नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी नवी मुंबई येथील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे जिम, उद्याने व जलतरण तलाव पुढील सूचनेपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश सिडकोतर्फे सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सर्व गृहनिर्माण संस्थांमध्ये कोणत्याही कार्यक्रमानिमित्त मोठी गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशदेखील सिडकोतर्फे देण्यात आले …
Read More »विद्यार्थ्यांनी तयार केले हर्बल सॅनिटायझर
कर्जत : प्रतिनिधी कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने सहकारी व विद्यार्थ्यांच्या मदतीने हर्बल हँड सॅनिटाझर तयार करून, त्याचे मोफत वाटप केले. सध्या कोरोना विषाणू रोखण्यासाठी मास्क व हँड सॅनेटायझरचा सर्रास उपयोग होत असल्याने त्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाचे …
Read More »सोने व्यवसायावर विपरीत परिणाम
खोपोली : प्रतिनिधी सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूची लागण टाळण्यासाठी शासनातर्फे विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असून, नागरिकांनी ऐन लग्नसराईत सोने खरेदी टाळल्यामुळे सोने व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. आठवडाभरात सोन्याच्या दरात प्रति तोळा पाच हजार रुपयांची घसरण झाल्याने खोपोलीतील सोने व्यवसायावर संक्रांत आल्याचे चित्र …
Read More »कोरोनाविरोधातील लढाईला रायगडात प्रतिसाद; पोलादपुरात सलूनचे शटर डाऊन
पोलादपूर : प्रतिनिधी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलादपूर शहरातील सलून व्यावसायिकांनी शुक्रवारी व शनिवारी सलून व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सलून चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष विजय पवार यांनी दिली. या वेळी शहरातील सलून व्यावसायिकांना संघटनेतर्फे कोरोना प्रतिबंधक मास्कचे वाटपही करण्यात आले. पोलादपूर तालुका नाभिक समाज संघटना आणि पोलादपूर …
Read More »भारताकडून खेळण्यास पाक खेळाडू लायक नाहीत!
जावेद मियाँदाद यांचा घरचा आहेर कराची : वृत्तसंस्थापाकिस्तान क्रिकेट संघातील एकाही खेळाडूची भारतीय संघातून खेळण्याची लायकी नाही, अशा शब्दांत माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांनी पाक क्रिकेट बोर्डाला घरचा आहेर दिला. खराब कामगिरी करणार्या खेळाडूंना वारंवार संधी दिल्याचा आरोप मियाँदाद यांनी बोर्डावर केला.पाकिस्तान संघात असा एक तरी खेळाडू आहे का जो …
Read More »मोर्बे धरणाची गळती थांबणार; दुरुस्तीकामाची निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात
पनवेल : बातमीदार सिंचन प्रकल्पासाठी 45 वर्षांपूर्वी पनवेल तालुक्यात पाटबंधारे विभागाने बांधलेल्या मोर्बे धरणाची गळती थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागाकडून धरण दुरुस्तीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली असून अल्पावधीतच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन पावसाळ्यापूर्वी धरणाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. 50 किलोमीटरपेक्षा अधिक भूभागावर व्यापलेल्या मोरबे धरणात 3.22 दशलक्ष घनमीटर पाणी …
Read More »कोरोनाचा सामना करण्यासाठी जर्मन फुटबॉल संघाचा पुढाकार
20 कोटी रुपये दान करण्याचा घेतला निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जवळपास दोन लाख 19,033वर पोहचली आहे. कोरोनामुळे 170हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 8,953वर पोहचली आहे. दुसरीकडे 82 हजार 909 लोक बरेही झाले आहेत. आशियाई देशांपेक्षा युरोपमध्ये मृत्यूंची संख्या जास्त आहे. वेगाने पसरणार्या कोरोनामुळे …
Read More »उरणमधील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विज्ञान मेळावे
उरण : वार्ताहर प्रथम शिक्षण संस्था व महानगर गॅस यांच्या संयुक्त विद्यमाने उरणमधील रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये विज्ञान मेळावे घेतले जात होते परंतु कोरोनामुळे सोमवार (दि. 16) पासून बंद करण्यात आले आहेत. पुढील काळात राहिलेल्या जिल्हा परिषद शाळेत घेतले जाणार आहेत असे सांगण्यात आले आहे. लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड …
Read More »पनवेलमध्ये मंदिरांतील आरती बंद
पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या श्री साई नारायण बाबा मंदिरात तसेच गावदेवीपाडा येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये मोठ्या प्रमाणात भक्तगण दर गुरुवारी पुजा-अर्चा व आरतीसाठी जमत असतात. परंतु शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील मंदिरातील देवदर्शन व आरती बंद ठेवण्यात आली होती. श्री साई नारायण बाबा …
Read More »पोशिर गावात दोन गटांत हाणामारी; तीन जखमी
कर्जत : बातमीदार तालुक्यातील पोशिर ग्रामपंचायतीमधील रस्त्याचे काम सुरू होते, त्या कामात जेसीबी मशीन लावून रस्ता फोडला जात असताना रस्ता का फोडला? असा प्रश्न केल्याने तेथे दोन गटात हाणामारी झाली. त्यात लोखंडी सळईने झालेल्या मारहाणीत तीन जण जखमी झाले असून, दहा जणांवर दोन वेगवेगळ्या एफआयआर नुसार गुन्हा दाखल झाला आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper