाश गोगटे, …
Read More »खोपोलीत दुसर्या दिवशीही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
खोपोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी खोपोलीत सर्वपक्षीय नेते व विविध संघटनांचे पदाधिकारी यांची नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन 31 मार्च व 1 एप्रिल असे दोन दिवस शहरात जनता कर्फ्यूचे आयोजन केले होते. त्यास खोपोलीकरांनी शंभर टक्के प्रतिसाद देत बंद यशस्वी केला. संचारबंदीतही अनेक नागरिक क्षुल्लक कारणासाठी रस्त्यावर फिरत होते. …
Read More »जिल्ह्यातील मद्यविक्री 14 एप्रिलपर्यंत बंद; प्रशासनाचे आदेश
अलिबाग ः जिमाका भारतीय साथरोग अधिनियम 1897मधील तरतुदीनुसार कोरोना विषाणूसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रायगड जिल्ह्यातील परमिट रूम, डिस्को क्लब, बार पब्ज, लाइव्ह ऑर्केस्ट्रा व इतर दारूची दुकाने 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले. त्याचप्रमाणे केंद्र शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण भारतात लॉकडाऊन …
Read More »टपाल आयुर्विम्याच्या हप्त्यास मुदतवाढ
अलिबाग ः प्रतिनिधी कोविड-19 साथीचा आजार आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेले भीतीचे वातावरण लक्षात घेता दळणवळण मंत्रालय, टपाल विभाग, टपाल आयुर्विमा संचालनालयाने मार्च 2020 रोजी देय असलेल्या प्रीमियमला कोणतेही दंड शुल्क न आकारता 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. टपाल कार्यालये अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू असली तरीही टपाल आयुर्विमा, ग्रामीण टपाल आयुर्विम्याच्या …
Read More »कर्जतमध्ये स्प्रिंग्लर मशिनद्वारे जंतुनाशक फवारणी
कर्जत ः बातमीदार कर्जत नगर परिषदेने संपूर्ण शहर निर्जंतुकीकरण करून कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्याचा चंग बांधला आहे. कर्जत नगर परिषदेने शहरात कमी मनुष्यबळाने जंतुनाशक केमिकलची फवारणी करण्यासाठी तातडीने नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बनविलेली स्प्रिंग्लर मशिन उपलब्ध केली आहे. त्यामुळे लवकरच शहरातील सर्व वॉर्डांत नवीन स्प्रिंग्लर मशिनद्वारे सोडियम हायपोक्लोराईड ह्या जंतुनाशक केमिकलची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper