अलिबाग : प्रतिनिधीलॉकडाऊन आणि संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर अलिबाग येथील सुंदर वेलनेस सेंटरतर्फे त्यांच्या साधकांसाठी ऑनलाईन वर्ग घेण्यात येत आहे. या प्रयोगाचे योगप्रेमींकडून उत्स्फूर्त स्वागत होत आहे.गतवर्षीच्या मार्च महिन्यात योगप्रशिक्षिका सायली वेंगुर्लेकर यांनी अलिबागमध्ये वेलनेस योग सेंटरची स्थापना केली. या योग सेंटरमध्ये अलिबाग परिसरातील जवळजवळ 80 साधक नित्यनेमाने दिवसभरातील वेगवेगळ्या वेळेत योगसाधना …
Read More »अझिम प्रेमजींकडून 1125 कोटींचा निधी
मुंबई : प्रतिनिधीकोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशातीले उद्योगपती पुढे येत आहेत. टाटा, अंबानी यांच्यानंतर आता विप्रो कंपनीचे अझिम प्रेमजी यांच्याकडून कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी 1125 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. विप्रो लिमिटेडने 100 कोटी, विप्रो इंटरप्रायझेसने 25 कोटी, तर अझिम प्रेमजी फाऊंडेशनने 1000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली …
Read More »अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त पेट्रोल देण्यास मनाई
अलिबाग : जिमाकाकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अत्यावश्यक सेवा पुरविणार्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तींच्या दुचाकी वाहनांना नागरी भागात पेट्रोल देण्यास मनाई करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी निधी चौधरी यांनी पारित केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित पेट्रोल पंपधारकाविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 14 …
Read More »कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गरीब, गरजूंना पनवेल भाजपतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल : प्रतिनिधीमाजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका हद्दीत पक्षातर्फे गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू केले आहे. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असलेले गरजवंत, गोरगरीबांना यातून दिलासा मिळाला …
Read More »अजूनही गर्दी?
दिल्लीमध्ये जमावबंदी असताना निजामुद्दीनमधील मरकजमध्ये अनेक जण एकत्र राहिले, झोपले. देशात तोवर कोरोनाबाधितांच्या केसेस उघड झाल्या होत्या. अमेरिका, इटलीसारख्या देशांमधून परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे स्पष्ट दिसत होते. देशोदेशीच्या सरकारी यंत्रणा हे पाहून हबकल्या होत्या. तरीही मरकजमधील लोकांपर्यंत परिस्थितीचे गांभीर्य पोहोचलेच नाही. हे कसे? तरी निव्वळ त्यांनाच दोष द्यायचा? भाजीखरेदीसाठी गर्दी करणार्यांना, …
Read More »मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा
दरे कुटूंबियांचा समाजापुढे आदर्श पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्याती नितळस गावात रविवारी (दि. 29) एक विवाह सोहळा झाला. दारात मंडप नाही, वर्हाडी ही नाही, वाजंत्री नाही की नाजुक साजुक करवल्या नाहीत. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन असल्याने घरातील फक्त काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा करून पाटील आणि दरे कुटूंबियांनी समाजापुढे एक …
Read More »लायन्स क्लबतर्फे जीवनावश्यक वस्तू वाटप
उरण : वार्ताहर कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये सर्वत्र लॉकडाऊन केल्याने उरण परिसरात रोजंदारीवर काम करणार्यांना काम मिळणे बंद झाले आहे, त्यांची उपासमार होत आहे. अशा गरिबांना मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. उरण लायन्स क्लब ऑफ उरणच्या वतीने बुधवारी (दि.1) एप्रिल रोजी 140 किराणा समान देण्यात आले त्यात कांदे, …
Read More »मुंबईत मरण्यापेक्षा गाव बरा
पनवेल : प्रतिनिधी आम्ही तिघे रात्री 10 वाजता सायनहून निघालो आहोत. माझी आई आजारी आहे. ती गावाला एकटीच आहे, त्यामुळे आम्हाला काही करून घरी जायचे आहे. पनवेल एसटी स्टँडवर दुपारी 12 वाजता आपल्या दोन वर्षाच्या मुलीला मांडीवर घेऊन बसलेली महिला सांगत होती. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील उसरघर येथील मूळ रहिवासी …
Read More »कानसा वारणा फाऊंडेशनचे मोलाचे कार्य
मोहोपाडा : प्रतिनिधी कानसा वारना फाऊंडेशनच्या वतीने राज्यभर वृक्ष लागवड, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदीं विविध प्रकारचे कार्यक्रम होत आहेत. यातच गोरगरिब गरजुंना मदत तसेच बेरोजगारांना व तूरूंगातील कैद्यांसाठी बंदीशाला तसेच कैदी सुटून आल्यानंतर रोजगार मिलवून देण्यासाठी कानसा वारणा फाऊंडेशनचे मोलाचे कार्य सुरू आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने …
Read More »भाजी विक्रेत्यांकडून सोशल डिस्टन्स पाळावे; उरणच्या नागरिकांची मागणी
उरण : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात संचार बंदीसह 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मात्र अत्यावश्यक सेवा वस्तू भाजी विक्रेत्यांना दुपारी 12 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली असताना उरण शहरात खेळाचे असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान येथे लावण्यात आलेल्या भाजी फळ विक्रेत्याकडून सोशल डिस्टनचा वापर केला जात नसल्याचे चित्र दिसून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper